agricultural stories in Marathi, agrovision, CONTROL OF HUNGER IS NECESSARY FOR RURAL DEVELOPMENT, | Agrowon

ग्रामीण पुनरुत्थानासाठी भूक, कुपोषणावर मात करण्याची आवश्यकता

वृत्तसेवा
सोमवार, 29 एप्रिल 2019

भूक आणि कुपोषणाची साखळी, गरिबी, आर्थिक उद्धाराच्या मर्यादित संधी आणि पर्यावरणाची होणारी हानी अशा अनेक गोष्टींमुळे जागतिक पातळीवर ग्रामीण भागामध्ये विकासाची शाश्वत उद्दिष्ट्ये गाठण्यामध्ये अडचणी निर्माण होत असल्याची बाब २०१९ च्या जागतिक अन्न धोरण अहवालामध्ये मांडण्यात आली आहे. हा अहवाल वॉशिंग्टन येथील आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था (IFPRI) यांनी शुक्रवारी (ता. २६) प्रकाशित केला.

भूक आणि कुपोषणाची साखळी, गरिबी, आर्थिक उद्धाराच्या मर्यादित संधी आणि पर्यावरणाची होणारी हानी अशा अनेक गोष्टींमुळे जागतिक पातळीवर ग्रामीण भागामध्ये विकासाची शाश्वत उद्दिष्ट्ये गाठण्यामध्ये अडचणी निर्माण होत असल्याची बाब २०१९ च्या जागतिक अन्न धोरण अहवालामध्ये मांडण्यात आली आहे. हा अहवाल वॉशिंग्टन येथील आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था (IFPRI) यांनी शुक्रवारी (ता. २६) प्रकाशित केला.

जागतिक लोकसंख्येच्या ४५.३ टक्के लोक हे ग्रामीण भागामध्ये राहत असून, त्यातील किमान ७० टक्के लोक हे दारिद्र्याच्या कक्षेत राहतात. या लोकसंख्येच्या वाढीचा दर अधिक असून, अपुरा रोजगार, पायाभूत सुविधांचा अभाव, आर्थिक सोयीसुविधांची कमतरता यांचा त्यांना सातत्याने सामना करावा लागतो. आता त्याच्या जोडीला वातावरणातील बदलांचाही फटका बसत आहे. या साऱ्या स्थितीतून त्यांना वाचवण्यासाठी पुनर्बांधणीच्या नाविन्यपूर्ण आणि नैतिक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे. नव्या संधी देत वाढत्या आव्हानांचा सामना केल्यास अन्न सुरक्षिततेचे ध्येय २०३० पर्यंत साध्य करणे शक्य होईल, अन्यथा ते अवघडच नव्हे तर अशक्य ठरेल, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी ग्रामीण महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. अनेक देशांमध्ये ६० टक्के शेती ही महिलांद्वारे केली जाते. त्यांच्याकडे कोणतीही भांडवली सुविधा नसतानाच राजकीय आवाजही नाही. परिणामी त्यांच्यापर्यंत कृषी विस्तार सेवा पोचत नसल्याचे त्यांनी सांगितले. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची कमतरता आणि हवेचे वाढते प्रदूषण यांचाही फटका ग्रामीण भागामध्ये बसू लागला आहे.
जागतिक पातळीवरील सुमारे ५० टक्के ग्रामीण तरुणांकडे नोकऱ्या नाहीत. त्यातील अनेक जण एकतर बेरोजगार आहेत किंवा अर्ध रोजगारीत आहेत.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपाय ः

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या पूर्वनिर्धारीत ध्येयानुसार ग्रामीण भागाचे पुनरुत्थान हेच विकासाचे ध्येय मानले आहे. त्याविषयी बोलताना संस्थेचे दक्षिण आशियाचे संचालक शाहीदूर राशिद यांनी सांगितले की, भारताने ग्रामीण अर्थव्यवस्था आणि जीवनशैली सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना पुढे आणल्या आहेत. त्यात कृषी क्षेत्रामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्यासोबतच पायाभूत सुविधांचा उभारणीचाही समावेश आहे.
मुख्य पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्याचा मुद्दा अनेक कार्यक्रमांतून पुढे येत आहे. ही किंमत उत्पादन खर्चाच्या १.५ पट अधिक असावी, अशी मागणी आहे. भारताने २२ हजार स्थानिक बाजारपेठांमध्ये सुधारणांचा कार्यक्रमही हाती घेतला असून, त्यांचे रुपांतर ग्रामीण कृषी बाजारपेठेमध्ये (GrAMs) करण्यात येणार आहे.

आव्हाने

ग्रामीण सुधारणांच्या कार्यक्रमामध्ये वातावरणातील बदल, जमिनीचा ऱ्हास, मातीची सुपीकता कमी होणे आणि जैवविविधतेतील घट यांचा भारताला सातत्याने सामना करावा लागत आहे. अहवालाने अधोरेखित केलेल्या मुद्द्यांमध्ये शहरीकरण, स्थानिक बदल, वाढते उत्पन्न, अन्नपुरवठा साखळी आणि अन्न यंत्रणा यांचे एकत्रीकरण यांचा समावेश आहे. यातून उद्योजकता आणि रोजगारांच्या निर्मितीसाठी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.


इतर ताज्या घडामोडी
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...
विमा कंपनीचा कारभार चालतोय कृषी...सातारा : जिल्ह्यात खरिपाच्या सुरूवातीस पावसाने...
चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी पुनर्वसन...रत्नागिरी : ढगफुटीसदृश पावसामुळे चिपळूणकरांचे...
पाणी ओसरताच तातडीने पंचनामेकोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य...
शेतकरी नियोजन पीक : कांदाशेतकरी : नंदकुमार काशिनाथ उशीर गाव : धोडंबे, ता...