मधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत बदल

मधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत बदल
मधमाशी भक्षकांमध्येही व्हरोवा कोळ्यांमुळे होताहेत बदल

कॅलिफोर्निया - रिव्हरसाईड विद्यापीठातील संशोधकांनी हवाई बेटांवरील मधमाश्यांचा व त्यावरील भक्षक गांधीलमाश्यांचा अभ्यास केला असून, त्यावर व्हरोवा कोळ्याशी निगडित अशा विषाणूंचा शोध घेतला आहे. विषाणूमध्ये आजवर अज्ञात असलेले, मात्र तरिही लक्षणीय असे जनुकीय बदल होत असून, त्याचा फटका कोळी, मधमाश्या आणि गांधीलमाश्यांना बसू शकतो. हे संशोधन ‘प्रोसिडिंग्ज ऑफ दी रॉयल सोसायटी बी’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मधमाश्यांच्या शरीरावर लालसर तपकिरी रंगाचा व्हरोवा कोळी हा परजिवी आढळतो. हवाई येथील मोठ्या बेटावर २००७-०८ मध्ये अपघाताने तो मधमाश्यामध्ये प्रथम आढळला. आता जगभरामध्ये सर्वत्र, ज्या ठिकाणी मधमाश्या आहेत, तिथे या परजिवीचा आढळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बेटावर कॅलिफोर्निया -रिव्हरसाईड विद्यापीठातील किटकशास्त्रज्ञांनी अभ्यास केला असून, यलोजॅकेट या मधमाश्यांच्या शरीरावर आढळणाऱ्या व्हरोवा कोळ्यामुळे होणाऱ्या विषाणूंवर लक्ष केंद्रित केले. त्याविषयी माहिती देताना सहाय्यक प्रा. इरीन इ. विल्सन रॅन्कीन यांनी सांगितले, की मधमाश्यांवर आढळणाऱ्या परजिवींमुळे पसरणाऱ्या विविध विषाणूंजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्याचा फटका जगभरातील मधमाश्यांच्या वसाहतींना बसत आहे.

  • संशोधकांना डिफॉर्मड् विंग व्हायरस (DWV) च्या विविधतेमध्ये घट होत असल्याचे दिसून आले आहे. त्यातून नव्या प्रजाती तयार होत असून, त्यांचे नेमके काय परिणाम होतील, याविषयी अंदाज बांधणे अवघड आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव बंबलबी सोबतच अन्य किटकांमध्ये आढळला आहे. यलो जॅकेट गांधीलमाशीमध्ये या विषाणूंचा प्रादुर्भाव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या मधमाश्यांमुळे आला असावा.
  • हवाई बेटांवर केलेल्या संशोधनामध्ये संशोधकांना मधमाशी आणि यलोजॅकेट गांधीलमाशींच्या व्हॅरोवा कोळी प्रादुर्भावपूर्व आणि नंतर अशा दोन्ही स्थितीमध्ये अभ्यास करणे शक्य झाले. अनेक सूक्ष्मरोगकारक घटकांचा प्रादुर्भाव बेटांवर मधमाशी आणि गांधीलमाश्यांमध्ये कोळ्यांच्या प्रादुर्भावानंतरच दिसून लागल्याचे स्पष्ट झाले.
  • विल्सन रॅन्कीन म्हणाल्या की, पश्चिमी यलोजॅकेट गांधीलमाश्यांमध्ये रोगकारक घटकांचा प्रादुर्भाव प्रथमच आढळला असून, तो व्हरोवा कोळ्याच्या प्रादुर्भावानंतर दिसत आहे. हा प्रादुर्भाव होण्याचे कारण म्हणजे गांधीलमाश्याची मधमाश्यांवर जगण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असून, त्याद्वारे गांधीलमाश्यांमध्ये रोगकारक घटकांचा प्रादुर्भाव वाढला असावा. हे रोगकारक घटक पहिल्यांदा मधमाश्यांमध्ये आढळले म्हणून त्यांना मधमाश्यांवरील रोगकारक घटक म्हणून चुकीची ओळख बनली आहे. हे विषाणू अन्य अनेक किटकांमध्येही आढळतात.
  • रॅन्कीन यांच्या मते, या रोगकारक घटकांचा प्रादुर्भाव विविध भक्षक किटकामध्ये आढळतो. कोळी हा गांधीलमाश्यांमध्ये विषाणूंचा प्रसार करत नाही. विषाणूंचा प्रसार हा भक्ष्यांकरवी आणि फुलांद्वारे होतो. भक्षक त्याचा प्रसार अन्य प्रजातींमध्ये करतात. उदा. यलोजॅकेट गांधीलमाशी ही मधमाशी आणि स्थानिक माश्यांवर उपजीविका करते.
  • जनुकीय बदल आणि धोक्याचा इशारा ः

  • संशोधकांनी २५-४५ मधमाशी आणि गांधीलमाशांचे नमुने तपासले. त्यानंतर प्रजातीनुसार प्रत्येकी १०० नमुने तपासण्यात आले. यात स्थानिक माश्यांच्या तुलनेत मधमाशी आणि यलोजॅकेट गांधीलमाश्यांवर लक्ष केंद्रित केले होते.
  • विल्सन रॅन्कीन यांच्या प्रयोगशाळेतील पोस्ट डॉक्टरल संशोधक केव्हिन लूपे म्हणाले, की स्थानिकीकरण झालेल्या मधमाश्यांकडून अन्य प्रजातीमध्ये होणारे रोगकारक विषाणूंचे वहन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातही वास्पमध्ये विषाणू अंतर्गत होणारे जनुकीय बदल आढळून आले आहेत. विषाणूंच्या संख्येमध्ये फारसे बदल दिसले नाहीत.
  • शेतीसाठी स्थानिकीकरण केलेल्या मधमाश्यांमुळे किटकांच्या जंगली प्रजातींवरही मोठा परिणाम होत आहे. मात्र, मधमाशांचे भक्षक असलेल्या गांधीलमाश्यांच्या नियंत्रणासाठी हा पर्याय वापरणे धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा लुपे देतात. कारण कोणताही जैविक नियंत्रणाचा पर्याय अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्व शक्यता अजमावल्यानंतरच वापरायचा असतो.
  • व्हरोवा कोळ्याच्या प्रादुर्भावापूर्वी आणि नंतर घेतलेल्या नमुन्यातील विषाणूंमध्ये आढळलेले जनुकीय विविधतेतील बदल हे लक्षणीय आहेत. आमच्या अंदाजानुसार गांधीलमाश्यांतील विषाणूंची विविधता ही त्यांच्या विविधतेसोबतच कमी होणे अपेक्षित होते. मात्र, अभ्यासाअंती तसे झाल्याचे आढळले नाही.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com