agricultural stories in Marathi, agrovision, CLIMATE CHANGE MAKES DIFFERANCE TO Europe | Agrowon

हवामान बदलाचा युरोपियन देशांना फटका
वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

युरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती देशांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण ३८ टक्के असून, सुमारे ९८ टक्के कृषी उत्पादने ही आयात केली जात असल्याची बाब वॉटर फूटप्रिंट नेटवर्क संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये मांडण्यात आली आहे. बदलत्या हवामानामुळे वाढत असलेल्या अवर्षणाच्या स्थितीचा फटका युरोपातील अनेक देशांना जाणवणार आहे.

युरोपमध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अन्य सीमावर्ती देशांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण ३८ टक्के असून, सुमारे ९८ टक्के कृषी उत्पादने ही आयात केली जात असल्याची बाब वॉटर फूटप्रिंट नेटवर्क संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये मांडण्यात आली आहे. बदलत्या हवामानामुळे वाढत असलेल्या अवर्षणाच्या स्थितीचा फटका युरोपातील अनेक देशांना जाणवणार आहे.

सध्या होत असलेली कृषी उत्पादनाची आयात ही तुलनेने दुष्काळाचा कमी किंवा मध्यम धोका असलेल्या देशातून होत आहे. मात्र, भविष्यामध्ये तीव्र हवामानाच्या स्थितीचा फटका युरोप खंडातील देशांना बसल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. त्याविषयी माहिती देताना डॉ. इर्तुग इर्सिन यांनी सांगितले, की युरोपीय संघ हा पाण्यासाठी अन्य देशांवर अवलंबून असून, विविध कृषी उत्पादनाची आयात करावी लागते. मात्र, या समस्येकडे तितक्याशा गांभीर्याने अद्याप पाहिले जात नाही. भविष्यामध्ये जागतिक तापमानातील बदलामुळे कृषी उत्पादनाचा तुटवडा पडू शकतो. त्यासाठी तयार राहण्याची आवश्यकता आहे.

पाण्याचे महत्त्व अधिक
डॉ. इर्सिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मतानुसार, युरोपीय संघाद्वारे विविध कृषी उत्पादनांचा विचार केला असता वार्षिक सुमारे ६६८ घन कि.मी. पाण्याचा वापर होतो. त्यातील तिसरा हिस्सा हा आयातीतून भागवला जातो. आयात होत असलेल्या प्रदेशातील पाण्याची कमतरता विचारात घेण्याची आवश्यकता आहे.

  • ९१ टक्के बदाम, ८७ टक्के पिस्ता, ७४ टक्के द्राक्षे, ७० टक्के भात, ५७ टक्के सोयाबीन आणि ५६ टक्के ऊस यांची आयात ही अत्यंत संवेदनशील विभागातून होते.
  • युरोपीय देशामध्ये होणारी आयात ही भारत आणि पाकिस्तान या विशेषत्त्वाने पाण्याची कमतरता असलेल्या देशातून होते. (उदा. ऊस आणि भात.)
  • पशुखाद्य पीक असलेल्या सोयाबीनवरील अवलंबित्वामुळे भविष्यात मांस आणि डेअरी उद्योगाला मोठ्या झळा बसणार आहेत.
  • अमेरिका, ब्राझील आणि इंडोनेशिया येथील पावसाचा पॅटर्न बदलण्याच्या स्थितीमध्ये कोकोआ, कॉफी आणि पाम तेल उद्योगांनाही फटका बसू शकतो.

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...