कोबीवर्गीय पिकांतील रोगप्रतिकारक जनुकांचा घेतला शोध

कोबीवर्गीय पिकांतील रोगप्रतिकारक जनुकांचा घेतला शोध
कोबीवर्गीय पिकांतील रोगप्रतिकारक जनुकांचा घेतला शोध

जगभरातील कोबीवर्गीय वनस्पतीमध्ये रोगांच्या प्रादुर्भावाला प्रतीकारक करणाऱ्या जनुकांचा शोध घेण्यात आंतरराष्ट्रीय संशोधक गटाला यश आले आहे. त्यामुळे भविष्यात पांढरा तांबेरा रोगासाठी प्रतीकारक जनुकीय सुधारित जातींचा विकास शक्य होणार आहे. कोबीवर्गीय पिकांमध्ये अनेक प्रकार असून, त्यांची लागवड जगभरामध्ये होते. त्यांचे कुळ ब्रासिसिई असे असून, त्यातत फूलकोबी, ब्रोकोली, कोबी यांच्यासोबतच मोहरीचाही समावेश होतो. या सर्व पिकांमध्ये व्हाइट रस्ट (पांढरा तांबेरा) प्रामुख्याने आढळून येतो. हा रोग अल्बुगो कॅण्डीडा या सूक्ष्मजीवामुळे होतो. हा सूक्ष्मजीव बुरशीप्रमाणे कार्य करीत असला, तरी बुरशी नाही. वाढीसाठी योग्य आर्द्रता आणि तापमान मिळताच पिकांवर प्रादुर्भाव करून पोषक अन्नद्रव्यांचा फडशा पाडतो.

  • या रोगाच्या प्रादुर्भावामुळे वनस्पती मरत नसली, तरी पानांवर उठलेल्या पांढऱ्या उंचवट्यांमुळे (पुढे ते तपकिरी रंगाचे होतात.) हे भाग खाण्यायोग्य राहत नाहीत. या रोगाच्या वाढीची पद्धती एखाद्या बुरशीजन्य रोगाप्रमाणे असल्याने बहुतांश शेतकरी केवळ बुरशीनाशकांचा वापर करतात. त्याचे चांगले परिणाम मिळत नाहीत. उत्पादनामध्ये मोठी घट येते. या रोगावर दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आठ युरोपियन विद्यापीठातील संशोधक आणि संशोधन केंद्रातील संशोधकांचा गट कार्यरत होता. हे संशोधन नॉरविक (इंग्लंड) येथील सॅन्सबरी प्रयोगशाळेच्या नेतृत्वाखाली केले जात होते.
  • कोर्डोबा विद्यापीठातील जनुकशास्त्र विभागातील संशोधक अमेय रेडकर व गटाने अल्बुगो कॅण्डीडा या सूक्ष्मजीवासाठी प्रतीकारक जनुकांचा शोध घेतला आहे. त्यांना न्यूक्लीओटाईड बायंडिंग लेयूसीन रिच रिपीट्स (एनएलआर ) म्हणतात. सध्या अर्बिडॉप्सीस थॅलिना या वनस्पतीवर प्रयोगशाळेमध्ये प्रयोग केले जात आहे. पुढे त्यातून विविध पिकांच्या नव्या जनुकीय सुधारित जातींचा विकास करणे शक्य होईल.
  • हे संशोधन जर्नल प्रोसिडिंग्स ऑफ दी नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
  • संशोधनाला चालना ः कोर्डोबा विद्यापीठातील जनुकशास्त्राचे प्रो. अॅन्टोनियो डी पियेत्रो यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य सुरू आहे. त्यासाठी युरोपियन महासंघाच्या मारी स्क्लोडोवस्का- क्युरी अॅक्शन प्रोग्रॅम अंतर्गत आर्थिक साह्य उपलब्ध करण्यात आले आहे. टोमॅटो, केळीसह शेकडो पिकांमध्ये प्रादुर्भाव कऱणाऱ्या फ्युजारियम ऑक्सिस्पोरम या बुरशीच्या प्रादुर्भाव करण्याच्या यंत्रणेचा प्रामुख्याने अभ्यास केला जात आहे. अशा सूक्ष्मजीवांमुळे होणारे पिकांचे संरक्षण करून होणारे नुकसान रोखण्यासाठी या प्रकल्पामध्ये काम सुरू आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com