जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या कर्करोगाचा विकास

जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या कर्करोगाचा विकास
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या कर्करोगाचा विकास

फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील जिवाणूंची संख्येमुळे प्रोत्साहन मिळत असल्याचे मॅसेच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील कर्करोग जीवशास्त्रांच्या अभ्यासात आढळले आहे. फुफ्फुसातील ट्यूमर तेथील जिवाणूंच्या संख्येवर परिणाम करत असून, स्वतःच्या वाढीसाठी प्रतिकारकक्षमता कमी करण्यासोबतच अन्य दाहक वातावरण तयार करतो. कोह संस्थेतील पोस्ट डॉक संशोधक चेंगचेंग जीन यांनी केलेले हे संशोधन ‘सेल’ या संशोधनपत्रिकेच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. प्रयोगासाठी काही उंदरामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग जनुकीय पातळीवर तयार करण्यात आला. त्यांपैकी काही उंदरांचीची वाढ जिवाणूरहित वातावरणामध्ये करण्यात आली असता, कर्करोगाची वाढ सामान्य स्थितीमध्ये वाढवलेल्या उंदरांपेक्षा कमी झाल्याचे दिसून आले. पुढील टप्प्यामध्ये प्रतिजैविकांचा वापर करून किंवा जिवाणूंद्वारे रोखलेली प्रतिकारशक्ती कार्यान्वित करून फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण व संख्या कमी ठेवणे शक्य असल्याचेही आढळले आहे. या प्रयोगातून फुफ्फुसाचे नवीन कर्करोग तयार होण्याची प्रक्रिया रोखण्यासाठी उपचार प्रणाली विकसित करणे शक्य होईल, असा विश्वास आहे. या संशोधनाविषयी माहिती देताना एमआयटीचे संचालक टेलर जॅक्स यांनी सांगितले, की अभ्यासातून फुफ्फुसातील कर्करोगाच्या विकासामध्ये फुफ्फुसातील जिवाणू महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे दिसून आले आहे. यातून कर्करोगाची सुरवात आणि विकास या टप्प्यावर उपचार करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतील. जिवाणू आणि कॅन्सर यातील संबंध ः

  • फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे जगभरामध्ये प्रति वर्ष सुमारे १० लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यातील सुमारे ७० टक्के फुफ्फूस कर्करुग्णांमध्ये फुफ्फुसांमध्ये जिवाणूंच्या प्रादुर्भावामुळे गुंतागुंतीला सामोरे जावे लागते. त्यामुळे मॅसेच्यूसेट्स तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये या दोन्ही घटकांतील संबंधांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. जनुकीय सुधारणांद्वारे उंदरामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग (त्याचे इंग्रजी नाव adenocarcinoma) काही आठवड्यांमध्ये तयार करण्यात आला. वास्तविक उंदीर किंवा माणसांच्या फुफ्फुसामध्ये हानीकारक नसलेल्या अनेक जिवाणू असतात. खास कर्करोग विकसित केलेल्या उंदरामध्ये या जिवाणूंच्या संख्येमध्ये लक्षणीय बदल झाले. त्यांची संख्या वेगाने वाढली असली तरी काही प्रजातींची संख्या वेगाने कमी झाली.
  • सध्या कर्करोग हे नेमके कशाप्रकारे घडवून आणतो, याविषयी नेमकी माहिती नसली तरी स्वतःच्या वाढीसाठी करून घेत असावा.
  • काही जिवाणूंच्या वाढलेल्या संख्येमुळे प्रतिकारक पेशी (गॅमा डेल्टा टी पेशी) वाढून, दाहकारक मूलद्रव्ये (सायकायनिन) स्रवतात. ही मूलद्रव्ये विशेषतः आयएल१७ आणि आयएल २२ ही ट्यूमर पेशींच्या वाढ आणि तग धरण्यासाठी योग्य वातावरण तयार करतात.
  • या प्रक्रियेतून अन्य एका प्रकारच्या प्रतिकारक पेशी (न्युट्रोफिल्स) कार्यान्वित होतात आणि त्यातून दाहकारकपूर्व रसायने बाहेर पडतात. त्यामुळेही ट्यूमरच्या वाढीसाठी पोषक स्थिती तयार होते.
  • जीन यांनी सांगितले, की ट्यूमरच्या विकासामध्ये काही स्थानिक जिवाणूंचे सहकार्य घेतले जाते. त्यासाठी विकसित होणाऱ्या ट्यूमरकडून प्रचलित प्रतिकारकपेक्षा हायजॅक केल्या जातात. त्यामुळे जिवाणूरहित वातावरणामध्ये जन्म झालेल्या व वाढवलेल्या उंदरांमध्ये ही प्रतिकारक प्रक्रिया कार्यान्वित होत नाही आणि ट्यूमरची वाढही अत्यल्प होताना दिसली.
  • ट्यूमरची वाढ रोखण्यासाठी ः

  • उंदरांवर प्रतिजैविकांची प्रक्रिया केली असता दोन किंवा सात आठवड्यांमध्ये ट्यूमरची वाढ सुरू झाली आणि त्याचा आकारही ५० टक्के इतकाच राहिला. त्याच प्रमाणे गॅमा डेल्टा टी पेशी आणि आयएल १७ या प्रतिकारक पेशींना रोखल्सास ट्यूमरची वाढ रोखणे शक्य होते.
  • या औषधांचा वापर माणसांमध्येही करणे शक्य असल्याचे संशोधकांचे मत आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com