कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य ः पुरुषोत्तमन्

कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य ः पुरुषोत्तमन्
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य ः पुरुषोत्तमन्

२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा दुहेरी अंकातील वाढ नोंदवली असून, गेल्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये २०१९ हे वर्ष उत्तम राहण्याची शक्यता कंपनीचे अध्यक्ष रविचंद्रन पुरुषोत्तमन् यांनी वर्तवली आहे. ही कंपनी कृषी क्षेत्रासह विविध उद्योगांसाठी आवश्यक यंत्रांचे उत्पादन करते. त्यांनी केलेल्या विश्लेषणानुसार, अन्न आणि अन्न प्रक्रिया उद्योग, स्थावर आणि अर्थ मुव्हिंग उपकरणे आणि ऊर्जा अशा क्षेत्रामध्ये चांगले वातावरण होते. अर्थात, याला भांडवली गुंतवणूक आणि बॅंकिंग क्षेत्र यांच्या कमजोर वाटचालीला फटका बसू शकतो. २०१९ मध्ये भांडवली गुंतवणूक वाढीच्या टप्प्यात असून, सिंमेटच्या वापरामध्ये वाढ होऊ शकते. येत्या काळातील निवडणूकीचाही बाजारावर परिणाम दिसून येईल.

  • काढणीपश्चात अन्नधान्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी अन्नविषयक धोरणे आक्रमक असले पाहिजे. उत्तम शेती व्यवस्थापनासाठी तमिळनाडू राज्याने चांगली पावले उचलली आहे. येत्या काळात शीतसाखळीची वाढ ३० दशलक्ष टनापासून ३८ दशलक्ष ७ टनापर्यंत होऊ शकते. केळीचे होणारे १८ ते २० टक्के नुकसान येत्या दोन वर्षांमध्ये कमी होऊ शकेल. तमिळनाडू येथे केळीसाठी उत्तम वातावरण असून, केवळ ३० ते ३५ टक्के केळीची पिकवण शास्त्रीय पद्धतीने होते. निर्यातीसाठी प्रमाणिकरण आवश्यक असूनही राज्यामध्ये अपेडा प्रमाणित एकही प्रयोगशाळा नाही. आमच्या अपेक्षेनुसार एक थोड्याच काळात सुरू होईल. अर्थात, या क्षेत्रामध्ये सुधारणेला मोठा वाव असल्याचेही पुरुषोत्तमन यांनी सांगितले.
  • आपल्या देशात विविध कृषी हवामान विभागात आणि विविधांगी तंत्रज्ञान असताना कृषी क्षेत्रामध्ये नव्या पिढीला आकर्षित करण्याची गरज आहे. मूल्यवर्धनासाठी भविष्य चांगले असून, शेतीला उद्योगाचा दर्जा दिल्याशिवाय त्यात सुधारणा होणार नाही.
  • देशामध्ये ४० टक्के स्टार्टअप हे कृषी आणि अन्न प्रक्रियेशी संबंधित आहेत. मात्र, लहान कंपन्यांसाठी बॅंकेतून भांडवल उपलब्ध होण्यामध्ये प्रचंड अडचणी आहेत. भारतामध्ये उद्योग व व्यवसाय करणे अत्यंत महागडे आहे. हे कर आणि खर्च कमी करण्याची आवश्यकता पुरुषोत्तमन यांनी व्यक्त केली.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com