हरितगृहामध्ये महागड्या खरबुजाची लागवड

हरितगृहामध्ये महागड्या खरबुजाची लागवड
हरितगृहामध्ये महागड्या खरबुजाची लागवड

रुनेई येथील केजी तंगकू येथील कृषी तंत्रज्ञान पार्कमधील सुपरफिश ग्रोअर्स यांच्या हरितगृहामध्ये सर्वात महागड्या खरबुजाची शेती केली जात आहे. सुपरफिशचे संस्थापक इलिन ली हुई शी आणि ली वूई शेंग या बंधूंनी या विषयी माहिती देताना सांगितले, की गेल्या आठवड्यामध्ये या खरबुजाची काढणी पूर्ण झाली असून, १५ टन उत्पादन जपान, चीन, मलेशिया आणि सिंगापूर येथे २० डॉलर प्रति किलो या किमतीने पाठवण्यात आले. जपानीज अरुस खरबूज पक्व झाल्यानंतर त्याचे वजन सरासरी १.५ किलोपर्यंत भरते. स्थानिक बाजारामध्ये त्याला १०० डॉलरपर्यंत दर मिळतो. ग्राहकांकडून त्याची खरेदी प्रामुख्याने भेट देण्यासाठी आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये केली जाते. सुपरफिश खरबुजाच्या शेतीसाठी गेल्या वर्षी सुमारे ३ दशलक्ष डॉलर इतकी गुंतवणूक करत नऊ हरितगृहांची उभारणी केली आहे. त्यातून ३८० टन खरबुजाचे उत्पादन घेऊन २०२० सालापर्यंत सुमारे ३.८ दशलक्ष डॉलर उत्पन्न मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी खास जपान येथून बिया मागवण्यात आल्या असून, वर्षभर त्यांचे उत्पादन घेण्यात येईल. नऊ हरितगृहांपैकी सहामध्ये हरितगृहामध्ये चार स्थानिक उत्पादकांशी करार केले असून, त्यामध्ये दोघांची संयुक्त गुंतवणूक आहे. २०२३ सालापर्यंत सुपरफिश ग्रोअर्सचे उत्पादन वाढून ११४० टनापर्यंत पोचेल आणि त्यातून प्रति वर्ष ११.४ दशलक्ष डॉलर इतके उत्पन्न मिळेल. कारण जागतिक पातळीवर खरबुजाच्या बाजारपेठेची वाढही ४१३ दशलक्ष डॉलरने होणार असून, त्यात चीन हा सर्वात मोठा आयातदार असेल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com