agricultural stories in Marathi, agrovision, How to prevent mosquitofish from spreading in water ecosystems | Agrowon

परदेशी माशांमुळे होतोय स्थानिक जैवविविधतेचा ऱ्हास

वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

एकेकाळी डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणलेल्या परदेशी माशांचे प्रमाण परिसरातील तलाव व पाण्याच्या स्रोतामध्ये प्रचंड वाढले. परदेशी मॉस्किटोफिश या माशांचा प्रसार आणि संख्या वाढ रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. बार्सिलोना विद्यापीठातील संशोधकानी केलेल्या अभ्यासामध्ये सध्या तलावांमध्ये असलेले मासे काढून टाकणे आणि नव्याचा अंतर्भाव होणार नाही, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता पुढे आली आहे. हे संशोधन जर्नल सायन्स ऑफ दी टोटल एन्व्हायर्नंमेटमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

एकेकाळी डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणलेल्या परदेशी माशांचे प्रमाण परिसरातील तलाव व पाण्याच्या स्रोतामध्ये प्रचंड वाढले. परदेशी मॉस्किटोफिश या माशांचा प्रसार आणि संख्या वाढ रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. बार्सिलोना विद्यापीठातील संशोधकानी केलेल्या अभ्यासामध्ये सध्या तलावांमध्ये असलेले मासे काढून टाकणे आणि नव्याचा अंतर्भाव होणार नाही, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता पुढे आली आहे. हे संशोधन जर्नल सायन्स ऑफ दी टोटल एन्व्हायर्नंमेटमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

  • मॉस्किटोफिश या माशांच्या वेगाने वाढणाऱ्या संख्येपुढे स्थानिक माशांचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. स्थानिक मासे खाद्य मिळवण्यासाठी या माशांशी स्पर्धा करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे या माशांचे भक्षकांची उपस्थितीचाही फारसा परिणाम होत असल्याचे पुढे आले आहे. उलट उत्तर अमेरिकेतील अॅटलांटिक किनाऱ्याच्या परिसरामध्ये या माशांचा धोका वाढला आहे.
  • बार्सिलोना विद्यापीठातील जीवशास्त्र आणि जैवविविधता संशोधन संस्थेतील संशोधक ओरिओल कॅनो रोकाबायेरा, अॅडोल्फ डी सोस्टोआ, ल्युईस कॉल आणि अल्बर्टो मॅकेडा यांनी बार्सिलोना प्रांताच्या शहरी भागाजवळच्या जल परिसंस्थांमध्ये परदेशी माशांमुळे उद्भवलेल्या स्थितीचा अभ्यास केला आहे.

स्थानिक माशांना धोका

मॉस्किटो फिश (शा. नाव -Gambusia holbrooki) ही जागतिक पातळीवरील जैवविविधतेसाठी धोकादायक मत्स्य प्रजाती असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाच्या वतीने जाहीर केली आहे. १९२१ मध्ये डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी स्पेनमध्ये हे मासे आणण्यात आले होते. डासांमुळे होणारे मलेरिया व अन्य रोगांच्या नियंत्रणासाठी डासांची अंडी व अळी अवस्थेचा फडशा पाडणारे हे मासे उपयुक्त मानले जात. मात्र, आता कृषी, मत्स्य आणि अन्न मंत्रालयाने या माशांचा अंतर्भाव परदेशी आणि धोकादायक प्रजातींच्या यादीमध्ये केला आहे.
ही प्रजाती प्रामुख्याने नैर्ऋत्य पेनिनसुला, मध्य पूर्व समुद्री किनारा आणि इब्रो खोऱ्यामध्ये आढळते. किचिंत उबदार पाण्यामध्ये व वेगवान प्रवाहन नसलेल्या उथल पाण्यामध्ये या माशांचा रहिवास असतो. पेनिनसुला येथील अशा पाण्यामध्ये प्रामुख्याने प्रदूषण झाले असूनही चांगल्या प्रकारे तग धरू शकते. या माशांमुळे स्थानिक मासे उदा. स्पॅनिश टूथकार्प (Aphanius iberus), व्हॅलेन्सिया टूथकार्प (Valencia hispanica), अॅन्डालुसियन टूथकार्प (Aphanius baeticus) आणि थ्री स्पाईन्ड स्टिकलबॅक (Gasterosteus aceulatus) यांच्यासह विविध उभयचर आणि अपृष्ठवंशीय प्राण्यांची जैवविविधता कमी होत आहे. हे स्थानिक मासे मॉस्किटोफिशशी स्पर्धा करू शकत नाहीत.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असलेले उद्योग का...नाशिक : शासन नवीन उद्योगांची घोषणा करत आहे. मात्र...
देवळा तालुक्यात युरिया टंचाईनाशिक : देवळा तालुक्यात हंगामाच्या सुरुवातीला...
अंदरसूल उपबाजारात उन्हाळ कांदा आवकेत वाढनाशिक : वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील बाजार...
खानदेशात पेरणी ९० टक्‍क्‍यांवरजळगाव ः खानदेशात पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे....
अकोला : गतहंगामातील पीक विम्यापासून...अकोला ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी काढलेल्या...
सोयाबीन बियाणेप्रकरणी शासनाने मदत...अकोला ः जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पेरणीनंतर...
औरंगाबाद जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत आला...चिते पिंपळगाव, जि. औरंगाबाद : येथील कृषी सेवा...
सांगली जिल्ह्यात पीक कर्जवाटपात...सांगली ः जिल्हा बॅंकेने जूनअखेर ६६.८२ टक्के...
खानदेशात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्याजळगाव ः खानदेशात मागील २० ते २२ दिवसांमध्ये अनेक...
तुळसवडेतील शेतात ‘रयत क्रांती संघटने’चे...राजापूर, जि. रत्नागिरी : कोरोनामुळे  ...
खतांची साठेमारी करणाऱ्यांवर कारवाई...नागपूर : जिल्ह्यात युरियाचा मुबलक साठा उपलब्ध आहे...
सांगली बाजार समितीतील सौदे राहणार चार...सांगली ः जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात...
पाचोरा बाजार समितीत लिलाव बंदजळगाव ः जळगाव, पाचोरा व अमळनेरात आठवडाभर...
सोलापुरात पीक विम्यात सुर्यफुलाचा...मंगळवेढा, जि. सोलापूर  ः पंतप्रधान पीक विमा...
नागपुरात सोयाबीन क्षेत्रात १२ हजार...नागपूर : कापूस शेतीत मजुरांची तसेच विक्रीत...
परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १६.६० टक्केच...परभणी : जिल्ह्यातील सार्वजनिक, खासगी, सहकारी...
परभणी जिल्ह्यात गरजेवेळी युरियाचा तुटवडापरभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात युरिया...
शेतकऱ्यांनो, सेंद्रिय शेतीकडे वळा ः...परभणी : ‘‘अनेक पिकांचे देशी वाण मानवासाठी...
`व्हर्च्युअल गॅलक्‍सी'च्या देणेबाकीवर,...सोलापूर  : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास...मुंबई  : मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी...