agricultural stories in Marathi, agrovision, School children who nap are happier, excel academically | Agrowon

दुपारची झोप मुलांना करते अधिक आनंदी
वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

जी शाळकरी मुले आठवड्यातून किमान तीन वेळा दुपारी ३० ते ६० मिनिटांची झोप घेतात, ती अधिक आनंदी राहतात. अशी मुले अधिक स्वनियंत्रित राहण्यासोबत वर्तनविषयक समस्यांपासून दूर राहत असल्याचे संशोधनात आढळले आहे. या मुलांचा बुद्ध्यंकही चांगला राहून शिक्षणामध्ये चांगली प्रगती करतात. या संशोधनाचे निष्कर्ष जरनल स्लीपमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

जी शाळकरी मुले आठवड्यातून किमान तीन वेळा दुपारी ३० ते ६० मिनिटांची झोप घेतात, ती अधिक आनंदी राहतात. अशी मुले अधिक स्वनियंत्रित राहण्यासोबत वर्तनविषयक समस्यांपासून दूर राहत असल्याचे संशोधनात आढळले आहे. या मुलांचा बुद्ध्यंकही चांगला राहून शिक्षणामध्ये चांगली प्रगती करतात. या संशोधनाचे निष्कर्ष जरनल स्लीपमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

मुलांच्या आरोग्यासाठी दुपारची अर्धा ते एक तासाची झोप आवश्यक आहे. त्यामुळे मुलांचे बदलते मूज, ऊर्जा पातळी आणि शाळेतील चांगल्या प्रगती साध्य होत असल्याचे सर्वसामान्य पालकांचेही मत असते. त्या मताला पेनसिल्व्हानिया विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या संशोधनाचे पाठबळ मिळाले आहे.
पेनसिल्वानिया विद्यापीठातील संशोधक अॅड्रियन रैने यांनी चौथी, पाचवी आणि सहावीच्या १० ते १२ वयोगटातील सुमारे ३ हजार मुलांचा अभ्यास केला. त्यांनी सांगितले, की जी मुले आठवड्यातून किमान ३ व त्यापेक्षा अधिक वेळा अर्धा ते एक तासाची झोप घेतात, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये ७.६ टक्क्यांनी वाढ होते आणि हे कोणत्या पालकांना नको आहे?
झोपेची कमतरता आणि दिवसभरातील आळसाचे प्रमाण आश्चर्यकारकरीत्या वाढलेले आहे. त्याचा परिणाम सुमारे २० टक्के मुलांमध्ये दिसून येतो. त्याचे विपरीत परिणाम नकारात्मकता, भावनिक आणि भौतिक पातळीवर दिसून येत असल्याचे जियांगझोंग लियू यांनी सांगितले. यापूर्वी असे अभ्यास हे प्रामुख्याने शाळा सुरू होण्याआधी आणि लहान मुलांवर करण्यात आले आहेत.

असा झाला अभ्यास

  • अमेरिकेत मूल जसजसे मोठे होत जाते, तशी त्याची दुपारची झोप बंद होते. चीनमध्ये ही सवय त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये रुळली असून, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेबरोबर प्रौढ होईपर्यंत टिकते. लियू आणि रैने यांनी रुई फेंग या जैवसंख्याशास्त्रज्ञ आणि सारा मेडनिक अशा सहकाऱ्यांसोबत एक अभ्यास केला. २००४ मध्ये केलेल्या अभ्यासामध्ये २९२८ मुलांचा समावेश होता. या मुलांची दुपारी झोपण्याच्या वेळा, वारंवारता आणि कालावधी यांची माहिती गोळा करण्यात आली. चौथी ते सहावी या काळामध्ये मुलांच्या नकारात्मकता, आनंदीपणा, नवे शिकण्याची वृत्ती याबरोबरच शरीर वस्तुमान निर्देशांक, ग्लुकोज पातळी अशा मानसिक व शारीरिक स्वास्थ्यांच्या निकषावर मापन केले. सोबतच त्यांच्या शालेय प्रगतीचा आढावा घेतला.
  • मेडनिक यांनी सांगितले, की दुपारची झोप किंवा वामकुक्षीमुळे मेंदूच्या कार्याला अधिक वेळ मिळतो. दुपारी थोडी झोप घेणाऱ्या मुलांना त्याचा मानसिक आणि शारीरिक पातळीवर फायदा होतो. सोबत त्यांची शालेय प्रगतीतही भर पडते.

 

इतर ताज्या घडामोडी
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...