हवाई पीक सर्वेक्षणातील अचूकतेसाठी सॉफ्टवेअर निर्मिती

ड्रॉन पीक सव्हेेक्षण
ड्रॉन पीक सव्हेेक्षण

अमेरिकेमध्ये शेतीचे आकारमान मोठे असल्याने पीक निरीक्षणासाठी ड्रोनचा वापर शेतकऱ्यांकडून केला जातो. पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थांमध्ये त्यात अचूकता असली तरी वाढीच्या शेवटच्या अवस्थांमध्ये सर्वेक्षणामध्ये अचूकता शक्‍य होत नव्हती. यावर मात करण्यासाठी ड्रोन डिप्लॉय या सॉफ्टवेअर कंपनीने अद्ययावत सॉफ्टवेअर तयार केले आहे. पिकांच्या हवाई निरीक्षणासाठी ड्रोनमधील कॅमेऱ्यांची क्षमता ही महत्त्वाची असून, त्याद्वारे संकलित छायाचित्रांचे योग्य विश्‍लेषण करणारे सॉफ्टवेअरही आवश्‍यक असते. पूर्वी उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअरची क्षमता ही कमी होती. पर्यायाने अचून निदान शक्‍य होत नव्हते. यामध्ये ग्राहकांच्या समस्या व सूचनाप्रमाणे सातत्याने सुधारणा करीत ड्रोन डिप्लॉय या नवे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्याचे नाव सेन्टेरा आहे. या ड्रोनमध्ये बहुभिंगी सेन्सर व अत्याधुनिक इन्फ्रारेड सेन्सर यांचा वापर केला आहे. याद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास व विश्‍लेषण करून पिकाच्या सद्यःस्थितीचे अचूक नकाशे तयार करण्यात येतात. हे काम आता मोबाईल ऍपद्वारेही करणे शक्‍य आहे. या सर्व घटकांच्या एकत्रित वापरातून पिकाच्या सद्यःस्थिती व आरोग्याबाबत जास्तीत जास्त अचूक निष्कर्ष काढता येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कार्यप्रणाली असे करते काम :

  • बहुभिंगी व अत्याधुनिक इन्फ्रारेड सेन्सर्समुळे पिकाची अत्यंत जवळून छायाचित्रे काढता येतात. इन्फ्रारेड सेन्सर्समधील उच्चक्षमतेच्या एन.डी.व्ही.आय. सेन्सर्समुळे पिकांतील तणाच्या किंवा सामान्य अशा विविध अवस्थांबाबत अचूक आकलन करता येते.
  • नंतर तुकड्या तुकड्यांच्या स्वरूपात मिळालेल्या छायाचित्रांतील समान ठिपक्‍यांच्या जुळवणुकीतून सॉफ्टवेअर अचूक नकाशे काढू शकतो. पूर्वी पीकवाढीच्या शेवटच्या अवस्थांमध्ये असे समान ठिपके मिळत नसल्याने त्या अवस्थांचा अचूक नकाशा बनविणे सॉफ्टवेअरला शक्‍य होत नव्हते. त्यात अडचणी येत.
  • मोबाईल ऍपच्या साह्याने संपूर्ण क्षेत्रावरील पिकाचा नकाशा तयार करता येतो.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com