पृथ्वीवरील पहिल्या सजीवांनीही केला तापमानवाढीचा सामना

 पृथ्वीवरील पहिल्या सजीवांनीही केला तापमानवाढीचा सामना
पृथ्वीवरील पहिल्या सजीवांनीही केला तापमानवाढीचा सामना

सुमारे ५०० दशलक्ष वर्षांपेक्षाही आधी पृथ्वीवरील पहिल्या प्राण्यांच्या उत्क्रांतीमध्ये जागतिक तापमानवाढीचेही कारण अंतर्भूत असल्याचे संशोधनात आढळले आहे. एक्स्टर, लिड्स, अॅण्टवेर्प यांसह व्रिजे या विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. ५२० ते ५४० दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्रातील प्राणिजीवनाचा विकास झाला. या काळात समुद्राच्या पृष्ठभागावर सेंद्रिय पदार्थांचे विघटन होण्यातून कार्बन डायऑक्साईडची अधिक, तर ऑक्सिजनची कमी प्रमाणात निर्मिती होऊ लागली. या प्रक्रियेला ‘बायोटर्ब्यूशन’ असे म्हणतात. या विघटनासाठी सूक्ष्मजीव कार्यरत होते. त्यानंतरच्या १०० दशलक्ष वर्षांमध्ये समुद्रातील पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे सुरवातीच्या सजीवांना तीव्र परिस्थितीचा सामना करावा लागला. खडकांच्या विविध पुराव्यातून ही अल्प ढवळाढवळ आढळून येते. त्याकाळी सागरी पृष्ठभागावर राहणारे प्राणी फारसे कार्यरत नसावे आणि खोलवर बुडीही मारू शकत नसावेत, असे दिसून येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com