तापमान बदलासाठी स्थानिक वनस्पती अधिक संवेदनशील

तापमान बदलासाठी स्थानिक वनस्पती अधिक संवेदनशील
तापमान बदलासाठी स्थानिक वनस्पती अधिक संवेदनशील

तापमानामध्ये होत असलेल्या वाढीमुळे फुले येणाऱ्या स्थानिक आणि अस्थानिक वनस्पतींवर वेगवेगळा परिणाम होत असल्याचे इंडिया विद्यापीठातील संशोधकांना दिसून आले आहे. याचा परिसरावर दीर्घकालीन परिणाम दिसू शकतो. हे संशोधन ‘जर्नल इकॉलॉजी लेटर्स’ मध्ये प्रकाशित केले आहे. जगभरामध्ये तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर वनस्पती व अन्य सजीवांच्या प्रजातींमध्ये अनेक बदल होणे अपेक्षित आहेत. या बदलाशी जुळवून घेण्यामध्ये ज्या प्रजाती सक्षम राहतील, त्याच टिकू शकणार आहेत. अन्यथा अक्षम वनस्पती प्रजाती नष्ट होण्याचा धोका स्पष्ट दिसत आहे. वनस्पतीच्या तग धरण्यामध्ये फुलोरा, परागीकरण आणि त्यातून बियांच्या उत्पत्ती होणे या बाबींचे महत्त्व मोठे आहे. वसंताचे आगमन होऊन तो पुढे जात असताना झाडावरील फुलोऱ्यांमुळे वातावरण बदलून जाते. इंडियाना विद्यापीठातील एन्व्हायर्न्मेंटल रिसायलन्स इन्स्टिट्यूट येथील संशोधकांनी बदलत्या तापमानाचे स्थानिक आणि अस्थानिक वनस्पतींच्या फुलोऱ्यावर परिणामांचा अभ्यास केला आहे. त्याविषयी माहिती देताना इंडियाना विद्यापीठातील जीवशास्त्र विभागातील सहाय्यक प्रा. जेन लाऊ यांनी सांगितले की, वनस्पतीच्या जीवनसाखळीतील आणि त्या प्रजातींच्या तग धरण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा कालावधी म्हणजे फुलोऱ्याची स्थिती होय. फुलांचे परागीकरण मधमाश्या किंवा अन्य कोणत्या कीटकांकडून होणार, त्या दृष्टीने फुलांची रचना व कालावधी ठरलेला असतो. त्यानंतर त्यातून बियांची निर्मिती होण्यासाठीचा कालावधीही ठरलेला असतो. मात्र, आमच्या अभ्यासातून पुढे आलेल्या माहितीतून फुलोऱ्यावरील स्थानिक वनस्पतींच्या दृष्टीने काळजीची बाब पुढे आली आहे. भविष्यामध्ये केवळ तणांचे प्राबल्य असण्याची स्थिती तापमानातील वाढीमुळे निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे. संशोधन आणि निष्कर्ष ः

  • स्थानिक वनस्पतीच्या तुलनेमध्ये अस्थानिक वनस्पती प्रजातींनी आपला फुलोऱ्याचा कालावधी तापमानाच्या अनुषंगाने चांगल्या प्रकारे बदललेला असल्याचे आढळले. यातून बदललेल्या तापमानाच्या स्थितीमध्ये भविष्यात अस्थानिक वनस्पती अधिक चांगल्या प्रकारे तग धरण्याची शक्यता आहे.
  • या शक्यतेवर आधारित गृहितकांची चाचणी करण्यासाठी लाऊ आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी ४५ स्थानिक आणि अस्थानिक वनस्पतींची लागवड केली. त्यातील काही भाग हा अवरक्त किरणांच्या साह्याने उष्ण करून काही भाग सामान्य ठेवला. त्यानंतर या वनस्पतींच्या पहिल्यांदा फुलोऱ्यावर येण्याची तारीख आणि किती काळ फुलोऱ्यावर राहतात, याचे निरीक्षण केले.
  • मध्यपश्चिम भागामथ्ये या शतकाच्या अखेरीला असणाऱ्या तापमानाच्या अंदाजाप्रमाणे उष्ण केलेल्या वनस्पतींच्या भागामध्ये तापमान ठेवण्यात आले. या वातावरणामध्ये अस्थानिक वनस्पती सरासरीपेक्षा अकरा दिवसापेक्षा आधी फुलोऱ्यावर आल्या. त्याच्या उलट स्थानिक वनस्पतींनी त्यांच्या फुलोऱ्याच्या वेळेमध्ये कोणताही बदल न केल्याचे दिसून आले.
  • लाऊ यांचे विद्यार्थी आणि सध्या मिशीगन राज्य विद्यापीठामध्ये पीएच.डी. करत असलेल्या मेरेडिथ झेट्टलमोयेर यांनी सांगितले, की लवकर फुलोऱ्यावर येण्याची स्थिती अस्थानिक वनस्पतींमध्ये मोठ्या प्रक्षेत्रावर पसरल्याचे आम्हाला आढळले. अस्थानिक वनस्पतींना बदलत्या वातावरणाबरोबर स्वतःला व्यवस्थित जुळवून घेतल्यानेच त्याचा प्रसार वेगाने वाढत असल्याचे या अभ्यासातून पुढे येत आहे. ज्या वनस्पती आपल्या फुलोरा येण्याचा काळ व कालावधी यामध्ये योग्य ते बदल करण्यामध्ये अक्षम राहतील, त्यांचे प्रमाण कमी होत नष्ट होण्याच धोका आहे. सध्याच्या वातावरणामध्ये तर स्थानिक वनस्पती अस्थानिक वनस्पतीच्या तुलनेमध्ये अधिक संवेदनशील असल्याचे स्पष्ट दिसते.  
  • वातावरणातील बदलाच्या स्थितीमध्ये जगभरातील प्रजातींवर परिणाम होत आहेत. त्यातही वसंताच्या सुरवातीच्या काळामध्ये फुलोरा येणे ही या वातावरणामध्ये तग धरण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे धोरण वनस्पतीच्या दृष्टीने ठरू शकते. स्थानिक वनस्पती उबदार वातावरणामध्ये फुलोऱ्यात लवकर येण्यांमध्ये सक्षम नसतील, त्याद्वारे तापमान बदलाला सामोरे जाण्याचे काही अन्य धोरण तयार असले पाहिजे. जर ते तसे नसेल, तर मात्र त्या वनस्पती प्रजातीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने धोक्याचा इशारा असणार आहे. - जेन लाऊ, सहाय्यक प्राध्यापिका, इंडियाना विद्यापीठ.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com