लंडनच्या बाजारात उतरवली ‘व्हेगान सुशी’

लंडनच्या बाजारात उतरवली ‘व्हेगान सुशी’
लंडनच्या बाजारात उतरवली ‘व्हेगान सुशी’

लंडनस्थित इमा या कंपनीने कोणतेही प्राणीज अन्न न खाणाऱ्या लोकांसाठी (व्हेगान) खास सॅलमोन सुशीची निर्मिती केली आहे. बाजारपेठेमध्ये संपूर्ण शाकाहारी असलेल्या लोकांसाठी हे उत्पादन अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याची माहिती कंपनीच्या संस्थापिका जेस्सिका छॅन यांनी दिली. इमा हा जपानी शब्द असून, त्याचा अर्थ ‘आता’ असा आहे. ही जपानी कंपनी माशापासून बनवल्या जाणाऱ्या सुशीसाठी लोकप्रिय आहे. या कंपनीने अगदी दुधासारखे प्राणीज पदार्थही वर्ज्य असलेल्या शाकाहारी (व्हेगान) लोकांसाठी खास सुशी बाजारात आणली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मासेमारी आणि सागरी पर्यावरणाविषयी जागरूक असलेल्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. अनेक लोक वनस्पतीजन्य आहाराकडे वळत आहेत. जपानी वैशिष्ट्य असलेला सुशी हा खरा तर माशांपासून बनवला जाणारा पदार्थ आहे. मात्र, तो वनस्पतीपासून तितक्याच चांगल्या दर्जाचा आणि चवीचा बनवण्यात कंपनीला यश आले आहे. या उत्पादनाच्या पॅकेजिंगसाठी प्लॅस्टिक टाळण्यात आले असून, खास पर्यावरणपूरक ट्रेचा वापर केला आहे. छॅन यांनी डिसेंबर २०१७ मध्ये इमा कंपनीची स्थापना केली. खास माशांपासून बनणाऱ्या या पदार्थाला व्हेगान पर्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वनस्पतीजन्य पदार्थ म्हणजे बेचव ही ओळख काढून टाकण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यासाठी त्यांनी नाविन्यपूर्ण सुशी स्वाद तयार केले आहेत. ते कोणत्याही सुशी खाणाऱ्या व्यक्तींना आवडतील, असा त्यांचा दावा आहे.

गेल्या आठवड्यामध्ये लंडनमधील प्लॅनेट ऑरगॅनिक स्टोअर्समध्ये पहिल्या व्हेगान सॅलमोन सुशी उपलब्ध केली आहे. यासाठी कंपनीअंतर्गत संशोधनामध्ये सॅलमोन माशांच्या मांसाला पर्याय म्हणून बेससाठी आशियन कंदभाजी कोन्जॅकचा वापर केला आहे. त्याची चव, दिसणे हे दोन्ही सामान्य सुशीप्रमाणे असून, ते तोंडात टाकताच विरघळून जाते. लोकांचा प्रतिसाद चांगला मिळण्याची अपेक्षा आहे. आशियन कोन्जॅक भाजीचा केला वापर

हॉंगकॉंगच्या एका भेटीमध्ये कोन्जॅक या कंद भाजीची ओळख झाली. तिचे शास्त्रीय नाव अॅमोरफोफॅल्लस कोन्जॅक असे आहे. वस्तूतः कोन्जॅक भाजीला स्वतःचा रंग, चव नाही. त्यात भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असून, सामान्यतः विविध पदार्थांना घट्ट करण्यासाठी किंवा पोत आणण्यासाठी जिलेटीनला पर्यायी म्हणून वापरली जाते. ती खाताना एखाद्या जेलीप्रमाणे लागते. हे सगळे गुणधर्म सॅलमोनपेक्षा संपूर्ण भिन्न असल्यामुळे खरे आव्हान होते. यामध्ये विविध प्रमाणामध्ये अन्य घटक मिसळत पदार्थाला योग्य तो पोत आणण्यात यश आले आहे. ते सॅलमोन साशिमीप्रमाणे तोंडात टाकताच विरघळते. नेहमीचे सॅलमोन साशिमी या सोया सॉसमध्ये बुडवून खाल्ल्या जातात. त्यामुळे त्या अनुषंगाने व्हेगान सुशीची चवही तशीच ठेवण्यात आली आहे. व्हेगान बाजारपेठ

  • मिंटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंडमध्ये २०१८ या वर्षी व्हेगान पदार्थांची विक्री सुमारे ७४० पौंड इतकी होती. यामध्ये मांसरहित खाद्यपदार्थाच्या संख्येमध्येही २०१३ ते २०१८ या काळात २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • टेस्को ही इंग्लंडमधील सर्वात मोठे रिटेल विक्री साखळी असून, त्यांच्या मते गेल्या वर्षात थंड केलेल्या व्हेगान उत्पादनाच्या विक्रीमध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com