agricultural stories in marathi, agro vision, Soil fungi may help determine the resilience of forests to environmental change | Agrowon

वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी जंगलांना होतो बुरशींचा फायदा
वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या वनस्पतींच्या क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी मातीतील बुरशींची मदत होऊ शकत असल्याचे संशोधनात पुढे आले आहे. मातीतील बुरशी आणि त्यांचा पर्यावरणावरील नेमका परिणाम तपासण्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहायक प्रा. काई झू यांनी जमिनीपासून टोकाकडे ऐवजी टोकाकडून जमिनीकडे (‘बॉटम अप’पेक्षाही ‘टॉप बॉटम अॅप्रोच’) असे नावीन्यपूर्ण धोरण वापरले आहे. त्यामुळे उपग्रहातून मिळणाऱ्या प्रतिमांद्वारेही जमिनीतील विविध घटकांचा वेध घेणे शक्य होऊ शकते.

पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या वनस्पतींच्या क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी मातीतील बुरशींची मदत होऊ शकत असल्याचे संशोधनात पुढे आले आहे. मातीतील बुरशी आणि त्यांचा पर्यावरणावरील नेमका परिणाम तपासण्यासाठी कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहायक प्रा. काई झू यांनी जमिनीपासून टोकाकडे ऐवजी टोकाकडून जमिनीकडे (‘बॉटम अप’पेक्षाही ‘टॉप बॉटम अॅप्रोच’) असे नावीन्यपूर्ण धोरण वापरले आहे. त्यामुळे उपग्रहातून मिळणाऱ्या प्रतिमांद्वारेही जमिनीतील विविध घटकांचा वेध घेणे शक्य होऊ शकते.

निसर्गामध्ये सहजिवी संबंधांचे महत्त्व मोठे आहे. एकमेकांच्या सहकार्यांतून मातीतील बुरशी आणि वनस्पतींची मुळे विविध अन्नद्रव्यांची देवाणघेवाण करतात. मातीच्या आत अंधारात होणाऱ्या या प्रक्रियांचा परणाम वनस्पतींच्या वाढीवर मोठ्या प्रमाणात होत असतो. वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी या बुरशी उपयुक्त ठरत असल्याचे सांताक्रूझ येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील सहायक प्रा. काई झू यांनी केलेल्या अभ्यासात पुढे आले आहे.

वातावणातील बदलांची तीव्रता वेगाने वाढत असताना, त्याला जंगलांचा प्रतिसाद तुलनेने कमी आहे. तो वाढवण्यासाठी कोणते घटक उपयुक्त ठरू शकतील, याबाबत अभ्यास करण्यात आला. जंगलामध्ये झाडांची वाढ ही प्रामुख्याने मातीमध्ये उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. सेंद्रिय कर्बांचे वहन करण्यामध्ये पर्यावरणातील विशेषतः झाडांच्या मुळांवर वाढणाऱ्या मायकोरायझल बुरशी मोलाची भूमिका निभावतात. मातीतील पोषक कर्ब घटक आणि मुळे यातील मध्यस्थ म्हणून कार्य करतात. झाडांच्या मुळांकडून बुरशींना कार्बन उपलब्ध होते, तर वनस्पतीला पोषक घटक मिळतात. असा दोघांच्या फायद्याचा सौदा असतो.

  • जंगलामध्ये सामान्यतः आढळणाऱ्या दोन महत्त्वाच्या बुरशी  इक्टोमायकोरायझल ः या बुरशी सूचीपर्णी झाडांवर (उदा. पाईन, ओक आणि बिचेस) वाढतात.
    अर्ब्युस्कर ः अन्य झाडांवर (उदा. मॅपल) वाढतात.
  • झू यांनी अमेरिकेच्या फॉरेस्ट इन्व्हेंटरी अॅंड अॅनालिसिस प्रोग्रॅममधून मातीतील कार्बन आणि नायट्रोजनच्या पातळीमध्ये होत असलेल्या बदलांची माहिती मिळवली. त्यात वरील दोन्ही बुरशींशी संबंधित झाडांच्या किंवा वनस्पतींच्या वाढीचा सहसंबंध तपासण्यात आला. विशेषत एक्टोमायकोरायझल वाढणाऱ्या आणि अर्ब्युस्कर बुरशी वाढणाऱ्या वनस्पती यांच्या वाढीचा वेध घेण्यात आला. झू यांना मातीमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असलेल्या पर्यावरणातील झाडांवर वातावरणातील बदलांच्या होणाऱ्या परीणामांविषयी माहिती मिळाली.
  • मातीतील कर्ब - नत्र गुणोत्तर वाढले की इसीएम बुरशींच्या प्रमाण वाढते. त्यावर हवामान, मातीचा पोत आणि पाने पडून निर्माण होणारे नत्र यांचा काही प्रमाणात परिणाम होत असला तरी त्यांचे प्रमाण लक्षणीय वाढते. थोडक्यात, मातीतील कर्बाचे वाढलेले प्रमाणापेक्षाही कमी झालेल्या नत्रामुळे इसीएम बुरशींचे प्रमाण वाढते.
  • एएम आणि इसीएम प्रकारच्या झाडांच्या बाबतीत नत्राची उपलब्धता असतानाही वाढीमध्ये फरक पडतो. कारण त्यावरील बुरशींची नत्राच्या शोषणामध्ये मोलाची भूमिका असते. या बुरशी संदेश पोचवण्यासोबतच पोषक घटकांची उपलब्धता करण्यासाठी एकाच वेळी प्रयत्न करतात.
  • जमिनीतील प्रक्रिया वेध घेण्यामध्ये अनेक अडचणी असल्या तरी झाडांच्या वाढीवरील परिणाम बाह्य साधनांच्या साह्याने मोजता येऊ शकतो. त्यामुळे जंगले वातावरणातील बदलांना कसा प्रतिसाद देतील, याचा अंदाज घेणे शक्य होईल.
  • जागतिक तापमान बदलामध्ये अमेरिकेच्या पूर्व भागातील जंगलाचे विस्थापन अधिक उंचीकडे होणार असल्याचा दावा अनेकजण करत असले तरी त्याबाबतचे पुरावे मिळालेले नसल्याचे झू यांनी सांगितले. बॉटम अपपेक्षाही टॉप बॉटम अॅप्रोच फायद्याचा ठरू शकत असल्याचे त्यांचे मत आहे. हे संशोधन जर्नल ऑफ इकॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...