agricultural stories in Marathi, agrovision, Organic animal farms benefit birds nesting in agricultural environments | Agrowon

सेंद्रिय पशुपालन पक्ष्यांच्या जैवविविधतेसाठी उपयुक्त
वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील संशोधनामध्ये सेंद्रिय पद्धतीच्या पशुपालनामुळे पक्ष्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच कृषी क्षेत्रामध्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दिले जाणारे अनुदानाचा चांगला परिणाम पक्ष्यांच्या संख्येवर दिसून येईल.

फिनलँड येथील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी येथील संशोधनामध्ये सेंद्रिय पद्धतीच्या पशुपालनामुळे पक्ष्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच कृषी क्षेत्रामध्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दिले जाणारे अनुदानाचा चांगला परिणाम पक्ष्यांच्या संख्येवर दिसून येईल.

फिनलँडसह युरोपमध्ये कृषी क्षेत्रातील पक्ष्यांची संख्या वेगाने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी पक्ष्यांची जैवविविधता टिकवण्यासाठी कृषी- पर्यावरण अनुदानाचा पर्याय पुढे आला आहे. जैवविविधतेचे महत्त्व शास्त्रज्ञांसह सामान्यांपर्यंत जाणवू लागले आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नाची उपलब्धता करण्यासाठी कृषी क्षेत्र वाढत जात आहे. अशा वेळी कृषी क्षेत्रामध्येच जैवविविधता वाढविण्यासाठी युरोपीय संघाकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कृषी क्षेत्राला अनुदान देण्याचे नियोजन केले जात आहे. पर्यावरणाला उपयुक्त ठरेल, अशाप्रकारे कृषी पद्धतींचा अवलंब करण्यासाठी हे अनुदान दिले जाते. अशा पद्धतींचा शोध घेण्यासाठी फिनलँडमध्ये हेलसिंकी विद्यापीठामध्ये इरिना हेरझॉन यांनी संशोधन केले आहे. त्यांनी सर्व प्रकारच्या सेंद्रिय शेती, पशुपालन यांचा पर्यावरणावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला आहे.

फिनलॅंड येथील बहुतांशी सेंद्रिय शेतांमध्ये उन्हाळ्यात मुक्त संचार पद्धतीने पशुपालन केले जाते. कुरणांमध्ये उपलब्ध असलेल्या गवतांच्या विविधतेसोबतच कीटकांनाही त्याचा फायदा होत आहे. जनावरांच्या शेणांमुळे वनस्पतींच्या प्रजातींसाठी खतांची उपलब्धता होत आहे. अशा शेतामध्ये कीटकांची वाढलेली संख्या पक्ष्यांना आकर्षित करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याविषयी माहिती देताना हेलसिंकी विद्यापीठांतर्गत कार्यरत फिनिश म्युझियम ऑफ नॅटरल हिस्ट्री लेमाऊस येथील संशोधक अलेक्सी लेहिकोईनेन यांनी सांगितले, की फिनलँडमध्ये कॉमन स्वॉलो आणि हाऊस मार्टिन यांसारख्या पक्ष्यांची संख्या अत्यंत कमी झाली असून, या प्रजाती धोक्यामध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती आणि पशुपालन यांचे एकत्रीकरण अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे अभ्यासामध्ये दिसून आले आहे. दैनंदिन गरजांसाठी सेंद्रिय उत्पादनांची खरेदी करण्याच्या साध्या उपायांनीही सेंद्रिय शेती आणि जैवविविधता यांच्या वाढीला फायदा होऊ शकतो.

कृषी, पर्यावरण आणि हवामानविषयक अनेक अनुदानांची सांगड सेंद्रिय पशुपालनांशी घातल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. यासाठी करांमध्ये योग्य त्या सवलती देण्यासोबतच सेंद्रिय उत्पादनांच्या खरेदी-विक्रीला चालना दिली पाहिजे. यातून शेतकऱ्यांनाही सेंद्रिय शेती फायद्याची होणार असल्याने पर्यावरण, हवामान आणि जैवविविधता यासाठी विन विन परिस्थिती तयार होईल.

 

इतर ताज्या घडामोडी
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...
छावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...
आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...
नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
साताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्‍...
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...