भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठ

भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठ
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठ

कार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा नातेवाइकांनी सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी चॉकलेट निर्मितीच्या नव्या व्यवसायाचे गणित मांडले. यात कोकोआ झाडांची लागवड आणि चॉकलेट विक्रीचा समावेश होता. कुमारने आपली अभियंत्याची नोकरी सोडून पूर्ण वेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. प्रथम कोकोआ बियांचे उत्पादन आणि निर्यात या अनुषंगाने विचार सुरू होता. वास्तविक भारतामध्ये कोकोआचे फारसे उत्पादन होत नाही. कोकोआचे सर्वात मोठे उत्पादन आयव्हरी कोस्ट, घाना, मेक्सिको, इक्वेडोर, ब्राझील, कॅमेरून आणि नायजेरिया या देशांमध्ये होते. पहिले उत्पादन हाती येताच पलानीसामी यांच्याबरोबर चॉकलेट तयार करण्याचे प्रयोग सुरू झाले. त्यांनी केलेले नमुने त्यांनी चेन्नई येथील प्रमाणित चॉकलेट टेस्टर एल. नितीन चोरडिया यांच्याकडे तपासणीसाठी नेले. या चॉकलेटला वेगळीच चव असल्याचे लक्षात आले. पहिल्यांदा त्यांना नैराश्य आले तरी या चवीचाच फायदा उचलण्याचे त्यांनी ठरवले. कोकोआच्या बिया ते चॉकलेट बार उत्पादनाचा मार्ग तयार झाला. त्याचा सॉकलेट (म्हणजे शेतकरी) हा ब्रॅंड तयार झाला. या चॉकलेटची किंमत २०० ते २२० रुपये असून, दरमहा ७००० चॉकलेटबार विकले जातात. सध्या चॉकलेट उद्योगामध्ये मसान अॅण्ड कं., पास्कती, अर्थलोफ, मलाबार सिक्रेट्स आणि कोकोट्रेट या अन्य भारतीय अशा चॉकलेट कंपन्या कार्यरत आहेत. या सर्व कंपन्या चॉकलेटला भारतीय चव, स्वाद आणण्यासाठी प्रयोग करत आहेत. त्यात शेंगदाण्यापासून, अक्रोडपर्यंतच नव्हे भारतीय सर्वात तिखट मिरची भूत झोलोकिया यांचेही स्वाद समाविष्ट केले जात आहेत. स्थानिक मसाले, चवी यातून नाविन्य आणले आहे. यातून दक्षिण अमेरिकी आणि आफ्रिकन चॉकलेट कंपन्यांशी स्पर्धा केली जात आहे. चोरडिया यांच्या मते, सन २०२० कोकोओ शेती ते चॉकलेट निर्मिती या व्यवसायामध्ये किमान ३० कंपन्या भारतात कार्यरत असतील. त्यांची स्वतःचीही कंपनी असून, कोकोआट्रेट ब्रॅंडअंतर्गत विक्री केली जाते. असा आहे हा व्यवसाय

  • ककोओ हे अत्यंत शुद्ध चॉकलेट असून, त्यावर उष्णता प्रक्रियेनंतर कोकोआ तयार होते. त्याचा उपयोग पुढे चॉकलेट निर्मितीसाठी केला जातो.
  • चॉकलेट बाजारपेठेची वाढ २०११ ते २०१५ या काळात - १९.९ टक्के
  • अपेक्षित वाढ २०.६ टक्के
  • जागतिक पातळीवर ककोओचे दर सातत्याने कमी-जास्त होत असतात. ते मार्च २०११ मध्ये सर्वोच्च पातळीवर म्हणजे ३८२६ डॉलर प्रति टन होते, तर २०११ डिसेंबरमध्ये सर्वात कमी १८१५ डॉलर प्रति टन होते.
  • गेल्या वर्षी जागतिक पातळीवरील मर्यादित पुरवठ्यामुळे कोकोओचे फ्युचर्स मार्केट २८ टक्क्यांनी बदलले होते. पर्यायाने भारतीय शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी स्वतः मूल्यवर्धनाकडे वळावे लागले होते.
  • सध्याच्या शेती ते चॉकलेट बार ही बाजारपेठ ६ ते ८ कोटी रुपयांची असून, पुढील दोन तीन वर्षामध्ये दरवर्षी २०० ते २५० टक्क्यांनी वाढत जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ती ५० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता चोरडिया यांनी व्यक्त केली.
  • अशा आहेत या व्यवसायातील कंपन्या

  • देशातील सर्वात मोठी चॉकलेट उत्पादक कंपनी मॅसोन अॅण्ड कं. ही तमिळनाडू येथे असून, दरमहा सुमारे १२ हजार बार बनविले जातात. पाच वर्षापूर्वी स्थापन झालेल्या कंपनीचे संस्थापक जेन मॅसोन आणि फॅबियन बॉन्टेम्स हे आधी तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक येथे ककोओ उत्पादन घेत होते. आज हा ब्रॅंड मुंबई, दिल्ली, बंगळूरसह १२ शहरांतील सुमारे १०० स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.
  • पास्कती फूड्सचे भागीदार व चॉकलेटीअर देवांश आशेर म्हणाले, की अद्याप पारंपरिक गोड अशा चॉकलेटचीच सवय बहुतांश लोकांना आहे. मात्र, नाविन्य लोकांना आवडतही आहे. त्यांच्या कंपनीची वार्षिक चॉकलेट विक्री केवळ तीन वर्षात ८ लाख रु. पासून ८० लाख रुपयांपर्यंत पोचली आहे.
  • कोची येथील सिंथेटे ही नैसर्गिक अन्नघटकांच्या निर्मितीतील सुमारे १६०० कोटी मूल्य असलेली कंपनी असून, त्यांनीही या महिन्यामध्ये शेत ते चॉकलेट बार अशी कंपनी सुरू केली आहे. त्यांचे ब्रॅंड पॉल अॅण्ड माईक असा असून, त्याअंतर्गत सीताफळ, हापूस आंबा, जांभूळ, अॅमेझोनिन पिंक पेपर, बाल्कन रोज अशा चवी बाजारात आणल्या आहेत. त्यांचे बार हे ७० ग्रॅम आणि १४ ग्रॅम असे आहेत.
  • चॉकलेट डिझायनर बिना रामानी यांनी मसालेदार चॉकलेटचा मलाबार सिक्रेट्स हा ब्रॅंड आणला असून, कॅडबरीसह अनेकांनी तो उचलून धरला आहे. यासाठी त्या स्वतःच्या चिकमंगळूर येथील शेतातील ककोओ वापरतात.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com