सांडपाण्याच्या प्रक्रियेसह पशुखाद्य निर्मितीमध्ये पाणवनस्पती ठरतील उपयुक्त

सांडपाण्याच्या प्रक्रियेसह पशुखाद्य निर्मितीमध्ये पाणवनस्पती ठरतील उपयुक्त
सांडपाण्याच्या प्रक्रियेसह पशुखाद्य निर्मितीमध्ये पाणवनस्पती ठरतील उपयुक्त

सध्या विविध जलस्रोतांमध्ये वाढणाऱ्या पाणवनस्पती समस्या ठरत आहेत. मात्र, डकवीड या पाणवनस्पतींचा वापर पाण्याचे प्रदूषण करण्यासाठी होऊ शकत असल्याचे मत चीन व रुटगर्स येथील संशोधकांनी व्यक्त केले आहे. या वनस्पतीपासून प्रतिजैविकांच्या निर्मितीसह बायोमासपासून जैवइंधनाचीही निर्मिती करता येईल, असा विश्वास ‘जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित लेखामध्ये व्यक्त केला आहे. डकवीड या पाणवनस्पतीच्या सुमारे ३७ प्रजाती असून, त्या जगभरातील जलस्रोतांमध्ये वाढत आहे. या वनस्पतीच्या वेगाने होणाऱ्या वाढीमुळे विविध समस्यांचा सामना करावा लागतो. डकवीडच्या स्पायरोडेला पॉलिरायझा या प्रजातीचा अभ्यास चीन आणि जर्मनीतील रुटगर्स विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या केला आहे. त्यासाठी डीएनए सिक्वेन्सिंग तंत्राचा वापर केला आहे. ही वनस्पती जमिनीवरील वनस्पतीपेक्षा भिन्न तऱ्हेने प्रदूषित पाण्याशी जुळवून घेते. या प्रदूषित पाण्याची जुळवून घेण्यामध्ये तिची प्रतिकार व्यवस्था कशा प्रकारे कार्यान्वित होते, याचा अभ्यास संशोधकांनी केला आहे. या पाणवनस्पतीने या प्रतिकार व्यवस्थेच्या बळावर वेगवेगळ्या सूक्ष्मजीव, किडी या बरोबरच पाण्यामध्ये वाढणाऱ्या वेगवेगळ्या बुरशी, जिवाणू या संरक्षण मिळवले आहे. या संशोधनामुळे डकवीडच्या विविध प्रजातींचा वापर बायोमास मिळवण्यासाठी करता येईल. या बायोमासपासून इथेनॉलची किंवा विद्युत ऊर्जानिर्मिती शक्य आहे. तसेच त्यापासून विविध औषधे तयार करता येतील. कृषी आणि औद्योगिक प्रक्रियांमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्यातील प्रदूषक घटक कमी करण्यासाठी वापरता येईल. या विषयी माहिती देताना न्यू ब्रुन्सविक येथील रुटगर्स विद्यापीठातील वॉक्समन सूक्ष्मजीवशास्त्र संस्थेचे संचालक जोआचिम मेस्सिंग यांनी सांगितले, की जनुकीय संरचना समजून घेऊन, त्यांचे विश्लेषण करण्याच्या नव्या पद्धती विकसित झाल्यामुळे एखाद्या वनस्पतींचे संपूर्ण जनुकीय विश्लेषण शक्य झाले आहे. प्रथिने, खनिजे यांची पूर्तता शक्य प्रो. एरिक लॅम या पूर्वी मेस्सिंग यांच्या प्रयोगशाळेमध्ये संशोधक म्हणून काम करत होत्या. आता त्यांच्या नेतृत्त्वाखाली चीन येथील शांघाय जियावो तोंग विद्यापीठातील प्रयोगशाळेमध्ये डकवीड उत्पादन संशोधन आणि विकास यावर काम केले जात आहे. त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये जगभरातील डकवीडच्या सुमारे ९०० पेक्षा अधिक जाती, उपजाती यांचे सर्वांत मोठे संग्रहालय आहे. त्या म्हणाल्या, की डकवीड हे मानवाबरोबरच मासे, कोंबड्या किंवा जनावरांच्या खाद्यामधील प्रथिने आणि खनिजयुक्त घटकांच्या पूर्ततेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com