मानवी इतिहासाचाही परिणाम दिसतो गहू उत्क्रांतीवर

मानवी इतिहासाचाही परिणाम दिसतो गहू उत्क्रांतीवर
मानवी इतिहासाचाही परिणाम दिसतो गहू उत्क्रांतीवर

प्रथम गहू पिकाच्या जनुकीय संरचनेचा नकाशा बनविण्यात आला, त्यानंतर आता त्यांच्या पैदाशीच्या इतिहास व्यवस्थित मांडण्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. गहू जातीच्या जनुकीय विविधतेची माहिती व्हेल्बी अभ्यासाअंतर्गत संशोधकांनी मिळवली आहे. यातून गहू ज्यापासून विकसित होत गेला अशा प्राचीन काळापासून लागवडीखाली असलेल्या तृणधान्य वनस्पतींचा शोध घेतला आहे. या साऱ्या प्रक्रियेवर विविध युद्धांचा परिणामही स्पष्टपणे समोर आला आहे. हे संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल नेचर जेनेटिक्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. लोकसंख्येतील वाढ आणि तापमान बदलांचे परिणाम यामुळे भविष्यामध्ये अन्नधान्यांचे स्रोत कमी होत जाणार आहेत. पिकाखाली असलेल्या वनस्पतींच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी पैदासकारांची कसोटी लागणार आहे. सध्याच्या लागवडीखाली असलेल्या पिकांच्या जाती त्यासाठी पुरेशा ठरतील का, असाही प्रश्न विचारला जात आहे. यासाठी गहू वनस्पतीची जनुकीय संरचना उलगडण्यापासून जनुकीय विविधतेचा शोध घेण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट करत आहे. या अभ्यासामध्ये जर्मनी येथील हेल्महोल्ट्झ झेन्ट्रम म्युनचेन येथील शास्त्रज्ञांसह फ्रान्स, इटली, हंगेरे, टर्की आणि अन्य युरोपिय देशांतील शास्त्रज्ञांचा समावेश आहे. यासाठी युरोपिय महासंघाने अर्थसाह्य पुरवले आहे. या अभ्यासातून गहू जाती आणि त्यांच्यातील जनुकीय विविधता यांचा संबंध मानवी सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाशी जोडलेला असल्याचे पुढे येत आहे. असे आहे संशोधन ः

  • या अभ्यासात गव्हाच्या ४८० जातींचे जनुकीय विश्लेषण केले. त्यात जंगली गवते, प्राचीन धान्ये आणि आधुनिक अधिक उत्पादनक्षम जाती यांचा समावेश होता.
  • पिकाची उत्क्रांती जाणून घेताना भौगोलिकतेसोबतच राजकीय इतिहासातील घटनांचाही संबंध आहे का, याची तपासणी करण्यात आली.
  • सध्याच्या आधुनिक ब्रेड गहू हा सुमारे १० हजार वर्षांपूर्वी सध्या तुर्कीमध्ये असलेल्या प्रदेशात उगम झाला. हा डुरम गहू आणि जंगली गवताच्या (Aegilops tauschii) संकरातून तयार झाला. लक्षावधी वर्षामध्ये झालेल्या विविध मानवी स्थलांतराशी या साऱ्या लागवडीखालील पिकांचा संबंध आहे.
  • गव्हामध्ये तीन जनुकीय बाबी या इतिहासातील मुख्य घटनांशी जोडलेल्या दिसून आल्या. पूर्वेकडील स्थानिकीकरण झालेल्या व अधिक उत्पादनक्षम जातींपैकी एक जात हरितक्रांतीचा भागून म्हणून सर्वत्र पसरली. पश्चिम आणि मध्य युरोपमधील दोन वेगळ्या जनुकीय बाबींचाही प्रसार झाला. हा प्रसार १९६६ आणि १९८५ च्या दरम्यान झाला. या काळात जगभरामध्ये भूराजकीय आणि सामाजिक- आर्थिकदृष्ट्या शीतयुद्ध सुरू होते. १९८९ मध्ये इराणच्या पतनानंतर गहू जातींचे हळूहळू एकत्रिकरण होत गेल्याचे विश्लेषणातून समोर आले आहे.
  • अगदी युरोपिय संघाचा उगम आणि विस्तारही आजच्या गव्हाच्या जनुकांमध्ये आढळून येतो. मध्य युरोपामध्ये लागवडीखाली असेलल्या गहू जाती आता संपूर्ण युरोपमध्ये लावल्या जात आहेत. यावरून पिकाच्या वितरण आणि उत्क्रांतीमध्ये मानवाचा प्रभाव पुढे येतो.
  • संशोधनाचा फायदा ः

  • या अभ्यासामध्ये संशोधकांनी पूर्वी ज्ञात नसलेली व उत्पादन, फुलोऱ्यावर येण्याचा कालावधी, उंची आणि गहू रोपांची स्थिरता यासाठी कारणीभूत जनुके ओळखली आहेत. त्याचा फायदा नव्या जातींच्या विकासासाठी होणार आहे.
  • गव्हाच्या जनुकीय विविधतेविषयी अधिक जाणून घेत त्यातील उत्तम गुणधर्मांचा विस्तार पैदास प्रक्रियेतून करणे शक्य आहे. मातीची घसरती सुपीकता आणि पाण्याची कमतरता या संभाव्य आव्हानांवर मात करण्यासाठी योग्य अशा नव्या जातींचा विकास करणे शक्य होईल.
  • याचप्रकारे मका आणि भात या प्रमुख पिकांचा जनुकीय इतिहास मांडणे शक्य आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com