agricultural stories in Marathi, agrovision, Warming- Plants are also stressed out | Agrowon

वनस्पतीच्या ताण स्थितीतील संदेश यंत्रणा उलगडली
वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या हरितद्रव्य ते केंद्रक या दरम्यान असलेल्या जनुकीय संदेश यंत्रणेविषयी नेमकेपणाने माहिती उपलब्ध करण्यात साल्क प्रयोगशाळेतील संशोधकांना यश आले आहे. या संशोधनामुळे बदलत्या वातावरणामध्ये तग धरणाऱ्या नव्या जातींचा विकास करणे शक्य होणार आहे. हे संशोधन प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

वनस्पतीतील ताणाच्या स्थितीमध्ये कार्यरत होणाऱ्या हरितद्रव्य ते केंद्रक या दरम्यान असलेल्या जनुकीय संदेश यंत्रणेविषयी नेमकेपणाने माहिती उपलब्ध करण्यात साल्क प्रयोगशाळेतील संशोधकांना यश आले आहे. या संशोधनामुळे बदलत्या वातावरणामध्ये तग धरणाऱ्या नव्या जातींचा विकास करणे शक्य होणार आहे. हे संशोधन प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

तीन अंशांनी तापमान वाढले तर जग नेमके कसे दिसेल? वनस्पतींच्या हरितद्रव्यापासून केंद्रकापर्यंत सर्वत्र ताणांचे संदेश पोचवले जातील, या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जनुकीय पातळीवर नियंत्रणाचे उपाय सुरू झालेले असतील. अशा वेळी कार्यरत होणारे विशेषतः हरितद्रव्यापासून केंद्रकापर्यंत संदेश पोचवणारे जनुक GUN१ साल्क संस्थेतील संशोधकांना आढळले आहे. अशा इजा झालेल्या हरितद्रव्याच्या स्थितीमध्ये प्रथिनांची निर्मिती कशा प्रकारे होणार, यासाठीही ते जनुक महत्त्वाचे ठरते. एकूण वनस्पती ताणाच्या स्थितीला कशी सामोरे जाणार याविषयीची माहिती या जनुकांमुळे मिळते. साल्क संस्थेतील वनस्पती मूलद्रव्यीय आणि पेशीय जीवशास्त्र प्रयोगशाळेचे संचालक व प्रो. जोआर कोरी यांनी सांगितले, की वातावरण बदलाच्या स्थितीमध्ये आपल्या अन्नसाखळीवर लक्षणीयरीत्या परीणाम होण्याची शक्यता दिसून येते. जेव्हा वनस्पती दुष्काळासारख्या ताणाच्या स्थितीमध्ये असते, त्या वेळी ते कमी उत्पादन देतात. जर पिकांचा दुष्काळाला किंवा ताणाला मिळणारा नेमका प्रतिसाद समजू शकला तरी आपण या स्थितीमध्ये तग धरतील, अधिक उत्पादन देतील अशा पद्धती विकसित करू शकतो.

  • वनस्पती पेशीमध्ये क्लोरोपास्ट किंवा हरितद्रव्य ही एक यंत्रणा सूर्याच्या ऊर्जेचे रुपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करत असते. सामान्यतः पेशीचे केंद्रकाकडून हरितद्रव्याकडून स्थिर ऊर्जा उत्पादनासाठी संदेश पाठवला जातो. मात्र, ताणाच्या स्थितीमध्ये हरितद्रव्याकडून इशारा देणारा संदेश पेशी केंद्रकाकडे पाठवला जातो. या तातडीच्या संदेशामुळे हरितद्रव्यातील नियंत्रक अशा जनुकांना चालना मिळते.
  • या पूर्वीच्या संशोधनामध्ये कोरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे काम करणारा जनुकांचा गट ओळखला होता. त्यात GUN१ याचा समावेश होता. हे जनुक वनस्पतीला ताण जाणवत असताना पेशीतील अन्य जनुकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते हे समजले असले तरी ते नेमकेपणाने कसे काम करते, हे माहित नव्हते.

इतर अॅग्रो विशेष
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...