agricultural stories in Marathi, agrovision, KVK spreading Energy Innovations in Zanskar Valley of Kargil | Agrowon

स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर पॅनेलची निर्मिती

वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर पॅनेल स्थानिक उपलब्ध घटकांपासून बनवण्याचे तंत्र भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तंत्रज्ञान वापर संस्थेने विकसित केले आहे. त्याचा प्रसार काश्मीर येथील झान्स्कार खोऱ्यातील कृषी विज्ञान केंद्राद्वारे करण्यात येत आहे. कोणत्याही ऊर्जेच्या वापराशिवाय, प्रदूषणरहित गरम पाणी मिळण्यासोबतच घरे उबदार ठेवणे शक्य होत आहे. या तंत्राचा फायदा येथील १५८ कुटुंबांनी घेतला आहे.

तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर पॅनेल स्थानिक उपलब्ध घटकांपासून बनवण्याचे तंत्र भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तंत्रज्ञान वापर संस्थेने विकसित केले आहे. त्याचा प्रसार काश्मीर येथील झान्स्कार खोऱ्यातील कृषी विज्ञान केंद्राद्वारे करण्यात येत आहे. कोणत्याही ऊर्जेच्या वापराशिवाय, प्रदूषणरहित गरम पाणी मिळण्यासोबतच घरे उबदार ठेवणे शक्य होत आहे. या तंत्राचा फायदा येथील १५८ कुटुंबांनी घेतला आहे.

कारगील जिल्ह्यातील झान्स्कर हा जगातील सर्वांत थंड आणि उंचावरील शुष्क भाग आहे. समुद्रपातळीपासून ३५०० मीटर ते ६४७८ मीटर उंचीवरील पर्वतरांगामध्ये ते वसलेले आहे. हा काश्मीरमधील दुर्गम भाग असून, येथील तापमान वजा ३० ते २८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. तीव्र हिवाळ्यामुळे येथे जगण्यासाठी ऊर्जेचे स्रोत आवश्यक ठरतात. त्यासाठी प्राण्यांचे शेण अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. येथील ग्रामीण भागामध्ये अन्न शिजवणे, पाणी उकळवणे, घरे उबदार ठेवण्यासाठी त्यांचे ज्वलन केले जाते. त्यामुळे प्राण्यांचे शेण्या गोळा करण्यासाठी महिलांची पायपीट होत असते. हिवाळ्यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी हंगामामध्ये तापमान गोठवणीच्या खाली (वजा ३० पर्यंत) गेल्याने ऊर्जेसाठी एलपीजी आणि वीज उपयोगी ठरत नाही.

या भागात सुमारे ३०० दिवस चकाकणारा सूर्यप्रकाश मिळतो. त्या सूर्यप्रकाशाचा उपयोग करून घेण्यासाठी शासनाच्या वतीने सौर दिवे बसवले आहेत. काही कुटुंबांनी सौर ऊर्जेवरील पाणी तापण्याची संयंत्रे बसवली असली तरी हिवाळ्यामध्ये त्याच्या नळ्या खराब होण्याचे प्रमाण मोठे आहे. त्या दुरुस्त करणेही अवघड ठरते. मात्र, अन्य ऊर्जेच्या गरजांसाठी पुन्हा शेण्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यांच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या धुरांचे दीर्घकालीन विचार करता कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्याच प्रमाणे शेणखत कमी पडल्याने शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाची कमतरता भासते.
या साऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी एसकेयूएसएटी, काश्मीर आणि कृषी विज्ञान केंद्र, झान्स्कार यांच्या प्रयत्नातून स्थानिक रीत्या उपलब्ध होतील अशा लाकडी फ्रेमध्ये सोलर पॅनेल बसवण्यात आले. यात पाणी गरम करण्यासह वातावरण उबदार ठेवण्याकडे लक्ष दिले जाते. हे तंत्रज्ञान लडाख प्रांतातील झान्स्कार दऱ्यातील आदिवासी लोकांसाठी उपयुक्त ठरत आहे.

सोलर पॅनेलच्या निर्मितीसाठी

 • उष्णता ग्रहण करण्यासाठी गॅल्व्हनाईझ्ड शीट, ग्लॅल्व्हनाईझ्ड पाइप किंवा अॅल्युमिनियम अॅलाय कॉईल ( अंतर्गत व्यास ३.७५ ते ४ सेंमी), पाणी आत येण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी दोन टोके. ही ग्रहण करणारे जीआय शीट हे एका लाकडी फ्रेममध्ये बसवले जाते.
 • त्याच्या मागील बाजूला उष्णता रोधक म्हणून थर्माकोल शीट (३.७५ सेंमी) चिटकवून बसवले जाते. सुरक्षिततेसाठी बाहेरून अॅल्युमिनियम शीट लावले जाते. समोरच्या चकाकत्या शीटवर जीआय किंवा अॅल्युमिनियमच्या पाण्याच्या कॉईल रेड्यूसरसह (२.५ सेंमी) आऊटलेट आणि इनलेटला बसवले जातात. ग्रहण करणाऱ्या भागांना स्थानिक लाकडांच्या ज्वलनातून मिळणाऱ्या कोळसा भुकटीचा काळा रंग लावला जातो. त्याच्या इनलेटमधून थंड पाणी आत येते आणि गरम होऊन बाहेर पडते. कॉईल पॅनेलच्या वरच्या बाजूला खिडकीच्या काचेचे दोन थर (४ मिमी) बसवलेले असतात. त्यात असलेल्या १.२५ सेंमी अंतरामध्ये हवा असून, ती उष्णता रोधणाचे काम करते. अशा प्रकारे तयार झालेले पॅनेल हे छतावर दक्षिणेकडे तोंड करून ४५ अंशाच्या कोनामध्ये बसवले जाते, त्यामुळे अधिक सूर्यप्रकाश ग्रहण करणे शक्य होते.
 • सूर्यप्रकाशामध्ये केवळ ३० ते ४५ मिनिटांमध्ये पॅनेलच्या कॉईलमधील सुमारे १८ लिटर पाणी ७० ते ८० अंश सेल्सिअस इतके तापते. एका संपूर्ण सूर्यप्रकाशयुक्त दिवसामध्ये कोणत्याही प्रकारे ऊर्जा न वापरता १०० ते १२० लिटर उष्ण पाणी कुटूंबाला उपलब्ध होते.
 • कार्यक्षमता वाढवण्यासाठी जीआय पाइप कॉईलऐवजी अॅल्युमिनियम कॉईल वापरता येते. हे पाणी पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठीही वापरता येते.
 • या थंड पाणी आत येण्याच्या ठिकाणी गोठवण विरोधी तंत्र बसवले आहे. पाणी जिथे बाहेर पडते तिथे वाळूचे निचरा आउटलेट बसवले आहे. यातून हातानेही पाणी भरता येत असल्यामुळे ज्यांच्याकडे वाहत्या पाण्याची सोय नाही, त्यांच्यासाठी फायदा होतो.
 • चाचणीमध्ये या तंत्राने १२० लिटर थंड पाणी (११ अंश से.) साधारण ३५ मिनिटांमध्ये गरम (८४ अंश से.) होते.

घर उबदार ठेवण्यासाठी...

 • वातावरण उबदार ठेवण्याचे पॅनेल हे वरील पाणी तापवण्याच्या पॅनेलप्रमाणेच असते. मात्र, त्यात पाणी असत नाही. ते खोलीशेजारी दक्षिण दिशेला बसवले जाते. या ग्रहण यंत्रणेतील पाइपमधील उष्ण झालेली हवा वरील बाजूने खोलीमध्ये जाते. त्यानंतर तयार झालेल्या पोकळीमुळे खालील बाजूने खोलीतील थंड हवा ओढली जाते. अशा प्रकारे कोणत्याही उर्जेच्या वापराशिवाय हे चक्र सुरू राहते. या पॅनेलला थर्मोसायफनिंग एअर हिटींग पॅनेल (टीएपी) या नावाने ओळखले जाते.
 • घर उबदार ठेवणे, स्वयंपाक किंवा स्वच्छतेसाठी पाणी गरम करणे यासाठी सेंद्रिय पदार्थ जाळावे लागत नाही. त्यामुळे धूर व प्रदूषणमुक्त घर ठेवता येते. महिलांच्या शेण्या गोळा करण्याची पायपीट कमी होते.
 • स्थानिकरीत्या उपलब्ध घटकांपासून स्थानिक कारागीरांच्या साह्याने सोलर पॅनेल तयार केल्यामुळे स्वस्त पडतो. आवश्यक त्या वेळी दुरुस्तीही त्वरित शक्य होते. पहिल्या टप्प्यामध्ये स्थानिक कारागिरांसाठी कृषी विज्ञान केंद्राने प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

परिणाम ः

 • झान्स्कार येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने राबवण्यात आलेल्या या पथदर्शी प्रकल्पामुळे या खोऱ्यामध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले. सोप्या आणि स्थानिकरीत्या तयार करण्यायोग्य तंत्रामुळे अनेक लोकांनी त्याचा वापरही सुरू केला. हे कमी खर्चाचे सोलर हिटर जवळपास १५८ घरांमध्ये वापरले जात आहेत. सुरवातीच्या टप्प्यामध्ये या कामासाठी ‘सायन्स फॉर इक्विटी एम्पॉवरमेंट ॲण्ड डेव्हलपमेंट डिव्हिजन (सीड)’, शास्त्र आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांनी आर्थिक साह्य पुरवले होते.
 • कारगील जिल्ह्यातील लडाख डेव्हलपमेंट कॉन्सिल यांनी या तंत्राच्या प्रसारासाठी पुढाकार घेतला आहे. केव्हिके, झान्स्कार यांनी झान्स्कार खोऱ्याच्या अन्य भागासह काश्मीरच्या आल्पाईन भागामध्ये प्रसार करण्याचे नियोजन केले आहे.

(स्रोत ः भारतीय कृषी संशोधन परिषदेची कृषी तंत्रज्ञान वापर संशोधन संस्था, लुधियाना.)


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...