सूत्रकृमी करणार अवकाश प्रवास

सूत्रकृमी करणार अवकाश प्रवास
सूत्रकृमी करणार अवकाश प्रवास

अमेरिकी कृषी विभागाच्या कृषी संशोधन सेवा आणि फेरोनायम (अलाचुवा, एफएल) यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावर सूत्रकृमींना पाठवण्यात येणार आहे. भविष्यामध्ये अवकाशामध्ये शाश्वत शेतीच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सूत्रकृमींना ही अवकाश सहल घडणार आहे. अवकाशामध्ये दीर्घकालीन वास्तव्यासाठी अन्नांची निर्मिती करण्याचे प्रयोग सातत्याने होत असतात. त्याचप्रमाणे अत्यंत दीर्घ प्रवासामध्ये सजीवांवर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास केला जातो. थोडक्यात, अवकाशामध्ये जैविक नियंत्रणाचा हा पहिला प्रयोग करण्यात येणार आहे. त्याविषयी माहिती देताना एआरएसचे बायरन (जॉर्जिया) येथील कीटकशास्त्रज्ञ डेव्हिड शापिरो-आयलॅन यांनी सांगितले, की या प्रयोगामध्ये उपयुक्त अशा सूत्रकृमींच्या हालचाली आणि प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात येणार आहे. हे सूत्रकृमी कृषिक्षेत्रामध्ये विविध किडींच्या नियंत्रणासाठी वापरले जातात. ते मानवासह अन्य प्राण्यांना हानी न पोचवणारे आणि पर्यावरणपूरक असल्याने अनेक रासायनिक कीटकनाशकांना पर्याय म्हणून वापरले जातात. यातही वैशिष्ट्यांची बाब म्हणजे सूत्रकृमींच्या पचनसंस्थेचील सहजीवी जिवाणूंची यजमान किडींच्या नियंत्रणासाठी मदत होते. गेल्या २० वर्षांपासून शापिरो- आयलॅन या शाश्वत कीड व्यवस्थापनांमध्ये सूत्रकृमींच्या वापराचा अभ्यास करीत आहेत. त्या म्हणाल्या, की अवकाशामध्ये असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गुरुत्वाकर्षण नसलेल्या स्थितीमध्ये सूत्रकृमींच्या परजिवीकरणाच्या मूलभूत प्रक्रियेवर होणारे परिणाम जाणून घेतले जातील. त्याचप्रमाणे त्यांचे मातीतील वास्तव्य, वॅक्स वर्म (शा. नाव -Galleria mellonella)) या कीटकांवर प्रादुर्भाव करण्याची क्षमता यांचा अवकाशातील तीस दिवसांमध्ये अभ्यास केला जाईल. त्याच वेळी पृथ्वीवरील वातावरणात नियंत्रित प्रयोग केले जातील, त्यातून दोहोची तुलना करण्यात येईल. या अवकाश प्रयोगामध्ये भागीदार असलेल्या फेरोनायम कंपनीचे कार्यकारी अधिकारी फातमा काप्लान या प्रकल्पाचे संचालकही आहेत. फेरोनायम ही कंपनी सूत्रकृमींचे गंध विकसित करण्याचे काम करते. या गंधामुळे सूत्रकृमींच्या अधिक पसरण्यासाठी केला जातो. अशा घटकांचा सूत्रकृमींवर अत्यंत अल्प गुरुत्वार्षण असलेल्या स्थितीमध्ये काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात येणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com