लॉन्समधील नत्र निचऱ्याचाही अभ्यास आवश्यक

लॉन्समधील नत्र निचऱ्याचाही अभ्यास आवश्यक
लॉन्समधील नत्र निचऱ्याचाही अभ्यास आवश्यक

सॉल्ट लेक व्हॅलीच्या परिसरातील शंभर वर्षांपासून जुन्या असलेल्या लॉन्समध्ये सातत्याने खतांचा वापर होत असून, त्या खताच्या वापरामुळे संपृक्त न झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. उतह विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनातील निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत. कारण यापूर्वीच्या पूर्व अमेरिकेत झालेल्या विविध संशोधनांमध्ये नत्राच्या वापरामुळे जमिनी काही दशकातच संपृक्त होत असल्याचे पुढे आले होते. लॉन्समधील नत्र निचऱ्याचाही अभ्यास आवश्यक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. पिकांच्या वाढीसाठी नत्र अत्यंत महत्त्वाचे असून, निसर्गामध्ये त्याची साखळी असते. वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण मुबलक असूनही पिकांना तो घेता येत नाही. मातीतील काही जिवाणू नायट्रोजन वायूचे रूपांतर नाटट्रेट स्वरूपामध्ये करतात; तर काही जिवाणू मातीतील नत्र पुन्हा वायू स्वरूपात मुक्त करतात. माणसाने नत्र साखळीमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला आहे. शेत आणि लॉनमध्ये नत्रयुक्त खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यातील काही भाग निचरा होऊन भूजलामध्ये किंवा जल प्रवाहामध्ये प्रदुषक म्हणून जातो. नत्र जमिनीमध्ये साठून राहण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक नैसर्गिक घटक कार्यरत असतात. त्यांच्या परिणामामुळे नत्र साठवणुकीचे विविध पॅटर्न दिसून येतात. सॉल्ट लेक व्हॅलीतील जमिनीचा अभ्यास संशोधिका रोज स्मिथ यांनी केला आहे. त्यांचे संशोधन ओइकोलॉजियामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. निचराही अधिक ः २००७ मध्ये प्रा. जेम्स इहलेरींजर आणि विद्यार्थी जेबेडिह विल्यमसन यांनी सॉल्ट लेक व्हॅलीतील ४० लॉनमधील नमुन्याचे मातीतील कार्बनच्या प्रमाण मिळवण्यासाठी विश्लेषण केले. त्याच नमुन्यावर स्मिथ यांनी नत्राचे प्रमाण जाणून घेतले. यामध्ये इतक्या जुन्या नोंदी उपलब्ध नसल्याने खतांचा वापर होत असल्याचे गृहित धरण्यात आले. गेल्या शंभर वर्षांमध्ये नत्राचे प्रमाण वाढत जाण्याचाच अंदाज रोज आणि सहकाऱ्यांचा होता. मात्र, तो खोटा ठरला. म्हणजेच नत्रयुक्त खतांचा वापर होत असला तरी त्यांचा निचराही तेवढ्याच प्रमाणात होत असला पाहिजे. त्यानंतर परिसरातील तलाव आणि नद्यातील नत्राचे प्रमाण जाणून घेतले. जॉर्डन नदीमध्ये अन्नद्रव्याचे मोठे प्रदूषण आढळले असून, त्याचा संबंध लॉन्समध्ये निचऱ्याशी जोडता येऊ शकेल. मात्र, याबाबत अधिक अभ्यास होण्याची आवश्यकता संशोधिका रोज स्मिथ यांनी व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com