पशू आहारात वनस्पतिजन्य तेलाच्या वापराने मिथेन उत्सर्जनाचे प्रमाण कमी

पशू आहारात वनस्पतिजन्य तेलाच्या वापराने मिथेन उत्सर्जनाचे प्रमाण कमी
पशू आहारात वनस्पतिजन्य तेलाच्या वापराने मिथेन उत्सर्जनाचे प्रमाण कमी

हिरव्या चाऱ्यामध्ये वनस्पतिजन्य तेलाचा वापर केल्यास गायींद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनच्या प्रमाणामध्ये घट होत असल्याचे दिसून आले. या पद्धतीमुळे दुधामधील काही मेदाम्लांवर चांगले परिणामही दिसून आल्याचा दावा फिनलॅंड येथील नॅचरल रिसोर्स इन्स्टिट्यूट मध्ये संशोधकांनी केला आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ डेअरी सायन्स’मध्ये प्रकाशित झाले आहेत. रवंथ करणाऱ्या प्राण्यांकडून होत असलेल्या मिथेनच्या उत्सर्जनाचे प्रमाण लक्षणीय आहे. ते कमी करण्यासाठी काही पोषक आहार आणि व्यवस्थापन पद्धती राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने फिनलॅंडमध्ये केलेल्या अभ्यासामध्ये वनस्पतिजन्य तेल आणि तेलबियांचा पशू आहारामध्ये समावेश करण्यात आला. या प्रयोगामध्ये चार वेगवेगळ्या वनस्पतिजन्य तेलांचा वापर पाच नॉर्डिक रेड गायींच्या आहारामध्ये केला. चारा आणि पशुखाद्याप्रमाणे ६०ः४० असे ठेवले होते. या तेलयुक्त घटकांमुळे पचनसंस्थेमध्ये मिथेन उत्पादनासाठी कार्यरत असलेल्या जिवाणूंवर परिणाम होतात. त्याचप्रमाणे दुधातील मेदाम्लांमध्ये परिणाम होतात. हे दुधातील बदल माणसांसाठीही उपयुक्त राहतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com