agricultural stories in Marathi, agrovision, Older forests resist change, climate change | Agrowon

वातावरण बदलाशी जुळवून घेतात जुनी जंगले

वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

ईशान्य अमेरिकेतील नव्या जंगलाच्या तुलनेमध्ये जुनी जंगले ही वातावरणातील बदलांसाठी विशेषतः कार्बन साठवण, लाकूड उत्पादन आणि जैवविविधतेचा विचार करता तुलनेने कमी संवेदनशील असल्याचे व्हर्मोंट विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. या संशोधनामध्ये पूर्व अमेरिका आणि कॅनडा येथील जंगलावर वातावरण बदलाचे विश्लेषण करण्यात आले. त्यावरून भविष्यातील वाढलेल्या तापमान आणि पावसांमध्ये जंगलाची कार्बन, लाकूड आणि जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशीलता मिळवण्यात आली. हे संशोधन ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

ईशान्य अमेरिकेतील नव्या जंगलाच्या तुलनेमध्ये जुनी जंगले ही वातावरणातील बदलांसाठी विशेषतः कार्बन साठवण, लाकूड उत्पादन आणि जैवविविधतेचा विचार करता तुलनेने कमी संवेदनशील असल्याचे व्हर्मोंट विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. या संशोधनामध्ये पूर्व अमेरिका आणि कॅनडा येथील जंगलावर वातावरण बदलाचे विश्लेषण करण्यात आले. त्यावरून भविष्यातील वाढलेल्या तापमान आणि पावसांमध्ये जंगलाची कार्बन, लाकूड आणि जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशीलता मिळवण्यात आली. हे संशोधन ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मिन्निसोटा ते मैने आणि मॅनोतोबा ते नोवा स्कॉटिया या भागातील सुमारे १८,५०० जंगल प्रक्षेत्रांची माहितीचे विश्लेषण करण्यात आले. यामध्ये पूर्व आणि ईशान्येतील ग्रेट लेक भागातील नव्या जंगलाचाही समावेश होता. अशा सर्व जंगलातील हवामान बदलांचा परिणाम होणारे भाग ओळखण्यासाठी व्हर्मोंट विद्यापीठातील ‘रुबेनस्टाईन स्कूल ऑफ एन्व्हायर्न्मेंट अॅण्ड नॅचरल रिसोर्सेस’ येथील संशोधक डॉमिनिक थॉम यांनी संशोधन केले आहे.

अनिश्चित अशा संभाव्य वातावरणामध्ये जंगले आणि त्यातील जैवविविधता टिकवण्यासाठी सातत्याने संशोधन होत आहे. त्यामध्ये हे विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यातून नव्या जंगलांच्या तुलनेमध्ये जुन्या जंगलाची संवेदनशीलता कमी असल्याचे दिसून आले. म्हणजेच जुनी जंगले जपणे किती आवश्यक आहे, हे यातून पुढे आले आहे. कारण नवी जंगले तयार केली तरी बदलत्या वातावरणामध्ये कितपत तग धरतील, याबाबत वादाचा विषय होऊ शकतो.

प्रा. विल्यम किटन यांनी सांगितले, की आमच्या अभ्यासातून बदलत्या जागतिक हवामानाला जुळवून घेण्यासाठी आणि जंगल व्यवस्थापनासाठी नव्या संधी मिळणार आहेत. जुन्या जंगलाना आपल्या व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्व देण्याची आवश्यकता त्यातून पुढे आली आहे.

अभ्यासामध्ये जंगलाची हवामान अनुकूलता वाढत्या वयासोबत वाढत असल्याचे आढळले आहे. शास्त्रज्ञांनी १५० वर्षांपेक्षा अधिक जुन्या जंगलांची वैशिष्ट्ये मिळवली. ही जंगले संरचनेच्या दृष्टीने गुंतागुतींची असून, झाडे वेगेवेगळ्या उंचीपर्यंत आणि मोठ्या कॅनोपी फरकामध्ये वाढत असतात. या फरकामध्ये वाढ होताना आवश्यक तितका सूर्यप्रकाश मिळवतात.


इतर बातम्या
हिवाळी अधिवेशनात कर्जमाफी घोषणेची...पुणे : महाविकास आघाडीच्या किमान समान...
हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावच...मुंबई  ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू...
गायीच्या दूध खरेदी दरात एक रुपयाने वाढपुणे  ः परराज्यांसह भुकटी उद्योगांकडून...
सोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...
गारठा पुन्हा वाढणारपुणे  ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...
पूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...
सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीपोटी मिळणार...सोलापूर  : ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...
ठाकरे सरकारचे उद्यापासून पहिलेच अधिवेशनमुंबईः नागपूर येथील छोटेखानी हिवाळी अधिवेशनात...
ग्रासपेंटिंगच्या माध्यमातून...शिराढोण ः उस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी (ता. कळंब...
तनपुरे कारखाना चालावा ही जिल्हा बॅंकेची...नगर : "डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची...
मराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...
नांदेड, परभणी, हिंगोलीत नुकसानीपोटी ५७८...नांदेड : अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या...
खेड तालुक्यात नुकसानभरपाईच्या...पुणे : खरिपात पावसाने खेड तालुक्यात चांगलीच हजेरी...
कोल्हापुरात पुष्प प्रदर्शनास प्रारंभकोल्हापूर  : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर...
कळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक  : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...
नुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...
सटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...