नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्य
कृषी प्रक्रिया
व्हॅनिलामुळे दूध लागते अधिक गोड
गोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला असता ते अधिक गोड असल्याचे ग्राहकांचे मत होते आणि ते त्यामध्ये आणखी साखर घालण्याचे टाळतात. ही बाब अमेरिकेच्या राष्ट्रीय शालेय भोजन कार्यक्रमासाठी कमी साखरयुक्त चॉकलेट दुधाची संकल्पना विकसित करण्यासाठी संशोधकांना उपयोगी होणार आहे.
गोड दुधामध्ये व्हॅनिला स्वादाचा अंतर्भाव केला असता ते अधिक गोड असल्याचे ग्राहकांचे मत होते आणि ते त्यामध्ये आणखी साखर घालण्याचे टाळतात. ही बाब अमेरिकेच्या राष्ट्रीय शालेय भोजन कार्यक्रमासाठी कमी साखरयुक्त चॉकलेट दुधाची संकल्पना विकसित करण्यासाठी संशोधकांना उपयोगी होणार आहे.
अन्नशास्त्रामध्ये एखाद्या अन्नातील गुणधर्म आणि त्याची अन्य अन्नपदार्थांसोबतची जोडी यांचा विचार केला जातो. एकमेकांच्या चवीचा, स्वादाचा परिणाम अंतिम भोजनाच्या परिणामावर नक्कीच होतो. अशीच एक बाब दुधामधील व्हॅनिला स्वादाशी जोडली असल्याचे पेन राज्य विद्यापाठीतील संशोधकांना आढळली आहे. त्याविषयी माहिती देताना अन्नशास्त्र विभागातील सहायक प्रा. हेलेने हॉपफर यांनी सांगितले, की गंध आणि चव यांच्यातील संबंध समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे पदार्थातील साखरेचे प्रमाण कमी करणे शक्य होऊ शकते. कोणत्याही पदार्थातील साखर कमी करणे हे त्यातील मेद आणि मीठ करण्याइतकेच आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
गेल्या तीन वर्षांपासून हॉपफर यांच्या प्रयोगशाळेमध्ये सध्या दोन वर्षांचा एक प्रकल्पावर काम सुरू आहे. त्यात वेगवेगळ्या पदार्थांचा गंध आणि चव यातील संबंधाविषयी अभ्यास केला जात आहे. त्यासाठी अंधचाचण्या घेतल्या जातात. यामध्ये चव घेणाऱ्या व्यक्ती दुधामध्ये कोणता गंध मिसळला आहे, याची जाणीव नसते. केवळ नमुन्याच्या चवी घेताना सारख्याच प्रमाणामध्ये साखर मिसळलेली असताना व्हॅनिला गंध असलेल्या दुधाला अधिक गोडी असल्याचे त्यांना जाणवले. या प्रयोगातून अशा फ्लेवर्ड दुधातील साखरेचे प्रमाण २० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य असल्याचे मत ग्लोरिया वांग यांनी व्यक्त केले.
ग्लोरिया वांग या कोलोरॅडो येथील कंपनीमध्ये पदार्थ विकसनामध्ये संशोधन करतात. त्यांनी केवळ अशा चांगल्या जोड्यावरच नव्हे तर अयोग्य जोड्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. उदा. जर दुधाला मांसाचा वास आला तरी त्याची गोडी अधिक असल्याचे जाणवते. संशोधनांचे हे निष्कर्ष ‘फूड क्वालिटी अॅण्ड प्रेफरन्स’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
- 1 of 15
- ››