वाढत्या सागरी पातळीचा स्थानिक अर्थव्यवस्थेवरही होतोय परिणाम

वाढत्या सागरी पातळीचा स्थानिक अर्थव्यवस्थेवरही होतोय परिणाम
वाढत्या सागरी पातळीचा स्थानिक अर्थव्यवस्थेवरही होतोय परिणाम

तापमानातील बदलांमुळे सागराच्या पातळीमध्ये होणारी वाढ ही केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर एकूण अर्थव्यवस्थेवरही परिणाम करणार असल्याचे मत स्टॅनफोर्ड विद्यापीठातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या बदलांचा फटका अॅन्नापोलिस एमडी येथील अर्थव्यवस्थेला आधीच फटका बसला असून, सागरी किनाऱ्यांवर राहणाऱ्या समुदायांसाठी त्याची तीव्रता अधिक असणार आहे. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल सायन्स अॅडव्हान्सेसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील विद्यार्ती मियुकी हिनो आणि तिच्या सहकाऱ्यांनी मेरीलॅड राज्याची राजधानी अॅन्नापोलिस भागामध्ये उच्च लाटांमुळे आलेल्या पुराच्या स्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. २०१७ मधील महसुलातील नुकसानीचे प्रमाण ८६ हजार ते १ लाख ७२ हजार डॉलरच्या दरम्यान असल्याचे दिसून आले. कारण, या भागातील लहान उद्योग हे पर्यटकांवर अवलंबून आहेत. वाढत असलेल्या सागरी पातळीमुळे या छोट्या व्यवसायावर परिणाम होत असून, त्यांच्या नफ्यामध्ये घट होत आहे, अशी माहिती संशोधन सहाय्यर सॅमान्थे बीलॅन्गर यांनी दिली. वातावरणातील बदल आणि त्याचे परिणाम प्रत्यक्षामध्ये लक्षात येत नाहीत. मात्र, अमेरिकेतील सागरी किनाऱ्यांवरील समुदायांच्या स्थानिक व्यवसायांवर त्याचे परिणाम दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्याचे पुरावे आता स्पष्ट होत आहेत. पुरांचे प्रमाण वाढतेय

  • उंच लाटांमुळे आलेल्या पुरामुळे काही प्रमाणात व्यवासायाला फटका बसतो. विशेषतः उन्हाळ्यामध्ये पुराची स्थिती उद्भवली तर त्यासाठी किनाऱ्यातील भागातील पायाभूत सुविधांवर ताण येतो. पाणी रस्ते, पार्किंग यामध्ये पसरते, त्यामुळे पादचारी आणि वाहनांच्या वर्दळीला अटकाव होतो.
  • उंच लाटांमुळे पूर येण्याचे प्रमाण गेल्या २० वर्षांमध्ये ६० टक्क्यापर्यंत वाढले असल्याची माहिती राष्ट्रीय सागरी आणि पर्यावरणीय प्रशासनाने दिली.
  • १९५० च्या दशकांमध्ये अमेरिकेतील २७ ठिकाणी पूर येण्यामुळे वर्षातून सरासरी २.१ दिवस वाया जात होते. ते प्रमाण वाढून २००६ ते २०१० या काळामध्ये ११.६ दिवसांवर गेले.
  • २०३५ पर्यंत सागरी किनाऱ्यांवरील सुमारे १७० समुदायांना प्रतिवर्ष सुमारे २६ दिवस पुराच्या स्थितीचा सामना करावा लागण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
  • एकूण व्यवसायांना बसणाऱ्या आर्थिक फटक्याविषयी हिनो यांनी सांगितले, की पुराच्या स्थितीमुळे व्यवसायाकडे प्रतिवर्ष सुमारे २६ दिवस म्हणजेच जवळजवळ एक महिना येणार नाहीत. जरी पूर काही तासांमध्ये ओसरला तरी आलेले पाणी ओसरणे, गाळ चिखल यांची स्वच्छता यांचा विचार करता हा फटका कितीतरी मोठा असणार आहे.
  • अॅन्नापोलिस हे अमेरिकी नौदलांच्या स्थान असून, सातत्याने उंच लाटांमुळे येणाऱ्या पुरांचा सामना करणाऱ्या शहरांमध्ये सर्वात वरच्या स्थानावर आहे. १९६० मध्ये अॅन्नापोलिस शहरामध्ये प्रतिवर्ष चार दिवस पूरस्थिती असायची. २०१७ मध्ये चेसापेके बे मधील लहान शहरामध्ये उंच लाटांमुळे आलेल्या पुरांचे दिवस ६३ होते.
  • स्टॅनफोर्ड येथील भू, ऊर्जा आणि पर्यावरणशास्त्र विद्यालयातील वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ कॅथरीन मॅक यांनी सांगितले, की अॅन्नापोलिस हे राजधानीबरोबर ऐतिहासिक असे जिल्ह्याचे ठिकाण असून स्थानिक आणि पर्यटकांच्या वर्दळीचे ठिकाण आहे. पुरामुळे शहराच्या मध्यभागावरही परिणाम होतो.
  • पाणी दूर ठेवण्यासाठी प्रयत्न आवश्यक ः

  • संशोधनासाठी पार्किंग मीटर्स, उपग्रहांच्या प्रतिमा, मुलाखती आणि अन्य माहिती साठ्यांचा वापर केला. त्यावरून पूरस्थितीच्या काळामध्ये सिटी डॉक या भागामध्ये भेट देणाऱ्या ग्राहकांची संख्या मिळविण्यात आली. त्यांनी पुराचे पाणी बाजूला केल्यानंतर किंवा वळवल्यानंतर काही दिवस ग्राहक येत नसल्याचे स्पष्ट झाले.
  • हिनो यांनी सांगितले, की वातावरणातील बदल आणि वाढती सागरी पातळी या जागतिक पातळीवरील घटना आहेत, त्याचे स्थानिक पातळीवर फारसे परिणाम दिसत नाहीत, असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा खरेतर आपण बारकाईने विचार करत नसतो. पुराचा अनुभवाच्या आपल्या दैनंदिन जीवनावर विशेषतः व्यवसायांवर प्रत्यक्षातील पुराच्या दिवसापेक्षा अधिक काळासाठी पडतो.
  • २०१७ मध्ये सिटी डॉक भागातील व्यवसायांना पुरामुळे पर्यटकांच्या संख्येमध्ये प्रतिवर्ष दोन टक्क्यांपेक्षा कमी नुकसान सोसावे लागले. मात्र, भविष्यात सागरी पातळी वाढल्यामुळे हे प्रमाण वाढत जाण्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. सागरी पातळीमध्ये केवळ ३ इंचाची वाढ झाली तरी सिटी डॉक भागातील पर्यटकांच्‍या संख्येमध्ये ४ टक्क्याने घट होईल. १२ इंचाने सागरी पातळी वाढल्यास तेच प्रमाण २४ टक्क्यापर्यंत पोचणार आहे.
  • अमेरिकेच्या जागतिक बदल संशोधन प्रकल्प, वातावरण शास्त्राच्या अहवालानुसार सागरी पातळीमध्ये २००० या वर्षाच्या तुलनेमध्ये २०५० पर्यंत ०.५ आणि १.२ फूट इतकी वाढ होण्याचे अंदाज मांडण्यात आले आहेत. त्या प्रमाणात लहान आणि मोठ्या उद्योगांच्या दृष्टीने धोक्याचा विचार अद्याप फारसा होत नाही.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com