प्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे आवश्यक

प्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे आवश्यक
प्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणाम जाणणे आवश्यक

परागीकरण यशस्वी होण्यामागे संपूर्ण अंधार किंवा प्रकाशमय रात्री यामध्ये कोणताही फरक पडत नसल्याने न्युकॅसल आणि यॉर्क विद्यापीठातील संशोधनात आढळले आहे. विशेषतः लहान असलेल्या रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिवे बंद करण्याचे अन्य फायदेही लक्षात घेणे आवश्यक असल्याचे संशोधनात मांडण्यात आले आहे. प्रकाशाच्या प्रदूषणाचा परागीकरणावरील परिणामांचा दीर्घ अभ्यास होणे आवश्यक आहे. रस्त्यावरील दिवे आणि जाहिरातींच्या प्रकाशामध्ये रात्रीच्या वातावरणामध्ये एक प्रकारे प्रदूषण होत असते. रात्रीच्या अंधारामध्ये आपले अन्न शोधण्यासाठी बाहेर पडणाऱ्या निशाचरांच्या वर्तनांवर त्यांचा परिणाम होतो. या बाबींचे विश्लेषण आणि अभ्यास न्युकॅसल आणि यॉर्क विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या केला. त्यांनी प्रामुख्याने पतंगवर्गीय कीटकांच्या नैसर्गिक वर्तनाचा अभ्यास केला. हे पतंग रात्रीच्या वेळी वाटाणा, सोयाबीन आणि तेलबिया पिकांमध्ये परागीकरण करतात. हे कीटक मधमाश्या आणि अन्य परागवाहक कीटकांचे दिवसा केलेले काम पुढे नेत असल्याचे अन्य काही संशोधनातून पुढे आले होते. -रात्रीच्या वेळी असलेल्या कृत्रिम प्रकाशामुळे पतंग शेतापासून दूर वरील बाजूला आकर्षित होतात. प्रकाशाकडे जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे शेतामध्ये कमी काळ घालवतात. परिणामी, परागीकरणावर परिणाम होत असल्याचे मानले जात होते. मात्र, नुकत्याच झालेल्या या अभ्यासामध्ये पूर्ण अंधाऱ्या रात्री आणि प्रकाशमय रात्री यातील परागीकरणामध्ये फारसा फरक पडला नसल्याचे दिसून आले. हे संशोधन इकोस्पीअरमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. डॉ. डॅरेन इव्हान्स यांनी केलेल्या अभ्यासासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने रस्त्यावरील दिवे बंद करण्यात आले. त्याविषयी माहिती देताना इव्हान्स म्हणाले, की जागतिक पर्यावरण बदलामध्ये रात्रीच्या वेळी वाढत चाललेला कृत्रिम प्रकाश अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो. प्रतिवर्ष या प्रकाशामध्ये ६ टक्क्यांनी वाढ होत असल्याचे दिसून आले. या वाढत्या प्रकाशाचे पर्यावरणावरील नेमक्या परिणामांविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. सामान्यतः पतंगवर्गीय कीटकांच्या कार्यक्षमतेमध्ये प्रकाशाच्या प्रदूषणाचे लक्षणीय फरक पडतात. त्याचा परागीकरणावरही परिणाम होत असल्याचे मानले जात होते. मात्र, आमच्या अभ्यासामध्ये पूर्ण रात्र प्रकाश राहिल्यास त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. अर्धकाळ असलेल्या प्रकाशामुळे परागीकरणाच्या यशस्वीपणा किंवा दर्जावर फारसा परिणाम दिसून आला नाही. रात्री रस्त्यावरील दिव्यांचा प्रकाश ः रात्रीच्यावेळी होणाऱ्या प्रकाशाचे मानवी आरोग्य आणि वन्यजीवांवर विपरीत परिणाम होतात. त्यांची रात्र आणि दिवसांच्या कामांचे नैसर्गिक पॅटर्न बदलतात. जैविक पातळीवरील हे परिणाम अगदी लहान पेशीपासून संपूर्ण समुदायांनाही भेडसावू लागले आहेत. गेल्या दशकामध्ये स्थानिक प्रशासनाने विज व खर्चामध्ये बचत करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या ठराविक काळात रस्त्यावरील दिवे बंद करण्याचे धोरण आखले होते. त्याचप्रमाणे उच्च दाबाच्या सोडियम दिव्यांऐवजी ऊर्जा कार्यक्षम अशा एलईडी दिव्यांचा वापर वाढवला होता. पतंगवरील प्रकाशाचा होणारा परिणाम तपासण्यासाठी रस्त्यावरील दिव्यांखालील फुलांच्या परागीकरणाचा अभ्यास करण्यात आला. हे दिवे सोडियम आणि एलईडी अशा दोन्ही प्रकारचे होते. त्यातील काही दिवे संपर्ण रात्र चालू ठेवून, तर काही मध्यरात्रीच्या काळात बंद ठेवून पतंगावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला गेला. त्याचवेळी नैसर्गिक अंधारामध्ये होणारे परागीकरणही तपासण्यात आले. या तिन्ही पद्धतींची तुलनात्मक मांडणी केली. मात्र, परागीकरणामध्ये फारसा फरक दिसून आलेला नाही.

भविष्यात विकास आणि पर्यावरणाचे संरक्षण यातील समतोल साधण्याचे अवघड काम संवर्धकांना करावे लागणार आहे. आमच्या अभ्यासामध्ये मध्यरात्रीच्या वेळी दिवे बंद ठेवणे ही कीटक आणि मानवाबरोबरच ऊर्जा आणि आर्थिक बचतीच्या दृष्टीने ‘विन- विन’ परिस्थिती असणार आहे. यातून निशाचरांच्या आयुष्यावरील मानवी कृत्रिम प्रकाशाचे आक्रमण थांबवणे शक्य होईल. - डॉ. कॅल्लम मॅकग्रेगोर, संशोधक, यॉर्क विद्यापीठ.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com