आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवर

आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवर
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवर

ग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन दशकांपूर्वी सुरू झालेल्या आयटीसी लि.चा ‘ई चौपाल’ हा उपक्रम २०१९ च्या मध्यावधीपर्यंत मोबाईल व्यासपीठावर उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. `ई चौपाल ४.०’ हे व्यासपीठ कृषी क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यांसाठी उत्तम ठरू शकते. आयटीसीच्या वतीने ग्रामीण भागातील सुमारे ३५ हजार खेड्यांमध्ये ६१०० कियॉस्कद्वारे इंटरनेटची सुविधा पोचवली जात असून, त्याचा ४० लाख शेतकरी फायदा घेत आहेत. सध्या उपलब्ध माहिती केंद्राच्या डिजिटल व्यासपीठामध्ये मोबाईल अॅप्लिकेशनची भर घालण्यात येत असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांसोबत स्टार्टअप कंपन्यांनाही होऊ शकतो. त्याविषयी माहिती कृषी आणि माहिती तंत्रज्ञान व्यवसाय प्रमुख एस. शिवकुमार यांनी सांगितले, की आम्ही सध्या २० पेक्षा अधिक कृषी स्टार्टअपसाठी सेवा पुरवत आहे. त्यातून शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज, पिकांचे सल्ले, विविध तपासण्यांविषयी स्थाननिहाय माहिती पुरवली जात आहे.

  • २००५-०६ पासून ई चौपालच्या वतीने चौपाल प्रदर्शन खेत हा खास प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबवला जातो. त्यामध्ये भारतातील संशोधन केंद्रांच्या सहकार्याने पिकांचे शास्त्रीय व्यवस्थापनाच्या पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या जात आहेत. यातून कृषी संशोधन संस्थापासून ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यास मदत होत आहे. यात सोयाबीन, भात, मका, बाजरा, गहू, हरभरा, मोहरी, सूर्यफूल आणि बटाटा अशा पिकांचा समावेश आहे. आतापर्यंत ५ हजार खेड्यांमध्ये सुमारे ४.४ लाख एकर क्षेत्रावर ८३,३८८ पीक प्रात्यक्षिके पार पडली आहेत. यातून १० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. या शास्त्रीय पद्धतींच्या वापरातून ३४ हजार शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये १०७ टक्के वाढ (दुप्पट) झाली आहे. अल्प आणि मध्यम शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये ३० ते ७५ टक्के इतकी वाढ झाली असल्याचा दावा आयटीसीच्या वतीने केला आहे.
  • आयटीसीच्या कृषी व्यवसाय विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी नेटवर्किंगद्वारे खरेदी आणि विक्रीच्या व्यवस्था उभारण्यात आली आहे. त्यातून विक्रीवेळी होणाऱ्या अनेक खर्चांमध्ये बचत होणार आहे.
  • सध्या संगणकावर आधारीत असलेल्या ई चौपालची सेवा मोबाईलमध्ये आणण्यात येत आहे. त्यासाठी चौपाल ४.० तयार केले असून, ते २०१९ च्या मध्यावधीपर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात येईल. यातून शेतकऱ्यांना विविध सेवा पुरवत त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचे ध्येय ठेवल्याचे शिवकुमार यांनी सांगितले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com