agricultural stories in Marathi, agromarket, chinese ginger export prices rose ४०% in June" | Agrowon

जूनमध्ये चिनी आल्याच्या किमतीत वेगाने वाढ
वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जुलै 2019

गेल्या सहा महिन्यांमध्ये निर्यातक्षम चिनी आल्याच्या किमतीमध्ये वेगाने वाढ होत असून, केवळ एक महिन्यामध्ये किमती ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या वर्षाच्या याच काळातील किमतीचा तुलनात्मक अभ्यास केल्यास बाजाराची स्थिती असामान्य असल्याचे मत अनक्विऊ तायलाई फूड्सचे विक्री व्यवस्थापन जेसन यांनी सांगितले.

गेल्या सहा महिन्यांमध्ये निर्यातक्षम चिनी आल्याच्या किमतीमध्ये वेगाने वाढ होत असून, केवळ एक महिन्यामध्ये किमती ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या वर्षाच्या याच काळातील किमतीचा तुलनात्मक अभ्यास केल्यास बाजाराची स्थिती असामान्य असल्याचे मत अनक्विऊ तायलाई फूड्सचे विक्री व्यवस्थापन जेसन यांनी सांगितले.

सामान्य स्थितीमध्ये चीन येथील बाजारामध्ये जून आणि जुलै हा कालावधी आले निर्यातीच्या दृष्टीने नरम असतो. या काळामध्ये आल्याच्या किमतीमध्ये वाढ होण्यामागे दोन घटक असू शकतात. गेल्या वर्षी प्रमुख आले उत्पादक पट्टा असलेल्या शान्डोंग प्रांतामध्ये तीव्र वातावरणाची स्थिती आणि पूर परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्याचा फटका आल्याचे उत्पादन आणि दर्जा या दोन्हीला बसला. परिणामी उच्च दर्जाच्या निर्यातक्षम आल्याचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले. या परिस्थितीमुळे निर्यातदारांनी या वर्षी आल्याची लवकर खरेदी आणि साठवण सुरू केली असावी. सुरवातीच्या स्थितीमध्ये खरेदी करून भविष्यातील बाजारातील वाढत्या किमतीचा लाभ घेण्याचा त्यांचा विचार असावा.
मात्र, सध्या अचानक वाढलेल्या किमतीमुळे बहुतांशी व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी काही प्रमाणात खरेदी करणे थांबवल्यामुळे काही भागांमध्ये किमती कमी होत असल्याचेही चित्र आहे. नव्या हंगामातील आल्याची काढणी ऑक्टोबरच्या मध्यावर सुरू होईल. डिसेंबर अखेरपर्यंत प्रक्रियेचा हंगाम चालेल. त्यापूर्वी आल्याची निर्यात बाजारपेठ तुलनेने स्थिर राहील, असा अंदाज आहे. अर्थात हे सारे उत्पादन आणि व्यापाऱ्यांच्या एकूण कलानुसार ठरेल.

इतर ताज्या घडामोडी
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...
धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे...धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने...
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २०...सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर...
शेतकऱ्यांना दरवर्षी दहा हजार देणारच :...इस्लामपूर, जि. सांगली  : ‘‘ गेल्या पाच...
उत्पादन खर्चावर आधारित दर हवेत :...भारत हा शेतीप्रधान देश असे आपण म्हणत असतो. मात्र...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच : उध्दव...सोलापूर : ‘‘शिवसेना बोलते ते करते, आम्ही...
अकोला जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव...अकोला ः शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून...
पीकविम्याबाबत असुरक्षिततेचीच भावना...केंद्र सरकारने मोठा गाजा-वाजा करीत जाहीर केलेल्या...
`चासकमान`मधील आवर्तन तब्बल ८९...चास, जि. पुणे  ः चासकमान (ता. खेड) धरणातून...
पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यावर भर...आपला देश सध्या आर्थिक संकटातून जात आहे. हे संकट...
परभणीत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील...
पाच जिल्ह्यात पीकविमा योजनेत ४५ लाख ९०...लातूर : खरीप हंगाम २०१९ मध्ये लातूर,...
नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे...नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली...
जळगावात कोबी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
नारळ बागेत आंतरपिके फायदेशीरसुरवातीच्या काळात नारळ बागेत भाजीपाला, केळी, अननस...
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...