agricultural stories in marathi, agro vision, Using coal waste to create sustainable concrete | Agrowon

फ्लाय अॅशपासून कॉंक्रिटची निर्मिती शक्य

वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

सध्या टाकाऊ समजल्या जाणाऱ्या फ्लाय ॲशपासून अधिक ताकदवान, सक्षम अशा काँक्रिटची निर्मिती वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील प्रा. झिंयामिंग शी, त्यांचे विद्यार्थी गँग क्षू यांनी केली आहे. पारंपरिक कॉंक्रिट निर्मितीला पर्याय मिळणार असून, यात टाकाऊ घटकांचा वापर होत असल्याने पर्यावरणपूरकही ठरणार आहे. हे संशोधन जर्नल फ्युएलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

सध्या टाकाऊ समजल्या जाणाऱ्या फ्लाय ॲशपासून अधिक ताकदवान, सक्षम अशा काँक्रिटची निर्मिती वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील प्रा. झिंयामिंग शी, त्यांचे विद्यार्थी गँग क्षू यांनी केली आहे. पारंपरिक कॉंक्रिट निर्मितीला पर्याय मिळणार असून, यात टाकाऊ घटकांचा वापर होत असल्याने पर्यावरणपूरकही ठरणार आहे. हे संशोधन जर्नल फ्युएलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

कोळशापासून विद्युत निर्मिती करताना फ्लाय ॲश शिल्लक राहते. सध्या अमेरिकेमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक फ्लाय ॲशही टाकाऊ म्हणून फेकली जाते. या राखेमुळे भोवतालच्या पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. सध्या या राखेचा वापर काही प्रमाणात बांधकामासाठी विटा तयार करण्यासाठी होतो. आता या फ्लाय ॲशपासून काँक्रिटही तयार करणे शक्य असल्याचे वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील संशोधनात दिसून आले आहे. पारंपरिक काँक्रिटमध्ये सिमेंट, वाळू आणि खडी यांचे मिश्रण वापरले जाते. यामध्ये पाच ते आठ टक्क्यांपर्यंत हरितगृह वायूचे उत्सर्जन जगभरामध्ये होत असते. या मिश्रणातील सिमेंट या घटकाच्या निर्मितीसाठी उच्च तापमान आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा आवश्‍यक असते. फ्लाय ॲशपासून काँक्रिट निर्मितीमध्ये उष्णता किंवा ऊर्जेची आवश्‍यकता नसल्याने ऊर्जेची बचत होणार आहे.

या संशोधक गटाने नॅनो घटक ग्राफीन ऑक्साईडचा वापर केला असून, फ्लाय ॲश पाण्यामध्ये मिसळली असता सिमेंटसारखी अधिक घट्ट आणि ताकदवान बनते. ग्राफीन ऑक्साईडचे अणू सोडियम सिलिकेट आणि कॅल्शिअम ऑक्साईडसारख्या रासायनिक घटकांसोबत प्रक्रिया करून कॅल्शिअम-ॲल्युमिनेट-सिलिकेट-हायड्रेट अशा मूलद्रव्यांची साखळी बनते. ती अधिक सिमेंटपेक्षाही अधिक ताकदवान असते.

या काँक्रिटच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, ते वेगवेगळ्या वजनाला आणि तापमानामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करत असल्याचे आढळले आहे. पुढील टप्प्यामध्ये बांधकाम करून त्या संरचनेच्या क्षमतेच्या चाचण्या घेण्यात येणार असल्याचे क्षू यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
 शेतकरी केंद्रित अर्थसंकल्पाचा दावा फोलकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १...
वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा...सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य...
कोकणासह नवा महाराष्ट्र घडवूया :...रत्नागिरी  ः आकडा सांगण्यापेक्षा कृतीला...
कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता...नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने...
भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन :...मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५...
सांगलीत साडेसहा हजार शेतीपंपांच्या वीज...सांगली  ः  जिल्ह्यातील २०१८ पूर्वीच्या...
‘वनामकृवि’त सोयाबीनच्या पैदासकार ...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या...
बोंडारवाडी धरणप्रश्नी मेढा येथे आंदोलनमेढा, जि. सातारा : बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे,...
ज्वारी उत्पादन यंदाही आतबट्ट्यातचनगर ः दोन वर्षं दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यंदा...
जांभुळणी तलावाच्या कालव्याला गळतीखरसुंडी, जि. सांगली : जांभुळणी (ता. आटपाडी) येथील...
महिला शक्‍तीतूनच नवसमाजाची जडणघडण  ः...अमरावती  ः ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती...
सोलापूर जिल्ह्यातील पाच नळपाणी योजना...सोलापूर : प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी...
परभणी जिल्ह्यात फळबागेची ६३९ हेक्टरवर...परभणी : यंदा सिंचन स्त्रोतांना पाणी उपलब्ध आहे....
आंबेगाव तालुक्यात प्रतिकूल हवामानामुळे...निरगुडसर, जि. पुणे ः यंदा हवामानातील बदल व...
नगर जिल्ह्यात ४८ हजार हेक्टरवर चारा...नगर : जिल्ह्यात यंदा पाण्याची बऱ्यापैकी...
जळगाव जिल्ह्यात तूर विक्रीबाबत ८००...जळगाव  ः जिल्ह्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीने...
पपई १४.५५ रुपये प्रतिकिलो शहादा, जि. नंदुरबार  : पपई उत्पादक शेतकरी व...
शेतीपंपांचा वीज वापर १६ टक्के; दाखविला...अकोला  ः शेतीपंपांचा वीज वापर १६ टक्केच होत...
कोल्हापुरात गवार, घेवड्याच्या दरात...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाला उठाव, दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...