फ्रान्समध्ये मुळ्यांचा हंगाम दोन आठवडे लवकर सुरू

फ्रान्समध्ये मुळ्यांचा हंगाम दोन आठवडे लवकर सुरू
फ्रान्समध्ये मुळ्यांचा हंगाम दोन आठवडे लवकर सुरू

फ्रान्समधील मुळ्यांचा हंगाम दोन आठवडे लवकर सुरू होणार असल्याची माहिती येथील शेतकरी व व्यापारी देत आहेत. या वर्षी कमी थंडीच्या पार्श्वभूमीवर काढणी लवकर सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ला फ्रंटियर पॅनियर मॅलिनचे संचालक ख्रिस्तोफर बॉनेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या स्थानिक उत्पादकांनी १३ दिवसांपूर्वीच मोठ्या काढणीला सुरवात केली आहे. या वर्षी थंडी कमी राहिल्यामुळे मुळ्यांचा हंगाम लवकर सुरू होईल. हंगामी मुळे आकाराने मध्यम असून, चवीला चांगले असतात. बाजारामध्ये काही प्रमाणामध्ये मागणी असली तरी किमतीमध्ये फारशी वाढ दिसत नाही. जेव्हा लेट्यूस किंवा मुळे काही प्रांतामध्येच येतात, त्या वेळी किमती अधिक होतात. मात्र, या वेळी सर्व प्रांतामधून आवक होण्याची शक्यता दिसत आहे. ला फ्रंटियर ही कंपनी दोन उपकंपन्यांची बनलेली असून, प्रामुख्याने व्यवसाय ते व्यवसाय अशा स्वरूपाची विक्री व्यवसायात आहे. प्रामुख्याने शाळा, हॉस्पिटल्स, कंपन्या यांच्या स्वयंपाकघरासह हॉटेल उद्योगांना आवश्यक ती उत्पादने पुरवते. दुसरी कंपनी ही घावून पद्धतीने फळे आणि भाज्यांची विक्री करते. दर आठवड्याला १५०० ते २००० बास्केटची विक्री करत असल्याचे ख्रिस्टोफर यांनी सांगितले. यामध्ये शंभर टक्के सेंद्रिय बास्केटचाही समावेश आहे. अगदी खेळाडूंसाठी आवश्यक पोषक घटकांची पूर्तता करणारी बास्केटही उपलब्ध आहे. संपूर्ण फ्रान्समधून कोठूनही मागणी आल्यास केवळ २४ तासांमध्ये माल पुरवण्याची व्यवस्था उभी केली आहे. रेडी टू इट उत्पादनांना मागणी वाढतेय गेल्या काही वर्षामध्ये अर्ध प्रक्रिया झालेल्या किंवा सरळ खाण्यायोग्य मुळ्यांच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. आमचे काही ग्राहक वाफवलेल्या मुळ्यांची मागणी करत आहेत. ती पुरवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कच्चा स्वरूपातील मुळ्यांच्या गड्ड्यांनाही चांगली मागणी असते. मुळे हे वालुकामय जमिनीतही चांगल्या प्रकारे येतात. त्यामुळे व्हाल डी सॅवोन भागामध्ये मुळ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. अलीकडे ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन काही शेतकरी लेट्यूस, कंद भाज्या, कोबी, हिरव्या शेंगा पिकांकडे वळले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com