agricultural stories in Marathi, agrovision, Weak honey bee colonies may fail from cold exposure during shipping | Agrowon

वाहतुकीदरम्यान थंड तापमानाचा मधमाशी वसाहतीवर होतो परिणाम
वृत्तसेवा
सोमवार, 6 मे 2019

वाहतुकीच्या दरम्यान मधमाश्यांच्या वसाहतींना सामोरे जावे लागणाऱ्या ताणांचा अभ्यास अमेरिकी कृषी संशोधन सेवेतील संशोधकांनी केला आहे. या प्रवासादरम्यान आणि त्यानंतरच्या काळात सलग थंड तापमान राहिल्यास मधमाश्यांच्या वसाहतीचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे प्राथमिक संशोधनात आढळले आहे.

वाहतुकीच्या दरम्यान मधमाश्यांच्या वसाहतींना सामोरे जावे लागणाऱ्या ताणांचा अभ्यास अमेरिकी कृषी संशोधन सेवेतील संशोधकांनी केला आहे. या प्रवासादरम्यान आणि त्यानंतरच्या काळात सलग थंड तापमान राहिल्यास मधमाश्यांच्या वसाहतीचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे प्राथमिक संशोधनात आढळले आहे.

दरवर्षी सुमारे २० लाख मधमाशी वसाहती या सेमी ट्रेलर आणि जहाजाद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी नेल्या व वाढवल्या जातात. एकूण मधमाशी वसाहतीच्या तुलनेमध्ये हे प्रमाण दोन तृतीयांश इतके मोठे आहे. अनेक वेळा बाह्य देशामध्येही पाठवले जातात. कॅलिफोर्नियामध्ये सुमारे १३ लाख एकर क्षेत्रावर बदाम बागा आहेत. या झाडांच्या परागीकरणासाठी अनेक वेळा मधमाश्यांच्या वसाहती नेल्या जातात. मात्र, त्या ठिकाणी पोचल्यानंतर काही काळ स्थिरस्थावर झाल्यानंतर बदाम बागेमध्ये ठेवल्या जातात. फार्गो (उत्तर डाकोटा) येथील अमेरिकी कृषी संशोधन सेवेतील बायोसायन्स रिसर्च लॅबोरेटरी येथील संशोधक डॅकोटह मेलिचेर यांनी सांगितले, की आम्हाला लहान आकाराच्या म्हणजेच १० पेक्षा कमी फ्रेम मधमाश्या व त्यांच्या अळ्या असलेल्या वसाहतींची ट्रकद्वारे वाहतूक करताना अडचणी येतात. या काळात त्यांच्या वसाहतीतील तापमान नियंत्रित ठेवणे शक्य होत नाही. परिणामी त्यांना थंडीचा ताण सहन करावा लागतो.

  • लहान वसाहती यशस्वी न होण्याचे प्रमाण वाढते. त्यातही पोचल्यानंतर पहिल्या काही दिवसांत जवळपास सर्व मधमाश्या मृत होण्याचे प्रमाणही अधिक आहे. अशा १० किंवा अधिक फ्रेम्सच्या लहान वसाहतीसाठी स्थिर तापमान ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते.
  • सामान्यतः वाहतूकदार जहाज वाहतुकीमध्ये वाढणाऱ्या तापमानाबाबत काळजी करतात. कारण त्यामुळे वसाहतीतील माश्या त्वरित मृत होतात. मात्र, अतिथंड तापमानामुळे होणाऱ्या नुकसानीकडे फारसे लक्ष जात नाही. त्यातही अतिथंड, गोठवण तापमानामध्ये मधमाशीच्या अळ्यांमध्ये विकृती तयार होते. विशेषतः त्या प्रौढ होताना या विकृती अधिक स्पष्ट होतात. काही आठवड्यामध्ये एकूण वसाहत अयशस्वी होण्यामध्ये हे महत्त्वाचे कारण ठरते.
  • वाहतुकीच्या दरम्यान या लहान वसाहती गोठू नयेत, यासाठी तापमानाचे नियंत्रण केले पाहिजे. विशेषतः मधमाश्यांचे बॉक्स सेमी ट्रेलरमध्ये भरताना त्यांचे तोड आतील बाजूला असावे किंवा रस्त्याकडे बाहेरील बाजूला असावे. यामुळे आतील वातावरणामध्ये अति गरम होणे टाळता येते. अर्थात, बाह्य वातावरण अत्यंत थंड असल्यास वाऱ्यामुळे वसाहतीच्या तापमानामध्ये घट होऊ शकते.
  • वाहतुकीच्या ट्रेलरमधील वसाहतीच्या जागेनुसार तापमानामध्ये बदल होऊ शकतात. ज्या वसाहती एकदम पुढे किंवा मागे असतात आणि ज्या वसाहती मध्यभागी असतात, त्यांच्यामध्ये तापमानात घट होऊ शकते. त्यामुळे सातत्याने त्यांचे निरीक्षण करत राहावे लागते.
  • वसाहतीचे तापमान मोजण्यासाठी संशोधकांनी जनुकीय पद्धतीनुसार काही आडाखे बांधलेले आहेत. वाहतुकीसाठी निघताना, पोचल्यानंतर आणि तिथे गेल्यानंतर स्थिरस्थावर होण्याच्या तीन आठवड्यांमध्ये येणाऱ्या विविध ताणामुळे मधमाश्यांच्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला आहे.
  • मधमाश्या स्थिर झाल्यानंतर कार्यरत होणारी जनुके ही मधमाश्यांतील विविध रोगांसाठी प्रतिकारकतेसाठी साह्य करत असल्याचे संशोधकांना आढळले आहे. थंडीच्या ताणाला प्रतिक्रिया देणाऱ्या आणि आक्रमकपणाला साह्यभूत ठरणाऱ्या घटकांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचे दिसून आले.
  • याच वाहतुकीच्या काळात प्रतिजैविक पेप्टाईड निर्मितीसाठी कार्यरत जनुके अधिक कार्यान्वित होतात. नव्या संभाव्य जिवाणूंच्या प्रादुर्भावाशी लढण्यासाठी मधमाश्यांना तयार ठेवतात.
  • एपिस मेलिफेरा या मधमाश्यांसंदर्भात झालेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष ‘एन्व्हायर्न्मेंटल एन्टॉमॉलॉजी’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

ताण कमी करण्यासाठी उपाययोजनेवर लक्ष ः

मधमाश्यांवर येणाऱ्या अत्युच्च ताणावर लक्ष केंद्रित करण्यापूर्वी आपण मधमाश्यांचे विविध घटकांसाठीच्या नेमक्या प्रतिक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे. त्यात दीर्घ प्रवास, हादरे, हवेचे दाब, डिझेलच्या ज्वलनाने तयार होणारे वायू आणि प्रत्यक्ष मधमाशीच्या बॉक्समधील वातावरण अशा अनेक घटकांचा समावेश असतो. यातील काही घटकांचे ताण हा आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक असतो. हे ताण कमी करण्यासाठी कमी खर्चिक उपाय असू शकतात. त्यावर आपणाला लक्ष केंद्रित करावे लागेल, असे मेलिचेर यांनी सांगितले.

 

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...
साताऱ्यातील धरणांमध्ये ९८ टक्‍क्‍यांवर...सातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
नियोजनशून्य कारभारामुळे ६० टक्केच निधी...मुंबई ः भाजप-शिवसेना युती सरकारची पाच वर्षांतील...