agricultural stories in Marathi, agrovision, Getting fertilizer in the right place at the right rate | Agrowon

खतांचा ऱ्हास रोखण्यासाठी कॅनडामध्ये संशोधन सुरू
वृत्तसेवा
रविवार, 28 एप्रिल 2019

कोणतीही गोष्ट योग्य वेळी योग्य ठिकाणी झाल्यास त्याचे निष्कर्ष उत्तम मिळतात, ही सर्वमान्य बाब खतांच्या वापराबाबत एकदम सत्य आहे. खतांचा वापर पिकांच्या वाढीच्या योग्य टप्प्यामध्ये करण्याविषयी सातत्याने अभ्यास होत असतो. कॅनडा येथील संशोधकांचा गट शेतकऱ्यांसाठी खतांचे योग्य ते मिश्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल क्वालिटी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

कोणतीही गोष्ट योग्य वेळी योग्य ठिकाणी झाल्यास त्याचे निष्कर्ष उत्तम मिळतात, ही सर्वमान्य बाब खतांच्या वापराबाबत एकदम सत्य आहे. खतांचा वापर पिकांच्या वाढीच्या योग्य टप्प्यामध्ये करण्याविषयी सातत्याने अभ्यास होत असतो. कॅनडा येथील संशोधकांचा गट शेतकऱ्यांसाठी खतांचे योग्य ते मिश्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल क्वालिटी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

जेव्हा शेतकरी खते देतात, तेव्हा ती जमिनीमध्ये राहून पिकांना उपलब्ध होत राहतील, अशा विश्वास असतो. मात्र, शेतातून वाहून, निचरा होऊन जाणाऱ्या पाण्यासोबत दिलेल्या खतापैकी मोठा भाग जातो. कॅनडामध्ये पाणी दोन प्रकारे नुकसान करते. त्यात पावसाचे पाणी आणि पडलेला बर्फ वितळून होणारे पाणी असे दोन प्रकार आहेत. या दोन्ही बाबींचा विचार करून खतांचा ऱ्हास रोखण्यासाठी कॅनडा येथील युनिव्हर्सिटी ऑफ सॅस्कट्चेवान येथील जेफ श्चोईनाऊ आणि त्यांचा गट प्रयत्न करत आहे.
जेफ श्चोईनाऊ म्हणाले की, आम्ही प्रामुख्याने स्फुरदयुक्त खतांच्या कार्यक्षम वापरासाठी संशोधन करत होतो. उत्तरेकडील भागामध्ये खते दिल्यानंतर होणारा ऱ्हास मोठा आहे. तो कमी करून पिकांसाठीची त्याची उपलब्धता वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे.

  • योग्य जागा ः खते देण्यासाठी सामान्यतः मातीच्या वरील थरामध्ये देण्याचा मार्ग अवलंबला जातो. मातीमध्ये थोड्या अधिक खोलीवर खते देताना सरीमध्ये बियाण्यांसोबत किंवा त्याच्या लगतच्या सरीमध्ये खत दिले जाते. सामान्यतः खते मातीवर देऊन नंतर मातीमध्ये मिसळण्याची शिफारस केली जाते.
  • योग्य प्रमाण ः वेगवेगळ्या प्रमाण किंवा दराने मातीच्या वरील भागामध्ये किंवा गाडून खते देऊन त्याचा अभ्यास केला. त्यातील मातीमध्ये गाडून दिलेली स्फुरदयुक्त खते पिकांना दीर्घकाळ उपलब्ध होतात. तसेच बर्फ वितळून वाहणाऱ्या पाण्यासोबत त्यांचा कमी ऱ्हास होत असल्याचे दिसून आले.
  • स्फुरद हे पिकांच्या वाढीच्या सुरवातीच्या टप्प्यामध्ये वापरले जाणारे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. ते मातीच्या विश्लेषणानुसार विविध प्रकारामध्ये वापरले जाते. माती स्फुरदयुक्त खत वापरल्यानंतर विविध मूलद्रव्ये आणि सेंद्रिय घटकांसोबत त्याची प्रक्रिया सुरू होते. त्यातून ते पिकांना उपलब्ध होईल, अशा स्वरूपामध्ये येते. हे अर्थात चांगले असले तरी पुढे हे खत वाहत्या किंवा निचरा होणाऱ्या पाण्यासोबत भूजल किंवा नाले, ओढे आणि नद्यांमध्ये जाते. मातीमध्ये आणि पाण्यामध्ये या खतांचे मूळ प्रकार जाणून त्यानुसार ते टिकवून ठेवण्यासाठी तंत्र शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मातीच्या पृष्ठभागामध्ये मिसळण्याऐवजी पिकांच्या मुळाद्वारे जेथून खत उचलले जाणार आहे, तिथेच ते पुरवण्याचा प्रयत्न आवश्यक आहे.
  • बर्फाच्या वितळण्यामुळे तयार झालेला अपधाव (वाहते पाणी) हे उन्हाळी पावसापेक्षा वेगळे असते. पावसाच्या वेगामुळे मातीचे स्फुरदयुक्त कण मोकळे होतात. मात्र, बर्फाच्या वाहत्या पाण्यामध्ये हळूहळू विरघळून खते पाण्यासोबत वाहतात. या दोन्ही प्रक्रियांना अटकाव करण्यासाठी योग्य त्या पद्धतींचा शोध घेतला जात असल्याची माहिती श्चोईनाऊ यांनी दिली. या अभ्यासातून नव्या पीकपद्धतीसोबतच व्यवस्थापनाच्या नव्या पद्धती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...