agricultural stories in marathi, agro vision,From corn to flake- Health-promoting phenolic acids lost during food processing | Agrowon

मक्यातील आरोग्यदायी फिनॉलिक संयुगे प्रक्रियेमध्ये होतात नष्ट

वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

कच्च्या मका धान्यांमध्ये विपूल प्रमाणात जीवनसत्त्वे आणि आरोग्यदायक फिनॉलिक संयुगे असली तरी प्रक्रियेमध्ये त्यांचा ऱ्हास होत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्री’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

कच्च्या मका धान्यांमध्ये विपूल प्रमाणात जीवनसत्त्वे आणि आरोग्यदायक फिनॉलिक संयुगे असली तरी प्रक्रियेमध्ये त्यांचा ऱ्हास होत असल्याचे दिसून आले आहे. हे संशोधन ‘जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्री’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

अमेरिकेमध्ये उच्च प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मक्यापासून फ्लेक्स वअन्य घटकांचा वापर अमेरिकनांच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणामध्ये केला जातो. मात्र, त्यामध्ये शरीराला आवश्यक ती फिनॉलिक संयुगांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे इल्लिनॉईज विद्यापीठातील कृषी, ग्राहक आणि पर्यावरणशास्त्र महाविद्यालयामधील सहायक प्रा. कॅरी बट्स-विल्म्समेयर व सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयोगामध्ये दिसून आले आहे. थोडक्यात मक्यात कर्करोगविरोधी फिनॉलिक संयुगे असूनही, त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये रूपांतरामध्ये त्याचा ऱ्हास होतो.

कॅरी बट्स -विल्म्समेयर व सहकाऱ्यांनी केलेल्या या प्रयोगात कमी अधिक फिनॉलिक संयुगे असलेल्या १९ प्रकारच्या मका जातीपासून फ्लेक्स बनवले. त्यातील शिल्लक राहणाऱ्या घटकांचे नेमके प्रमाण मोजले. मक्याच्या दाण्यामध्ये सामान्यतः फेरुलिक आम्ल आणि पी- कार्मारिक आम्ल यांचे प्रमाण अधिक असते. त्याचे रूपांतर पुढे मका पक्व होताना उच्च फिनॉलिक घटकांमध्ये होते. याविषयी माहिती देताना कॅरी बट्सविल्म्समेयर यांनी सांगितले, की मका धान्यामध्ये सुरवातीला फिनॉलिक आम्लाची कितीही तीव्रता असली तरी कोरड्या दळण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यातील अनेक फिनॉलिक संयुगे नष्ट होतात. बहुतांश सर्व उत्पादनाच्या निर्मितीसाठी असे पीठ तयार करूनच वापरले जाते.

मक्यातील फिनॉलिक संयुगे ही मुख्यतः त्याच्या तुसांमध्ये किंवा बाह्यआवरणामध्ये एकवटलेली असतात. दळण्याच्या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा हाच घटक काढून बाजूला केला जातो. बहुतांश फिनॉलिक संयुगे ही तंतुमय पदार्थामध्ये बांधलेल्या स्वरूपामध्ये असतात. उष्णतेमध्ये ते बंधमुक्त होऊन मक्यापासून बनवलेल्या खाद्य पदार्थातील आरोग्यदायी घटकांचे प्रमाण वाढते. मक्यामध्ये शिल्लक राहिलेल्या स्टार्च घटकांना उष्णता दिल्यास त्यातील विद्राव्य फिनॉलिक घटकांचे प्रमाण वाढवणे शक्य असल्याचे संशोधकांचे मत होते. अर्थात अशा फिनॉलिक घटकांचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याचे या प्रयोगात आढळले. अन्नशास्त्र विभाग आणि अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये याविषयी अधिक जागरूकता निर्माण होण्याची आवश्यकता आहे.


इतर ताज्या घडामोडी
हिंगोलीत एका व्यक्तीचा कोरोना चाचणी...हिंगोली : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती...
शब-ए-बारात, डॉ. आंबेडकर जयंतीला घरुनच...मुंबईः सध्या ‘कोरोना’ने सर्वत्र धुमाकूळ घातला...
खासगी डेअरीची संकलन यंत्रणा तोकडी;...नांदेड ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी...
नाशिक बाजार समितीमध्ये केवळ लिलावाला...नाशिक : ‘कोरोना’ विषाणूच्या वाढत्या...
पुणे, मुंबईत भाजीपाल्याची घरपोच सुविधा पुणे ः शहरातील नागरिकांसाठी भाजीपाला पुरवठा...
पुसदमध्ये शेतकरी कंपन्यांतर्फे...यवतमाळ : ‘लॉकडाऊन’च्या पार्श्‍वभूमीवर पुसद येथे...
लातूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक...चापोली, जि. लातूर : ‘कोरोना’चा फैलाव...
कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
राज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष...मुंबई : ‘‘‘कोरोना’ला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने...
कोल्हापुरातील भाजी मंडई, रस्त्यावरील...कोल्हापूर : सामाजिक अंतर ठेवण्याची सूचना पायदळी...
स्वयंसेवी संस्था निवडीचे निकषआदर्शगाव ही योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत...
तयार करा ग्रामविकास आराखडासरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील,...
नियंत्रण उसावरील खोडकिडीचे सुरू उसाला फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत खोडकिडीचा...
सोलापुरात ५०० गाड्या कांद्याची आवक,...सोलापूर : कोरोना विषाणूमुळे सोलापूर बाजार...
कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...मुंबई : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग...
जळगाव जिल्ह्यात केळीचे दर ३०० ते ४००...जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्तर भारतात...
द्राक्षबागांना एकरी अडीच लाखांची मदत...नाशिक : संपूर्ण देशात असणाऱ्या लॉकडाऊनमुळे नाशिक...
शासनाने अतिरिक्त दूध खरेदीची मर्यादा...कोल्हापूर : शासनाने अतिरिक्त दूध खरेदीची मर्यादा...
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘...मुंबई: करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग...
सांगलीत शेतीमालाची ३०० कोटींवर उलाढाल...सांगली : 'कोरोना'चा प्रसार रोखला जावा, यासाठी...