बुरशींच्या ओळखीसाठी वनस्पतींना मध्यस्थ लागत नाही

बुरशींच्या ओळखीसाठी वनस्पतींना मध्यस्थ लागत नाही
बुरशींच्या ओळखीसाठी वनस्पतींना मध्यस्थ लागत नाही

जर्मनी येथील मॅक्स प्लॅंक वनस्पती पैदास संशोधन संस्थेतील संशोधकांनी वनस्पतीची प्रतिकारक प्रथिने आणि बुरशीची मूलद्रव्ये यात सरळ भौतिक संबंध असल्याचे उघड केले आहे. जेव्हा जेव्हा प्रादुर्भावाचा प्रयत्न होतो, त्या वेळी त्यावर त्वरित हल्ला करून नेस्तनाबूत करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत असल्याचे संशोधकांचे मत आहे. यातून पिकांच्या प्रजातींमध्ये रोगांसाठीची प्रतिकारकक्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे शक्य होणार आहे. भुरीसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अनेक वनस्पतींवर होतो. प्रमुख मानल्या जाणाऱ्या तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये घट येते. भुरीसाठी कारणीभूत बुरशी वनस्पतींच्या पेशीमध्ये विशिष्ठ अशी मूलद्रव्ये सोडते, त्यामुळे यजमानामध्ये भौतिक आणि प्रतिकारक यंत्रणेच्या पातळीवर बदल होते. या रोगाला प्रतिक्रिया म्हणून काही वनस्पती प्रतिकारक जनुके विकसित करतात. त्यांना सामान्यतः आंतरपेशीय प्रतिकारक रिसेप्टर्स म्हणतात. ती बुरशीची प्राथमिक मूलद्रव्ये ओळखून त्यांना रोखण्यासाठी काम सुरू होते. मात्र, पूर्वीच्या मतानुसार वनस्पती आणि सूक्ष्मजीव यांच्यातील ओळख पटवण्याची क्रिया अत्यंत अत्यल्प पातळीवर होते. त्यासाठी बार्लीच्या विविध प्रजातींमध्ये भुरीच्या रिसेप्टर्सपैकी एक, मिल्ड्यू लोकस ए (Mla) तयार केले जाते. त्यातून पुढे अनेक एमएलए प्रथिनांचे वेगवेगळे घटक तयार केले जातात. त्यांच्या डीएनए संरचनेमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक समानता असते. त्याचाच अर्थ भुरीच्या घटकांसह त्यांचीही सहउत्क्रांती होत गेली असावी. मात्र, निसर्गातील प्रतिकारक रिसेप्टर्स आणि त्याला कारणीभूत ठरणारे इफेक्टर्स यांच्या उत्क्रांतीतील संबंध आणि समन्वय याबाबत अस्पष्टता आहे. ही अस्पष्टता दूर करण्यासाठी पॉल शुल्झज लेफेर्सट विभागातील इसाबेल सौर, सास्किया बायुर आणि सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतातील भुरीच्या बुरशीची वेगवेगळी इफेक्टर्स वेगळी मिळवली. केवळ दोन वगळता अन्य सर्व प्रथिने एकमेकांपेक्षा प्रचंड वेगळी होती. त्यानंतर संशोधकांनी ही इफेक्टर्स कार्यान्वित करून त्याच्याशी जुळणाऱ्या एमएलए रिसेप्टर्सची ओळख पटवली. कारण, या प्रक्रियेमुळे केवळ बार्लीच नव्हे तर तंबाखूच्या पेशीही मृत होतात. या इफेक्टर्सच्या ओळखीसाठी बार्लीमध्ये अन्य कोणत्याही प्रथिनाची आवश्यकता नसल्याचे दिसून आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com