जंगलतोडीचे मातीतील जैवविविधतेवर होतात विपरीत परिणाम

जंगलतोडीचे मातीतील जैवविविधतेवर होतात विपरीत परिणाम
जंगलतोडीचे मातीतील जैवविविधतेवर होतात विपरीत परिणाम

कोलोरॅडो राज्य विद्यापीठातील संशोधकांनी अॅमेझॉनमधील जंगलातील मातीतील जैवविविधतेबाबत झालेल्या ३०० अभ्यासांचे विश्लेषण केले आहे. त्यातून जंगलतोडीमुळे घटत चाललेल्या बायोमास आणि मातीतील जैवविविधतेचे प्रमाण मिळण्यात आले आहे. घनदाट जंगलामुळे ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉन खोऱ्यामध्ये जंगलतोडीमुळे विविध परिणाम दिसून येत आहे. त्याचा प्रमुख फटका येथील भरगच्च असलेल्या जैवविविधतेला बसत असून, जैवविविधतेच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना धोका निर्माण होत आहे. जंगलतोडीचे वनस्पती आणि प्राणी प्रजातींवर होणारे परिणाम सातत्याने तपासले जात असले, तरी त्याचे मातीतील विविध सूक्ष्मजीव, बुरशी व अन्य घटकांच्या विविधतेवरील परिणामांविषयी अधिक जाणून घेण्याची आवश्यकता कोलोरॅडो राज्य विद्यापीठातील जीवशास्त्र विभागातील संशोधक अॅन्ड्रे फ्रॅन्को यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी अॅमेझॉन खोऱ्याती जंगल व परिसरातील जंगलतोडीनंतर शेतीसह विविध कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या मातीतील जैवविविधतेसंदर्भात झालेल्या सुमारे ३०० अभ्यासांचे पुन्हा विश्लेषण केले आहे. कारण, एकूणच मातीच्या सुपीकतेसाठी ही माहिती उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या याबाबत फारसा अभ्यास झालेला नाही. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘कॉन्झर्वेशन ऑफ बायोलॉजी’च्या जूनमध्ये प्रकाशित होणाऱ्या अंकात प्रकाशित करण्यात येणार आहेत.

  • मातीतील जैवविविधतेमध्ये सूक्ष्मजीवांसोबतच गांडुळे, वाळवी, बहुपाद प्राणी, शेणकिडे, सूत्रकृमी, कोळी, कातीण आणि विंचू यासारखे अनेक सजीव येतात.
  • ब्राझीलमधील उपलब्ध मातीच्या जैवविविधतेबाबतचा माहिती साठा प्रथमच एकत्रित करून त्याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
  • मातीचे अभियंते म्हणून ओळखले जाणारी गांडुळे, वाळवी यासारखे अपृष्ठवंशीय जीव जंगलतोडीसाठी संवेदनशील आहेत. त्यांच्या संख्येवर व प्रमाणावर विपरीत परिणाम होतात. त्यातही जंगलाचे रूपांतर केवळ कुरणांमध्ये झाल्यास शेतीमध्ये रूपांतरणाच्या तुलनेमध्ये अधिक फटका बसत असल्याचे दिसून आले. याच्यापेक्षा उलटा परिणाम सूक्ष्मजीवांच्या जैवविविधतेबाबत दिसून येतो.
  • फ्रॅन्को यांनी सांगितले, की अॅमेझॉनच्या बाजूच्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी वार्षिक सरासरी अधिक पाऊस असलेल्या आणि जमिनी आम्लधर्मी असलेल्या ठिकाणी जैवविविधतेला सर्वाधिक फटका बसत असल्याचे समोर आले आहे. या भागामध्ये जैवविविधतेच्या संवर्धनासाठी अधिक आणि प्राधान्यपूर्वक प्रयत्न करावे लागतील.
  • वणवे आणि पाणी साचून राहण्यासारख्या अडथळ्यांबाबत काही अभ्यास झाले आहेत. अद्याप तरी अॅमेझॉनच्या जंगलामध्ये पाणी सोडणे, साचवणे ही अधिकृच व्यवस्थापन पद्धती मानली जाते.
  • अॅमेझॉन खोऱ्यातील नऊपैकी बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, व्हेनेझुएला, गयानास सरीनाम, फ्रेंच गयाना अशा सात देशांमध्ये जैवविविधतेच्या माहितीचा अभाव आहे.
  • शेतकऱ्यांबरोबर काम करण्याची आवश्यकता ब्रुनो सोब्राल यांनी सांगितले, की जैवविविधता हा आजचा सर्वाधिक महत्त्वाचा विषय आहे. नुकताच संयुक्त राष्ट्रसंघाने याविषयी एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यामध्ये जागतिक पातळीवर घसरत चाललेल्या निसर्गाच्या समतोलाबाबत भाष्य करण्यात आले आहे. बहुतांश देशांमध्ये जैवविविधता ही केवळ पक्षी आणि सस्तन प्राण्यांशी जोडलेली आहे. सोब्राल यांच्या मते, अॅमेझॉन खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने काम करण्याची आवश्यता असून, ब्राझीलमधील दोन संशोधन संस्थांना याबाबत काम सुरू केले आहे. मातीचे नमुने गोळा करून विश्लेषण केले जात आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com