सेंद्रिय शेतमाल खरेदीची उत्तम संधी

सेंद्रिय शेतमाल खरेदीची उत्तम संधी
सेंद्रिय शेतमाल खरेदीची उत्तम संधी

आरोग्यासाठी जागरुक असणाऱ्या लोकांना सेंद्रिय उत्पादने घेण्याची इच्छा असली तरी ती नेमकी व सातत्याने कोठे मिळतील, अशी चिंता भेडसावत असते. त्यासाठी आनंदाची बाब म्हणजे एकाच वेळी विविध ठिकाणी सेंद्रिय शेती उत्पादन घेणाऱ्या गटांची उत्पादने पाहण्याची व खरेदी करण्याची संधी शहरातील बीड बायपासवरील जबिंदा मैदानावर गुरुवारी (ता. २७) सुरू झालेल्या सकाळ-अॅग्रोवन कृषी प्रदर्शनात प्राप्त झाली आहे. या प्रदर्शनामध्ये कृषी विभागाअंतर्गत आत्माच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेती उत्पादन घेणाऱ्या अनेक शेतकरी गटांची शेतमाल उत्पादने सुमारे १२ दालनांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. सेंद्रिय शेतमालांमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मूग, तीळ, मूग दाळ, तूर दाळ, उडिद दाळ, हरभरा दाळ, मोहरी या सोबतच लसूण, कांदा, वाटाणे, मेथी, वाल, मिरची, जिरे, मिरची पावडर, मध यांसह फळांमध्ये पपई, डाळिंब व मोसंबी अशी फळे उपलब्ध आहेत. सेंद्रिय उत्पादनासाठी आवश्यक असे उत्तम दर्जाचे गांडूळ खतही या दालनामध्ये विक्रीसाठी ठेवले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला खपली गहू, चंदौशी गहू सुमारे ५८ क्विंटल उपलब्ध केला आहे. ज्वारी २५ क्विंटल, बाजरी ३४ क्विंटल, तीळ १२ क्विंटल, मूगदाळ ११ क्विंटल, तूर दाळ ४२ क्विंटल, उडिद दाळ २५ क्विंटल, मोहरी २ क्विंटल, हरभरा दाळ १५ क्विंटल, गावरान लसूण ३ क्विंटल, कांदा १२५ क्विंटल, मूग २ क्विंटल, वाटाणे १० क्विंटल, जिरे २ क्विंटल, डाळिंब २५ क्विंटल, मोसंबी १५ क्विंटल, मिरची पावडर २ क्विंटल, मध १०० किलो तर गांडूळ खत प्रत्येकी पाच किलो वजनाच्या सुमारे १ हजार बॅग उपलब्ध केल्या आहेत. सेंद्रिय हुरडा उपलब्ध ः कृषी प्रदर्शनातील सेंद्रिय शेतीमाल दालनामध्ये सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला हुरडा उपलब्ध आहे. गंगापूर तालुक्यातील दीघी येथील शेतकरी नवनाथ आवारे यांनी ते सदस्य असलेल्या सेंद्रिय शेतकरी गटामार्फत सुमारे २ क्विंटल हुरडा विक्रीसाठी आणलेला आहे.

नागरिकांमध्ये आरोग्याविषयी प्रचंड जागरूकता निर्माण झाली आहे. अशा उत्पादनाची मागणी वाढत आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोचण्याची संधी अशा प्रदर्शनातून मिळत असते. त्याचा लाभ घेण्यासाठी आत्माच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले असून, ग्राहकांनीही या संधीचा लाभ घ्यावा. - पी. बी. अव्हाळे, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com