शेतीमालाच्या स्वच्छतेसाठी पाणीविरहित प्रक्रिया विकसित

शेतीमालाच्या स्वच्छतेसाठी पाणीविरहित प्रक्रिया विकसित
शेतीमालाच्या स्वच्छतेसाठी पाणीविरहित प्रक्रिया विकसित

पाण्याच्या वापराशिवाय शेतीमालाची स्वच्छता करणारी प्रक्रिया कॅनडा येथील क्लोन वर्क्स या कंपनीने विकसित केली आहे. या प्रक्रियेमध्ये त्यांनी अतिनील प्रकाश आणि वायूरूपातील हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर केला आहे. ही प्रक्रिया केवळ ३० सेकंदामध्ये पूर्ण होत असून, ९९ टक्क्यांपर्यंत हानिकारक सूक्ष्मजिवांना नष्ट करत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या प्रक्रियेमुळे शेतीमालाचा साठवण कालावधी २५ टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचेही सांगितले आहे.   बहुतांश शेतीमालाचा संपर्क हा मातीबरोबर येतो. मातीद्वारे विविध सूक्ष्मजीव फळे व भाज्यांमध्ये येतात. अशा हानिकारक सूक्ष्मजिवामुळे विषबाधा होण्याचे अनेक प्रकार सातत्याने पुढे येतात. २०१४ मध्ये कॅरामल सफरचंदाद्वारे उद्भवलेल्या लिस्टेरियाच्या प्रादुर्भावामुळे नायगारा प्रांतातील बिम्सव्हिले (ओंतुरियो) येथील सफरचंद उत्पादक असलेल्या मोयेर यांना प्रत्यक्ष फटका बसला नसला तरी विक्रीवर काही प्रमाणात परिणाम नक्कीच झाला होता. त्याविषयी माहिती देताना मोयेर म्हणाले, की २०१४ मधील लिस्टेरियाच्या प्रादुर्भावामुळे आमचे डोळे उघडले. असे प्रादुर्भाव टाळण्यासाठी व अन्न सुरक्षिततेच्या दृष्टीने आमचा अधिक विचार सुरू झाला. आमच्या ग्राहकांना उत्तम अन्न आणि सुरक्षित अन्न देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मोयेर यांची अॅपल प्रोडक्ट्स ही कंपनी आहे. त्यांच्या कंपनीला २०१७ मध्ये ओन्तुरियो सरकारचा नावीन्यपूर्ण कृषी अन्न सर्वोत्कृष्ठता पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी शेतीमालाच्या सुरक्षिततेसाठी कोर्ट होल्डिंग्ज लि. यांच्यासोबत क्लोन वर्क्स ही कंपनी स्थापन केली. त्यांच्यासह विकसित केलेल्या या प्रक्रियेला कंपनीने क्लोन व्हेरिफिकेशन असे नाव दिले. अशी आहे ही प्रक्रिया

  • कोणत्याही शेतीमालाच्या स्वच्छतेसाठी पारंपरिकरित्या पाण्याचा वापर केला जातो. पाण्याच्या संपर्कामुळे विघटनाचे प्रमाण वाढते. अन्य सूक्ष्मजीव नंतरच्या टप्प्यात आकर्षित होण्याचा धोका असतो. एकाच पाण्यामध्ये भाज्या किंवा शेतीमालाची सामान्यतः स्वच्छता होत असते. त्यामुळे पहिल्या काही भाज्यांनंतर धुतल्या जाणाऱ्या भाज्यावर आधीच्या भाज्यातून बाहेर पडलेल्या घाणीचा थर बसण्याचा धोका राहतोच. पाणी विरहित सोपी, सुरक्षित अशा पद्धतीचा शोध सुरू केला.
  • सामान्यतः अतिनील किरणांच्या प्रक्रियेद्वारे भांडी व अवजारे स्वच्छ करण्यात येतात, फळे नाहीत, असे आम्हाला सांगण्यात आले. मोयेर यांनी ओन्तुरियो येथील एका कंपनीमध्ये, कॅलिफोर्नियातील द्राक्ष उत्पादकांकडे चल स्वरूपातील स्वच्छता यंत्रे पाहिली होती. त्यात अतिनील किरण आणि हायड्रोजन पेरॉक्साईडचे वायू स्वरूप यांचा अंतर्भाव केला.
  • या प्रक्रियेमुळे शेतीमालाच्या साठवण कालावधीमध्ये दुप्पटीने वाढ झाली.
  • पाण्याचा वापर नसल्याने पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
  • शेतीमालावरील ९९ टक्क्यांपर्यंत सूक्ष्मजीव नष्ट होतात.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com