agricultural stories in Marathi, agrovision, Since 1990s, heart attacks have become less deadly | Agrowon

प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमी

वृत्तसेवा
मंगळवार, 19 मार्च 2019

गेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि त्यावरील उपचारामध्ये सुधारणा होत गेल्या असून, अमेरिकन प्रौढातील हृदयरोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण १९९० च्या तुलनेमध्ये लक्षणीय कमी झाल्याचा निष्कर्ष येल विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे.

१९९५ ते २०१४ या काळामध्ये ४० लाख लोकांच्या रुग्णांचा आढावा या संशोधनासाठी घेण्यात आला होता. आजवरचा अमेरिकेतील हृदयरोगासंदर्भातील सर्वात मोठा आणि एकात्मिक अभ्यास असल्याचे सांगण्यात येते.

गेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि त्यावरील उपचारामध्ये सुधारणा होत गेल्या असून, अमेरिकन प्रौढातील हृदयरोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण १९९० च्या तुलनेमध्ये लक्षणीय कमी झाल्याचा निष्कर्ष येल विद्यापीठातील संशोधकांनी काढला आहे.

१९९५ ते २०१४ या काळामध्ये ४० लाख लोकांच्या रुग्णांचा आढावा या संशोधनासाठी घेण्यात आला होता. आजवरचा अमेरिकेतील हृदयरोगासंदर्भातील सर्वात मोठा आणि एकात्मिक अभ्यास असल्याचे सांगण्यात येते.

१. हृदयरोगासाठी रुग्णालयामध्ये दाखल होण्याच्या प्रमाणामध्ये ३८ टक्क्यांनी घट झाली आहे.
२. हृदयरोगाबाबतचा ३० दिवसांचा मृत्यू दर आजवरच्या सर्वात कमी पातळीवर म्हणजे १२ टक्क्यांवर आला आहे. १९९५ पासून असा खाली येण्याची ही तिसरी वेळ आहे.

गेल्या काही वर्षातील संशोधनामुळे ही लक्षणीय झेप घेता आल्याचे येल विद्यापीठातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हार्लन कृमहोल्झ यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, की गेल्या वीस वर्षापासून राष्ट्रीय पातळीवर हृदयरोगाला प्रतिबंध करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रयत्नामुळे आणि उपचारातील सुधारणांमुळे ही स्थिती गाठली आहे.

विविध उपचार केंद्रे आणि अमेरिकन हृदयरोगशास्त्र महाविद्यालय आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञ यांनी आरोग्यदायी जीवनशैली, धोक्याच्या घटकांना लक्ष्य करत उपचाराची प्रत सुधारली असल्याचे संशोधकांनी नमूद केले.
अमेरिकेच्या प्रांतनिहाय निष्कर्षानुसार आरोग्यविषयक सुविधांची कमतरता असलेले भाग ओळखून त्यावर काम करण्यात येणार आहे. या विभागांमध्ये ३० दिवस मृत्यूदरांमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये फारच कमी बदल झाला किंवा अजिबात फरक झाला नाही. आमच्या पाहणीमध्ये हृदयरोगाचा व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा ऐतिहासिक कमी दर आढळला आहे. अर्थात यावर संतुष्ट राहण्याची आवश्यकता नाही. कारण वैद्यकीय उपचाराच्या इतिहासातून हृदयरोग कायमचा दूर करण्याचे अंतिम लक्ष्य असून, ते अद्याप प्रचंड दूर आहे, असे डॉ. हार्लन कृमहोल्झ म्हणाले.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण...वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत...
पंधरा लाख कापूस गाठींची खानदेशातील...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
शेतीमाल निर्यातवाढीसाठी सुकाणू समितीची...पुणे : राज्य सरकारने स्वतंत्र कृषी निर्यात धोरण...
बियाणे परवान्यासाठी केंद्रीय पद्धती...नवी दिल्ली: केंद्र सरकार सुधारित बियाणे विधेयक...
शिवनेरीवर उद्या शिवजयंती सोहळापुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या...
चीनला होणाऱ्या कोळंबी निर्यातीला फटकानवी दिल्ली: चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान...
कापूस, मक्यावरील अळी नियंत्रणाचे काम...अकोला ः नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस,...
किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाजपुणे : राज्यात कमाल व किमान तापमानात सातत्याने...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...