प्रतिजैविक प्रतिरोधकता वेगाने पोचतेय दुर्गम भागापर्यंतही

प्रतिजैविक प्रतिरोधकता वेगाने पोचतेय दुर्गम भागापर्यंतही
प्रतिजैविक प्रतिरोधकता वेगाने पोचतेय दुर्गम भागापर्यंतही

आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाला प्रतिजैविकांना प्रतिरोधक असे जनुक ग्रामीण भारतामध्ये प्रथमच आढळले होते. त्यानंतर केवळ तीन वर्षामध्येच हे प्रतिजैविक प्रतिरोधक जनुक येथून सुमारे ८ हजार मैल दूर दिर्गम व मानवी हस्तक्षेपविरहित आर्टिक्ट भागामध्येही आढळले आहे. अशा प्रकारे सर्वत्र प्रसार होत असल्याने वैद्यकीयदृष्ट्या धोक्यातही वाढ होत आहे. हे संशोधन जर्नल एन्व्हायर्न्मेंटल इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. न्यूकॅसल, यॉर्क आणि कान्सास अशी तीन विद्यापीठे, चायनीज अॅकेडमी ऑफ सायन्सेस अशा संस्थांमधील आंतरराष्ट्रीय संशोधक गटाने ब्रिटन नैसर्गिक पर्यावरण संशोधन परिषद आणि अन्य संस्थांच्या आर्थिक पाठबळाने हा अभ्यास पुढे नेला आहे. त्यांनी विविध आठ ठिकाणांवरून मातीचे नमुने घेतले असून, त्यात १३१ एआरजी आढळले आहेत. विशेषतः न्यूकॅसल विद्यापीठातील संशोधक प्रो. डेव्हिड ग्रॅहम हे गेल्या पंधरा वर्षापासून प्राणी आणि माणसांच्या आतड्यातील सूक्ष्मजीवांमधील प्रतिजैविक प्रतिरोधकतेचा अभ्यास करत आहेत. त्यांना विशेषतः पाण्याच्या पृष्ठभागावरून घेतलेल्या नमुन्यात बीएलए एनडीएम १ आणि वैद्यकीयदृष्ट्या अन्य महत्त्वाचे एमडीआर जनुके आढळली आहेत. त्यांचा प्रसार पक्षी, वन्यजीव आणि मानवी पर्यटकांच्या विष्ठेच्या माध्यमातून होत असावा. ध्रुवावरील प्रदेश हे पृथ्वीवरील प्राचीन पर्यावरणापैकी असून, कोणत्याही प्रतिजैविक पूर्व सजीवांच्या गुणधर्मांच्या अभ्यासासाठी उत्तम मानले जातात. जगभरामध्ये वाढत चाललेल्या प्रतिरोधकतेचा दर काढण्यासाठी निकष म्हणून त्यांचा वापर केला जातो. मात्र, भारतातील ग्रामीण भागामध्ये पाण्याच्या पृष्ठभागावर बीएलए एनडीएम १ हे जनुक आढळले. त्यानंतर तीन वर्षांच्या आतच हे जनुक ८ हजार मैल दूर मानवी हस्तक्षेपविरहित असलेल्या आर्टिक्ट प्रदेशातही आढळला आहे. उच्च आर्टिक्ट प्रदेशातील मातीच्या नमुन्यामध्ये बीएलए एनडीएम १ या प्रतिजैविक प्रतिरोधक जनुके आढळली आहेत. वेगाने प्रसारामध्ये धोक्यात वाढ ः

  • एनडीएम १ हे प्रथिन विविध जिवाणूंमध्ये प्रतिकारकता विकसनाशी संबंधित आहे. त्याचा वैद्यकीयदृष्ट्या शोध २००८ मध्ये लागला असला तरी त्यानंतर दोन वर्षांत (२०१० मध्ये) नवी दिल्ली परिसरातील पृष्ठभागावरील पाण्यामध्ये बीएलए एनडीएम १ या प्रतिकारक जनुकांच्या विश्लेषणातून लागला. त्यानंतर आतापर्यंत या जनुकाचा आढळ १०० पेक्षा अधिक देशांमध्ये दिसून येत आहे.
  • जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रतिजैविकांचा वापर होत असल्याने त्याविषयी विविध जिवाणूंमध्ये प्रतिकारकता विकसित होत आहे. अशा प्रतिकारक जिवाणूंच्या नव्या प्रजातींचा वेगळा वर्ग उदयाला येत आहे. विष्ठा आणि सांडपाण्यांच्या माध्यमातून त्यांचा प्रसारही तितक्याच वेगाने होत आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com