कीटकांचा फडशा पाडण्यात कोळ्यांची आघाडी

कीटकांचा फडशा पाडण्यात कोळ्यांची आघाडी
कीटकांचा फडशा पाडण्यात कोळ्यांची आघाडी

बहुतांश शेतकऱ्यांना कोळी ही केवळ कीड म्हणून माहिती आहे. मात्र, कोळ्यांच्या विविध प्रजाती पिकांसाठी त्रासदायक ठरणाऱ्या अनेक किडींचा फडशा पाडतात. त्याचे वार्षिक प्रमाण अचंबा वाटावे एवढे अवाढव्य आहे. जगभरातील सर्व कोळी प्रतिवर्ष सुमारे ४०० ते ८०० दशलक्ष टन कीटकांचा फडशा पाडत असल्याचा दावा संशोधकांनी केला. हे प्रमाण माणसांकडून खाल्ल्या जाणाऱ्या मांस आणि मत्स्यआहाराच्या आसपास (४०० दशलक्ष टन) आहे. अशा प्रकारे पिकाच्या संरक्षणामध्ये अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या कोळ्यांकडे प्राधान्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

  • अष्टपाद वर्गातील कोळी विविध छोट्या कीटकांचा फडशा पाडतात. शेती, जंगले आणि कुरणे यामध्ये त्यांच्या या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी स्वित्झर्लंड येथील युनिव्हर्सिटी ऑफ बॅसलमधील मार्टिन नॅफेलर, स्वीडन येथील लुंड विद्यापीठातील क्लाऊस बिर्कहॉफर आणि जर्मनी येथील ब्रॅंडेनबर्ग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथील संशोधक एकत्र आले. त्यांनी आपल्या संशोधनाचे निष्कर्ष स्प्रिंगर्सच्या जर्नल सायन्स ऑफ नेचरमध्ये प्रकाशित केली आहे.
  • ६५ अन्य संशोधनांचे साह्य घेत पृथ्वीवरील सातही खंडामध्ये जंगले, गवताळ कुरणे, झुडपे, शेती, वाळवंट, शहरी आणि टुंड्रा प्रदेशात आढळणाऱ्या कोळ्यांच्या प्रजातींची नोंद व मोजदाद केली. त्यांचे एकत्रित वजन २५ दशलक्ष टन भरत असल्याचे समोर आले.
  • त्यांच्याकडून जगण्यासाठी खाद्य म्हणून फडशा पाडल्या जाणाऱ्या कीटकांचे वजन मिळवण्यात आले. त्यासाठी विविध विभागांतील सरासरी प्रतिवर्गमीटर कोळी बायोमास व त्यांच्याकडून खाल्ल्या जाणाऱ्या कीटक बायोमास विचारात घेतले.
  • हे प्रमाण ४०० ते ८०० दशलक्ष टन प्रतिवर्ष असल्याचे समोर आले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com