नेदरलॅंड बाजारपेठेत लिंबांची टंचाई...

नेदरलॅंड बाजारपेठेत लिंबांची टंचाई...
नेदरलॅंड बाजारपेठेत लिंबांची टंचाई...

नेदरलॅंडमधील बाजारपेठेमध्ये लिंबामध्येही मोठी उलाढाल होत असते. येथून युरोपमधील विविध रिटेल चेनमध्ये मालाचा पुरवठा होत असतो. उत्तम दर्जाच्या लिंबांची उपलब्धता कमी झाल्याने हा पुरवठा कमी पडला आहे. मेक्सिको येथे नुकत्याच झालेल्या पावसामुळे वातावरणामध्ये आलेला थंडावा आणि सापेक्ष आर्द्रतेमध्ये झालेली वाढ याचा परीणाम मेक्सिकन लिंबांच्या आयातीवर झाला आहे. त्याचप्रमाणे ब्राझील येथील लिंबू उत्पादकांनाही पावसामुळे फटका बसला आहे. तिथे लिंबांच्या रंग आणि दर्जावर विपरीत परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. परिणामी, बाजारामध्ये उत्तम दर्जाच्या लिंबांची कमतरता जाणवत असल्याचे हेग इंटरनॅशनल या कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. हेग इंटरनॅशनलच्या एलेना रोगोज्निकोवा यांनी सांगितले, की लिंबांच्या बाजारपेठेमध्ये दुहेरी ताण निर्माण झाला आहे. एका बाजूला कमी दर्जाच्या फळांची आवक बाजारात वाढत आहे. त्याला दर कमी मिळत आहे. दुसऱ्या बाजूला उत्तम दर्जाच्या लिंबांना मागणी असून, कमतरता आहे. सर्व रिटेल चेनमध्ये उर्वरित अवशेषांच्या मर्यादांचे सर्व निकष पूर्ण असलेल्या लिंबांनाच प्राधान्य दिले जाते. सध्या एप्रिलमध्ये मेक्सिको येथील लिंबाना स्मेटा प्रमाणीकरण आणि ब्राझिलन लिंबना बीएससीआय प्रमाणीकरण असलेल्या लिंबे बाजारात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हवामानाची स्थिती उत्तम होऊन, येणारा हंगाम लिंबासाठी चांगला राहिल, असा आशावादही लिंब उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com