वातावरण बदलाशी जुळवून घेतात जुनी जंगले
वातावरण बदलाशी जुळवून घेतात जुनी जंगले

वातावरण बदलाशी जुळवून घेतात जुनी जंगले

ईशान्य अमेरिकेतील नव्या जंगलाच्या तुलनेमध्ये जुनी जंगले ही वातावरणातील बदलांसाठी विशेषतः कार्बन साठवण, लाकूड उत्पादन आणि जैवविविधतेचा विचार करता तुलनेने कमी संवेदनशील असल्याचे व्हर्मोंट विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. या संशोधनामध्ये पूर्व अमेरिका आणि कॅनडा येथील जंगलावर वातावरण बदलाचे विश्लेषण करण्यात आले. त्यावरून भविष्यातील वाढलेल्या तापमान आणि पावसांमध्ये जंगलाची कार्बन, लाकूड आणि जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशीलता मिळवण्यात आली. हे संशोधन ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. मिन्निसोटा ते मैने आणि मॅनोतोबा ते नोवा स्कॉटिया या भागातील सुमारे १८,५०० जंगल प्रक्षेत्रांची माहितीचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये पूर्व आणि ईशान्येतील ग्रेट लेक भागातील नव्या जंगलाचाही समावेश होता. अशा सर्व जंगलातील हवामान बदलांचा परिणाम होणारे भाग ओळखण्यासाठी व्हर्मोंट विद्यापीठातील ‘रुबेनस्टाईन स्कूल ऑफ एन्व्हायर्न्मेंट अॅण्ड नॅचरल रिसोर्सेस’ येथील संशोधक डॉमिनिक थॉम यांनी संशोधन केले आहे. अनिश्चित अशा संभाव्य वातावरणामध्ये जंगले आणि त्यातील जैवविविधता टिकवण्यासाठी सातत्याने संशोधन होत आहे. त्यामध्ये हे विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातून नव्या जंगलांच्या तुलनेमध्ये जुन्या जंगलाची संवेदनशीलता कमी असल्याचे दिसून आले. म्हणजेच जुनी जंगले जपणे किती आवश्यक आहे, हे यातून पुढे आले आहे. कारण नवी जंगले तयार केली तरी बदलत्या वातावरणामध्ये कितपत तग धरतील, याबाबत वादाचा विषय होऊ शकतो. प्रा. विल्यम किटन यांनी सांगितले, की आमच्या अभ्यासातून बदलत्या जागतिक हवामानाला जुळवून घेण्यासाठी आणि जंगल व्यवस्थापनासाठी नव्या संधी मिळणार आहेत. जुन्या जंगलाना आपल्या व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्व देण्याची आवश्यकता त्यातून पुढे आली आहे. अभ्यासामध्ये जंगलाची हवामान अनुकूलता वाढत्या वयासोबत वाढत असल्याचे आढळले आहे. शास्त्रज्ञांनी १५० वर्षांपेक्षा अधिक जुन्या जंगलांची वैशिष्ट्ये मिळवली. ही जंगले संरचनेच्या दृष्टीने गुंतागुतींची असून, झाडे वेगेवेगळ्या उंचीपर्यंत आणि मोठ्या कॅनोपी फरकामध्ये वाढत असतात. या फरकामध्ये वाढ होताना आवश्यक तितका सूर्यप्रकाश मिळवतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com