भूमिगत पाणी साठवणीवर ठरते झाडांची दुष्काळ संवेदनशीलता

भूमिगत पाणी साठवणीवर ठरते झाडांची दुष्काळ संवेदनशीलता
भूमिगत पाणी साठवणीवर ठरते झाडांची दुष्काळ संवेदनशीलता

कॅलिफोर्निया येथील विविध पर्यावरणामध्ये जमिनीअंतर्गत असलेल्या जलप्रवाहांचा पाठपुरावा करत कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठातील संशोधकांनी दुष्काळी वर्षांमध्ये पिकांच्या तग धरण्याच्या आजवर गुप्त राहिलेल्या रहस्याचा भेद केला आहे. ही पिके जमिनीमध्ये असलेल्या मर्यादित साठ्यावर आपली उपजीविका करतात. दगडांमध्ये असलेला ओलावा किंवा त्याची कमतरता ही यातील महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. याच्या आधारे कॅलिफोर्निया येथील अन्य वनस्पती समुदायांच्या भविष्याचा अंदाज घेणे शक्य होणार आहे. कॅलिफोर्नियामधील पावसाच्या अनियमित परिस्थितीमध्ये वनस्पतींचे कार्य कशा प्रकारे सुरू राहते, याविषयी सर्वसामान्यांच्या मनामध्ये अवास्तव माहिती आणि अपेक्षा असतात. त्यात वनस्पतींच्या मुळांनी अधिक पावसाच्या काळामध्ये पाणी साठवून ठेवून, ते दुष्काळी काळात वापरावे, असाही काहींचा दृष्टिकोन असू शकतो. हे चुकीचे असले तरी राज्यातील काही यशस्वी वनस्पती समुदाय ( विशेषतः मध्यपूर्वेतील वातावरणातील) हे अधिक ओल्या हिवाळ्यांमध्ये आणि कोरड्या उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे तग धरतात. त्यांनी आपल्या विभागातील पाऊस असणे आणि नसणे अशा दोन्ही स्थितीमध्ये भूजलाच्या अल्प साठ्यामध्येही तग धरण्याची क्षमता विकसित केली आहे. ही झाडे दुष्काळी स्थितीतही तग धरू शकतात. त्याविषयी माहिती देताना जेस्सी हॅह्म यांनी सांगितले, की उत्तर किनाऱ्यावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साठवले जाण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. पावसाच्या हंगामामध्ये जमिनीखाली कमी पाणी साठवले जाते. या मर्यादित भूजल साठ्यावर उन्हाळ्यामध्ये वनस्पतींना तग धरावे लागते. दुष्काळी स्थितीमध्ये सिएरा नेवाडा भागातील शेकडो झाडे वाळून जाताना दिसतात. पावसात जमिनीमध्ये पाण्याचे मर्यादित साठे ठेवणे आवश्यक असते. हिवाळ्यात कमी किंवा अधिक असा किती पाऊस पडणार, याचा विचार न करता काही प्रमाणात उन्हाळ्यासाठी पाण्याचे साठे आवश्यक असतात. दुसऱ्या बाजूने विचार करता, वनस्पतीला आज वाढताना जास्तीत जास्त पाणी शोषून घेणे आवश्यक ठरते. राज्यामध्ये बदलत्या हवामानामध्ये कोरड्या वातावरणाचा सामना करावा लागू शकतो. ही समस्या सिएरा नेवाडा येथील झाडांच्या बाबतीत घडते. ही झाडे हिवाळ्यातील बर्फ आणि पाण्याचा विचार न करता उन्हाळ्यातील कोरड्या स्थितीसाठी पाण्याची साठवण करतात. हाह्म आणि सक्रामेंटो राज्य विद्यापीठातील सहायक प्रा. डेव्हिड डॅरेल यांचे हे संशोधन जर्नल जिओफिजिकल रिसर्च मध्ये स्वीकारले गेले आहे. दगडातील ओलावा बहुतांशी लोकांच्या मतानुसार वनस्पती या मातीच्या वरच्या थरामधील पाण्यावर अवलंबून असतात. मात्र, बर्केले येथील प्रो. विल्यम डिएट्रिच आणि ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातील सहा. प्रा. डॅनिएल्ला रेम्पे यांनी केलेल्या संशोधनामध्ये दगडाच्या भेगा आणि मातीखाली ओलसर राहिलेल्या दगडांमध्ये साठवले गेलेले पाणी हे तितकेच किंवा अधिक महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्याला त्यांनी दगडाचा ओलावा असे नाव दिले असून, त्यावर दरवर्षी वनस्पती अवलंबून राहतात. जागतिक हवामानाच्या विविध मॉडेलमध्ये हे दगडातील पाणी अचूकपणे मोजले गेले पाहिजे. त्यावर दुष्काळाची किंवा तीव्र पावसाच्या परिणामांचा अंदाज घेता येईल. गेल्या काही वर्षामध्ये दुष्काळ किंवा उष्णतेमध्ये झाडे वाळल्यामुळे कॅलिफोर्निया, स्पेन, ग्रीस, ऑस्ट्रेलिया आणि अनेक ठिकाणी वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे.

  • या अभ्यासामध्ये राज्यातील २६ भागांचे सर्वेक्षण केले. हे सर्व भाग हिवाळ्यामध्ये बर्फाखाली राहतात आणि हिवाळी पाऊस जमिनीखाली साठवला जातो. हाच वनस्पतींचा उन्हाळ्यासाठी महत्त्वाचा पाणी स्रोत असतो. पर्जन्याची माहिती आणि अमेरिकी भू-सर्वेक्षणाच्या भूजल प्रवाहाच्या माहितीनुसार प्रतिवर्ष भूमिगत साठवल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण मोजण्यात आले. त्याच प्रमाणे जमिनीतील माती आणि ओलसर दगडच्या साठवणक्षमतेचीही सांगड घालण्यात आली.
  • २६ पैकी सात (सर्व उत्तर किनारी पर्वतरांगामध्ये) भागात भूमिगत पाणी साठवणक्षमता मर्यादित होती. तरीही राज्याच्या २०११ आणि २०१६ मधील नुकत्याच झालेल्या दुष्काळी वर्षामध्ये बऱ्यापैकी राहिली. ही ठिकाणे गवतांपासून, ओक सवामान, चॅपराल जंगलांपासून घनदाट डग्लस फर जंगलांपर्यंत वेगवेगळ्या वृक्षांची आहेत. पण येथील भूमिगत पाणीसाठवण सरासरी पर्जन्याच्या तुलनेमध्ये कमी होती. हे पाणी जास्त असले तरी हिवाळ्यामध्ये माती आणि दगडातील भेगांद्वारे निघून जाऊन ओढ्या नाल्याद्वारे प्रवाहामध्ये सामील होते.
  • दक्षिण कॅलिफोर्निया येथील बहुतांश ठिकाणी दुष्काळी स्थितीमध्ये झाडे मृत पावण्यासोबत कमी हिरवी आणि कमी आरोग्यदायी राहण्याचे प्रमाण मोठे आहे. येथे पडणाऱ्या पावसापैकी उन्हाळ्यासाठी खूपच कमी भाग साठवला जातो.
  • उपग्रहाच्या प्रतिमांचा अभ्यास करून प्रत्येक ठिकाणची उत्पादकता आणि आरोग्य मोजण्यात आले. जिथे अधिक साठवण क्षमता होती, तिथे ओल्या आणि दुष्काळी वर्षामध्ये हिरवेपणाचे वेगळे वेगळे थर आढळले. ज्या ठिकाणी भूमिगत साठवणक्षमता कमी पण सरासरी पावसापेक्षा अधिक साठवण क्षमता होती, तिथे ओल्या आणि दुष्काळी अशा दोन्ही वर्षामध्ये वनस्पतीमध्ये सारखाच हिरवेपणा आणि आरोग्य आढळले.
  • सिएरा नेवाडा येथील भागामध्ये अनेक वनस्पती उन्हाळ्यामध्ये बर्फाच्या पाण्यावर अवलंबून राहतात. मात्र, तापमानातील वाढीमुळे हिवाळ्यात पावसाचे प्रमाण वाढत आहे. हे पाणी पडल्यानंतर साठण्याऐवजी वाहून जाते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com