जिवाणू वाऱ्यासह करतात हजारो मैलांचा प्रवास

जिवाणू वाऱ्यासह करतात हजारो मैलांचा प्रवास
जिवाणू वाऱ्यासह करतात हजारो मैलांचा प्रवास

प्रसारासाठी माणसे किंवा प्राण्यांवर अवलंबून राहण्याऐवजी जिवाणू हजारो मैल अंतर वाऱ्यासह कापू शकत असल्याचे मत रुट्जर्स विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या एअर ब्रीज गृहितकामुळे नुकसानकारक जिवाणूमध्ये प्रतिकारकता विकसित होण्यामागील कारणांचा शोध घेणे शक्य होईल. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल फिलॉसॉफिकल ट्रान्झॅक्शन्स ऑफ रॉयल सोसायटी बी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. न्यू ब्रुन्सविक येथील रुट्जर्स विद्यपाठीतील वॉक्समॅन इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबायोलॉजी येथील शास्त्रज्ञ कॉन्स्टटिन सेवेरिनोव्ह यांनी सांगितले, की आमच्या संशोधनानुसार, दूर अंतरावरील जिवाणूंमध्ये होत असलेल्या जनुकांच्या देवाणघेवाणीबाबत एखादी यंत्रणा असली पाहिजे. आम्ही दुर्गम भागातील अतिशय उष्ण पाण्यामध्ये १६० अंश फॅरनहिट राहणाऱ्या जिवाणूंचा अभ्यास करीत होतो. या ठिकामी कोणताही प्राणी, पक्षी किंवा माणूस त्यांचे वहन करण्यासाठी येणे फारसे शक्य नाही. त्यांचे वहन वाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात होऊन सामान्य गुणधर्मांची देवाणघेवाण होत असली पाहिजे. सेवेरिनोव्ह आणि अन्य संशोधकांनी जिवाणूंच्या मूलद्रव्यीय स्मरणाचा अभ्यास केला. जिवाणूंचा विषाणूंशी सामना झाल्यापासूनच्या सर्व गोष्टी जिवाणूंच्या डीएनएमध्ये साठवलेल्या असतात. शास्त्रज्ञांनी इटली येथील माऊंट इटना भागातील उष्ण झऱ्यातील आणि माऊंट वेसूवियस येथील उष्ण वाळवंटातील म्हणजेच उष्णता आवडणारे थर्मस थर्मोफिलस जिवाणू गोळा केले. त्याचप्रमाणे उत्तर चिली येथील इल टॅटिओ, दक्षिण चिली येथील टेर्मास डेल फ्लाको प्रांतातील उष्ण झरे आणि रशिया येथील कामचॅटरा येथील उझॉन कॅलडेरा येथील उष्ण झऱ्यातील जिवाणूंचे नमुने घेतले.

  •     बॅक्टेरिओफॅगस (जिवाणूंवरील विषाणू) हे पृथ्वीवरील मोठ्या प्रमाणात आढळणारे आणि सर्वव्यापी जीव आहेत. सूक्ष्मजीवांच्या संख्येवर विशेषतः समुदायाची संरचना आणि उत्क्रांतीवर विषाणूंचा मोठा प्रभाव असतो.  
  •     विषाणूंचा प्रादुर्भाव झालेल्या जिवाणू पेशींच्या डीएनएमध्ये एका विशिष्ट भागामध्ये (त्याला CRISPR arrays असे नाव आहे.) त्याविषयीच्या मूलद्रव्यीय स्मरण साठवलेले असते. ज्या पेशी त्या प्रादुर्भावातून वाचतात, त्या हे स्मरण विषाणूंच्या डीएनएचे लहान कण आपल्या पुढील पिढीकडे प्रवाहित करतात. यावरून शास्त्रज्ञांना जिवाणूंमध्ये झालेल्या विषाणूंच्या प्रादुर्भावाचा इतिहास मिळवता येतो.
  •     हजारो मैल दूर असलेल्या उष्ण झऱ्यांमधील एकाच जातीच्या जिवाणू हे एकटे असल्याने त्यांच्यांमध्ये विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या वेगवेगळे स्मरणखुणा असतील, असा कयास संशोधकांचा होता. त्यात जिवाणूंची उत्क्रांती ही वेगाने होत असल्याने त्यांच्यातील भिन्नता अधिक असावी, असेही वाटत होती.
  •     मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे हे उष्ण पाण्याचे झरे आणि त्यातील जिवाणू एकमेकापासून अत्यंत दूर असूनही त्यांच्या डीएनएतील स्मरणामध्ये एकसारखेपणा होता. म्हणजेच कोणत्या तरी मार्गाने त्यांच्यामध्ये माहितीची देवाणघेवाण होत असली पाहिजे. आमच्या विश्लेषणातून पर्यावरण आणि आरोग्याविषयी हानीकारक ठरणाऱ्या जिवाणूंमध्येही प्रतिजैविकांच्या प्रतिकारकतेची जनुके जागतिक पातळीवर पोचत असतील. त्यामागे कोणत्याही मानवी किंवा प्राणीय हस्तक्षेपापेक्षाही वाऱ्यांचे प्रवाह असण्याची शक्यता अधिक वाटते.
  •     या एअर ब्रीज गृहितकाची चाचणी करण्यासाठी जगभरातील विविध ठिकाणे आणि उंचीवर वाऱ्यांतील जिवाणूंचे नमुने घेण्यात येणार आहेत. या नमुन्यातील जिवाणूंची ओळख पटवली जाईल. त्यासाठी विमाने, ड्रोन आणि संशोधन बलुन्स यांची मदत घेण्यात येणार असल्याचे संशोधकांनी सांगितले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com