agricultural stories in Marathi, agrovision, | Agrowon

हॉर्सशू खेकडे हे कोळ्यांच्या अत्यंत जवळचे

वृत्तसेवा
मंगळवार, 19 मार्च 2019

घोड्याच्या पायासारख्या दिसणाऱ्या खेकड्यांना इंग्रजीमध्ये हॉर्सशू क्रॅब म्हणून ओळखले जाते. त्यांचे जनुकीय विश्लेषण करण्यात आले असून, ते जनुकीयदृष्ट्या कोळी किंवा विंचवाच्या अत्यंत जवळचे असल्याचे दिसून आले आहे. विस्कॉन्सिन मॅडीसन विद्यापीठातील प्रशांत शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्याच प्रयोगशाळेमध्ये पोस्ट डॉक्टरलसाठी संशोधन करणारे जेझूस बॅल्लेस्टेरोस शर्मा यांचे हे संशोधन ‘जर्नल सिस्टेमॅटीक बायोलॉजी’ मध्ये प्रकाशित झाले आहे.

घोड्याच्या पायासारख्या दिसणाऱ्या खेकड्यांना इंग्रजीमध्ये हॉर्सशू क्रॅब म्हणून ओळखले जाते. त्यांचे जनुकीय विश्लेषण करण्यात आले असून, ते जनुकीयदृष्ट्या कोळी किंवा विंचवाच्या अत्यंत जवळचे असल्याचे दिसून आले आहे. विस्कॉन्सिन मॅडीसन विद्यापीठातील प्रशांत शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्याच प्रयोगशाळेमध्ये पोस्ट डॉक्टरलसाठी संशोधन करणारे जेझूस बॅल्लेस्टेरोस शर्मा यांचे हे संशोधन ‘जर्नल सिस्टेमॅटीक बायोलॉजी’ मध्ये प्रकाशित झाले आहे.

हॉर्सशू क्रॅब हे प्राणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ आहेत. त्यांचे रक्त निळे असून, कवचासह दहा वाकडे पाय असतात. पूर्वी त्यांना खेकडे, झिंगे व अन्य कवचधारी प्राण्यांपैकी एक मानले जात असे. मात्र १८८१ मध्ये उत्क्राती जीवशास्त्रज्ञ इ. रे लॅन्केस्टर यांनी कोळी, विंचवाच्या वर्गाशी त्यांचे साम्य असल्याचे खात्रीने सांगितले. तेव्हापासून त्यांना आर्चेनीड्स मानले जात असले तरी त्यांचा मूलद्रव्यीय संरचना माहिती ही कोळी आणि विंचवाच्या अधिक जवळची असल्याचे दिसून आले.

हॉर्सशू क्रॅब विषयीच्या या संशोधनामुळे कोळी वर्गीय सजीवांच्या उत्क्रांतीची गृहितके पुन्हा तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. अष्टपाद सजीव हे पृथ्वीवरील सर्वात यशस्वी मानले जातात. त्यांच्या लक्षावधी जाती असून, त्यांनी जमीन, पाणी आणि आकाश व्यापलेले आहे. या गटामध्ये कीटक, कवचधारी जलचर, कोळीवर्गीय सजीवांचा समावेश होतो. या साऱ्यामध्ये घोड्याच्या नालेसारखे खेकड्यांचे वर्गीकरण करणे आव्हानात्मक ठरत आहे. कारण जनुकीय विश्लेषणामध्ये ते कोळी, विंचू, कातीण, गोचीड यांच्या अत्यंत जवळचे असल्याचे बॅल्लेस्टेरोज यांनी सांगितले. त्यांच्या शरीरावरील कवच हे खेकड्यासारखे असून, हे सागरी जीव कल्ल्यांच्या साह्याने श्वसन करतात. या कल्ल्यांची (बुक गील्स) रचना जमिनीवरील कोळी आणि विंचवाच्या फुफ्फुसाप्रमाणे असल्याचे दिसून येते.

अधिक चोखंदळपणा आवश्यक

  • आज पृथ्वीवर हॉर्सशू क्रॅबच्या केवळ चार जाती शिल्लक राहिल्या आहे. मात्र, त्यांच्या गटातील पहिला जीवाश्माची नोंद ४५०० लक्ष वर्षापूर्वीची आहेत. ते सागरी कोळ्याच्या अत्यंत जवळचे आहे.
  • सध्या शिल्लक असलेल्या चारपैकी तीन जातींचे संपूर्ण जनुकीय विश्लेषण करण्यात आले असून, त्यांची तुलना ५० अन्य अष्टपाद सजीवांशी केली आहे. कोणत्याही गृहितकांचा विचार करण्याऐवजी केवळ तथ्य काय सापडते, यावर लक्ष केंद्रित केले आहे.
  • आपण समजतो, तेवढी उत्क्रांती ही सरळ आणि सोपी नाही. उत्क्रांतीची प्रक्रिया प्रचंड गुंतागुंतीची असून, त्यावर सतत काम करत राहण्याची आवश्यकता आहे. एकाच कुळातील किंवा गणातील विविध सजीवांमध्ये वेगळी असलेली शेकडो जनुके ही नेमकी कोठून आली, यासाठी जनुकीय माहिती साठ्यांचे विश्लेषण अधिक चोखंदळपणे करण्याची आवश्यकता त्यातून पुढे आली आहे.

 

टॅग्स

इतर बातम्या
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
महिला बचत गट आर्थिक प्रगतीचा मार्ग ः...सोलापूर  ः  महिला बचतगट हे ग्रामीण...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...