मधमाश्यांना पूरक झाडांचा घेतला शोध

मधमाश्यांना पूरक झाडांचा घेतला शोध
मधमाश्यांना पूरक झाडांचा घेतला शोध

मधमाश्यांसाठी पूरक अशा प्रक्षेत्राची निर्मिती करण्यासाठी शेतकरी आणि घरगुती बागधारकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. अशा लोकांनी कोणत्या वनस्पतींची, झाडांची लागवड करावी, यासाठी शास्त्रीय शिफारशीही करण्यात येतात. या शिफारशी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी ओहिलो प्रांतातील पाच ठिकाणांवरील सुमारे ७२ स्थानिक आणि अस्थानिक वनस्पती प्रजातींचे सर्वेक्षण केले आहे. त्यातून मधमाश्यांना आकर्षित करणाऱ्या वनस्पती प्रजातींची ओळख पटवण्यात आली आहे. मधमाश्या या एकूण परिसंस्थेचा महत्त्वाचा घटक असून, ७५ टक्के खाद्य पिकांच्या परागीकरणामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. गेल्या काही वर्षांमध्ये रहिवासाचा आणि खाद्य वनस्पतींचा ऱ्हास यामुळे त्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. विशेषतः शहरी आणि निमशहरी भागामध्ये मधमाश्यांना आकर्षित करणाऱ्या झाडांझुडूपांची संख्या कमी होत गेली आहे. वास्तविक एक झाड किंवा झुडूप हजारो फुलांची निर्मिती करत असते. त्यात मधमाश्यांना प्रथिने आणि कर्बोदकांनी परिपूर्ण असे परागकण, मधुरस पुरवण्याची क्षमता असते. अशा झाडांची निवड शेत परिसर, घरगुती व सार्वजनिक बागा येथे करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नेमक्या वनस्पतींची निवड करण्यासाठी डॉ. डॅनियल पॉटर यांनी ओहिओ प्रांतातील सुमारे ७२ स्थानिक आणि अस्थानिक झाडांचे सर्वेक्षण केले. त्यावर आकर्षित होणाऱ्या माश्यांचे प्रमाण मोजण्यात आले. त्यातील महत्त्वाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे... १) स्थानिक आणि अस्थानिक वनस्पती या दोन्हीही विविध प्रकारच्या मधमाश्यांच्या समुदायांना आकर्षित करतात. अस्थानिक वनस्पतींमध्ये फुलोऱ्याचा कालावधी वाढतो. २) फुलांचा प्रकार हा महत्त्वाचा असून, अलीकडे विकसित करण्यात आलेल्या दुहेरी पाकळ्यांची फूल जाती या मधमाशांना आकर्षित करत नाहीत. ३) मधमाशा आकर्षित होणाऱ्या वनस्पती या प्रामुख्याने कीडरहित असल्याने घरगुती बागेमध्ये लावण्यासाठी उपयुक्त ठरतात. ४) बाग किंवा शेतामध्ये वर्षभर फुलोरा राहील अशा प्रकारे नियोजन करावे लागेल. उदा. कॉर्नेलियन चेरीला वसंताच्या सुरवातीला फुलोरा येतो, तर बॉटल ब्रश बकआय झाडे उन्हाळ्यामध्ये बहरलेली असतात आणि सेव्हन सन्स फुलझाडे शरदांमध्ये फुललेली असतात. ५) हिवाळ्यामध्ये फुलोऱ्याचे स्रोत पुरवणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यासाठीही काही शिफारसी डॉ. पॉटर यांनी आपल्या वेबकास्टमध्ये सुचवलेल्या आहेत. १९ मिनिटांच्या या वेबकास्टमध्ये मधमाश्यांसाठी आवश्यक त्या वनस्पतींचे नियोजन करण्याविषयी माहिती देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com