सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी स्टिकर्स ठरतील उपयुक्त

सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी स्टिकर्स ठरतील उपयुक्त
सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी स्टिकर्स ठरतील उपयुक्त

ज्या ठिकाणी सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव टाळायचा आहे किंवा तपासायचा आहे, अशा पृष्ठभागावरील सूक्ष्मजीव गोळा करण्यासाठी पेपर स्टिकर अत्यंत उपयोगी पडू शकतात. ही पद्धत सध्याच्या स्वॅबिंगपेक्षाही सोपी आणि स्वस्त असून, तितकीच कार्यक्षम असल्याची माहिती संशोधकांनी दिली. हे संशोधन ‘अॅप्लाईड अँड एन्व्हायर्नमेंटल मायक्रोबायोलॉजी जर्नल’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये जिवाणूंचा प्रादुर्भाव होऊन आरोग्यासाठी धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यातही दूध आणि चीज प्रक्रिया उद्योगामध्ये काही विशिष्ठ जिवाणूंची आवश्यकता पदार्थ विरजण्यासाठी आवश्यक असली तरी त्या व्यतिरिक्त अन्य जिवाणूंमुळे मोठे नुकसानही होऊ शकते. याचे मापन करण्यासाठी चीज उत्पादनातील अन्य जिवाणूंचे प्रदूषण रोखण्यासाठी सातत्याने नमुन्यांची तपासणी केली जाते. सामान्यतः कच्या दुधामध्ये किंवा अन्य कच्च्या डेअरी उत्पादनामध्ये (उदा. ब्रिई, कॅमेम्बर्ट आणि फेटा.) लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स या जिवाणूंमुळे प्रदूषण होत असते. या जिवाणूंचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी सध्या डीएनए नमुन्यांच्या तपासणीच्या क्यूपीसीआर पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीमध्ये या जिवाणूंसह इ. कोलाय सारख्या हानिकारक ठरणाऱ्या जिवाणूंची संख्याही मोजली जातो. पूर्वी स्वॅबिंगद्वारे अशा ठिकाणी मोजमाप करणे हे अधिक गुंतागुंतीचे आणि अव्यहवार्य होत असे. कारण, त्यावरून मिळालेली माहिती ही त्या वेळेपुरतीच मर्यादित असायची. स्वच्छता केल्यानंतर कालची माहिती मिळवणे शक्य नसे. त्याचप्रमाणे ओलसर स्वॅब किंवा स्पर्श प्लेट या पद्धतीचा अवलंब केला जाई. त्यात हे डीएनए वाढ माध्यमामध्ये मिसळून आणले जाते. त्यामुळे पुन्हा त्याचा वापर करताना निर्जंतुकीकरण करण्याची आवश्यकता असे.

  • व्हियन्ना (ऑस्ट्रिया) येथील युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटर्नरी मेडिसीन येथील संशोधक मार्टिन बोबाल यांनी सांगितले, की विविध पृष्ठभागावरील जिवाणूं किंवा अन्य प्रदूषण घटकांची मोजणी करण्यासाठी त्यावरून स्वॅबिंगद्वारे (घासून किंवा खरवडून) नमुने घेतले जातात. त्याऐवजी सच्छिद्र संरचनेच्या पेपरद्वारे नमुने घेणे सोपे होऊ शकते. यासाठी यांत्रिक संपर्क आवश्यक असतो. उदा. हाताने किंवा काही द्रव वेगाने त्या पृष्ठभागावर टाकून तो जमा केला जातो.
  • हानिकारक जिवाणू आणि बुरशींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अन्न प्रक्रिया केंद्रातील उपकरणाच्या पृष्ठभागांची सातत्याने स्वच्छता केली जाते. अशा ठिकाणी खरवडून नमुने घेण्यासोबत स्टिकरचा वापर करण्यात आला. अशा प्रदूषित स्टिकरद्वारे पसरणाऱ्या प्रदूषणाचे मापन किमान दोन आठवड्यांतून करण्यात आले. त्यासाठी धुणे, पाण्याने स्वच्छ करणे किंवा अल्कोहोल आधारित जंतुनाशकांने स्वच्छ करणे अशा पद्धतींचा अवलंब केला नाही.
  • अशा स्टिकरद्वारे डीएनएचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत बदलते असले तरी साठवणीमध्ये १४ दिवसांमध्येही ते कमी होत नसल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच नमुने घेण्याचा कालावधी दोन आठवड्यांपर्यंत वाढवणे शक्य असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.
  • संकल्पनेच्या प्रयोगामध्ये संशोधकांनी स्टिकर्स हातांचा सातत्याने स्पर्श होत असलेल्या विविध ठिकाणी लावले होते. उदा. लाईटची बटणे, दरवाज्याचे हॅण्डल इ. कालावधी एक ते सात दिवसांपर्यंत ठेवला होतो. दोन्ही जिवाणूंच्या प्रजातींची संख्या या स्टिकरवरून सातत्याने मोजण्यात आली.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com