agricultural stories in Marathi, agrovision, Rice cultivation: Balance of phosphorus and nitrogen determines growth and yield | Agrowon

नत्र, स्फुरदाच्या संतुलनासाठीची भातातील यंत्रणा ओळखली

वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

बीजिंग येथील चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसअंतर्गत जनुकशास्त्र आणि विकासात्मक जीवशास्त्र संस्थेतील शास्त्रज्ञांनी सेप्लास येथील डॉ. स्टॅनिस्लाव कोप्रिवा यांच्या सहकार्याने आशियन भात जातीतील पोषकता नियंत्रणाची यंत्रणा शोधली आहे. त्यामुळे पिकांची पोषकतेची गरज शाश्वत पद्धतीने भागविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत.

बीजिंग येथील चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसअंतर्गत जनुकशास्त्र आणि विकासात्मक जीवशास्त्र संस्थेतील शास्त्रज्ञांनी सेप्लास येथील डॉ. स्टॅनिस्लाव कोप्रिवा यांच्या सहकार्याने आशियन भात जातीतील पोषकता नियंत्रणाची यंत्रणा शोधली आहे. त्यामुळे पिकांची पोषकतेची गरज शाश्वत पद्धतीने भागविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत.

पिकाच्या उत्पादकतेवाढीसाठी नत्र आणि स्फुरद यांच्यामध्ये योग्य संतुलन असण्याची आवश्यकता असते. ही दोन्ही मूलद्रव्ये जमिनीतून पिकाच्या मुळाद्वारे उचलली जातात. पूर्वी ज्ञात असल्यापेक्षाही अधिक प्रमाणात या दोन्ही मूलद्रव्यांमध्ये समन्वय होत असल्याचे दिसून आले आहे. या अभ्यासामध्ये नायट्रोजनचे नायट्रेट (Nitrate-NRT१.१B-SPX४) आणि स्फुरदाच्या पिकातील संदेश यंत्रणा संशोधकांना आढळल्या आहेत. हे संशोधन ‘जर्नल नेचर प्लॅंट्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

संशोधनाविषयी माहिती देताना कोप्रिवा म्हणाले की, कोणत्याही सजीवाच्या आरोग्यदायी आणि वेगवान वाढीसाठी मूलद्रव्याचे योग्य संतुलन आवश्यक असते. वनस्पती हे संतुलन नेमेक कशा प्रकारे साधतात, याविषयी फारच अल्प माहिती उपलब्ध होती. जर नत्राचे प्रमाण योग्य असल्यास पिकाच्या वाढ अणि उत्पादनावर स्फुरदाचे परिणाम अधिक चांगले होत असल्याचे आढळले आहे. थोडक्यात, नायट्रोजन हे मूलद्रव्य ज्या यंत्रणेद्वारे स्फुरदाच्या शोषणावर नियंत्रण ठेवते, त्याविषयी आम्हाला शोध लागला आहे.

या यंत्रणेचा मूलद्रव्यीय पातळीवर शोध घेतला आहे. यात वनस्पतीमध्ये नायट्रेटचे प्रमाण ओळखणारे प्रथिन असून, त्याद्वारे संदेशन पोचवणारी साखळी आहे. हे वाहक स्फुरदाच्या वहनाला चालना देतात. कोप्रिवा यांनी सांगितले, की या यंत्रणेतील अनेक घटक वेगवेगळे माहित असले तरी त्यांच्या संदेशांच्या एकूण साखळीची प्रणाली या अभ्यासातून पुढे आली आहे. यामुळे पिकांच्या पोषकतेच्या नियंत्रणाविषयी अधिक माहिती उपलब्ध झाली आहे. भविष्यामध्ये या माहितीद्वारे अधिक प्रगत अशा भातजातींचा विकास करणे शक्य होईल.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
राज्यात कोरोनामुळे आणखी दोन मृत्यू;...पुणे: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या...
वऱ्हाडात पूर्वमोसमी पावसाचा पुन्हा तडाखाअकोला  ः  वऱ्हाडातील काही भागांत...
‘कोरोना’ मुकाबल्यासाठी अकोल्यात टास्क...अकोला ः कोरोना विषाणूमुळे लागू असलेल्या...
‘कोरोना’विरुद्धचा लढा मानवजातीच्या...मुंबई: ‘कोरोना’विरुद्धचा लढा राज्य, देशांच्या...
फुलंब्री, भोकरदन तालुक्यात गारपीट;...औरंगाबाद/जालना : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील...
बुलडाण्यात ‘कोरोना’बाधिताचा मृत्यू;...बुलडाणा : जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधिताचा मृत्यू...
नाशिकमध्ये आढळला कोरोनाबाधित रुग्ण नाशिक : जिल्ह्यात ‘कोरोना’चा रुग्ण आढळून...
नाशिक : ‘सह्याद्री’ उपलब्ध करुन देणार...नाशिक : शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली...
सातारा जिल्ह्यात सात लाख मेट्रीक टन ऊस...सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
कोरोनाच्या माहिती संकलनासाठी ऑनलाईन...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोलापुरात वैद्यकीय सामग्री खरेदीसाठी...सोलापूर  : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
पुणे जिल्हा बॅंकेकडून पीक कर्ज...पुणे ः शेतकऱ्यांना पीक कर्जाची परतफेड करण्यासाठी...
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी विरोधात...नाशिक : जीवनावश्यक वस्तूंची विक्री करतांना...
अकोला जिल्ह्यात फूलशेतीचे झाले मातेरेअकोला ः जिल्ह्यात फूलशेतीचे माहेरघर म्हणून...
मोर्शीत हमीभावाने तूर खरेदी रखडलीअमरावती ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आर्थिक...नांदेड  : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणीत घरपोच भाजीपाला विक्री ठरतेय...परभणी ः मिरखेल आणि देशमुख पिंपरी येथील...
विदर्भात फुलांची उलाढाल ठप्पनागपूर  ः बंद काळात फळे, भाजीपाला...
तिडे येथे १४५ एकरांवरील कलिंगडे...चिपळूण, जि. रत्नागिरी  ः मंडणगड तालुक्यातील...