माया संस्कृतीतील जंगलतोडीचे दिसतात मातीवर परिणाम

माया संस्कृतीतील जंगलतोडीचे दिसतात मातीवर परिणाम
माया संस्कृतीतील जंगलतोडीचे दिसतात मातीवर परिणाम

मानव प्राचीन काळापासून निसर्गामध्ये हस्पक्षेप करत आला आहे. माया संस्कृती नष्ट होऊनही एक हजारापेक्षा अधिक वर्षे उलटली आहेत. मात्र, या काळातील युकॅटन पेनिनसुला प्रांतातील जंगल तोड आणि त्याचे जमिनीच्या कर्ब साठवणीवर झालेले परिणाम अद्यापही मध्य अमेरिकेतील कर्ब साठ्यावर दिसून येत असल्याचे मॅकगिल विद्यापीठातील संशोधनात आढळले आहे. त्याचे निष्कर्ष ‘जर्नल नेचर जिओसायन्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. मातीची सुपीकतेमध्ये सध्या केलेल्या हस्तक्षेपाचे परीणाम भविष्यात दीर्घकाळ जाणवत राहतात. माया संस्कृतीमध्ये सुमारे ४ हजार वर्षापूर्वी शेतीला सुरूवात झाली. शेतीचा वाढता प्रसार व शहरे वसवण्यासाठी जंगलांची तोड मोठ्या प्रमाणात झाली. सोबत मातीची धूपही होत गेली. या प्रांतातील मातीमध्ये कर्बाच्या साठ्यावर झालेल्या परीणामाच्या तीव्रतेतून इतक्या वर्षानंतर माती सावरली नसल्याचे मॅकगिल विद्यापीठातील भूरसायनशास्त्रज्ञ पीटर डग्लस यांनी नव्याने केलेल्या संशोधनात दिसून आले. भूपर्यावरणामध्ये मूलभूत बदल ः पृथ्वीवरील कार्बनचा सर्वात मोठा साठा मातीमध्ये आहे. ते प्रमाण वातावरणातील कार्बनच्या जवळपास दुपटीइतके भरते. असे असूनही कर्ब साठ्याविषयी अनेक बाबी मानवाला अज्ञात आहेत. त्यात झालेले बदल मुळ स्थितीमध्ये येण्यासाठी अनेक शतकांपेक्षा अधिक काळ लागतो. इतक्या दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास करण्यासाठी डग्लस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दक्षिण मेक्सिको आणि ग्वाटेमाला येथील माया खोऱ्यातील तीन तलावातील गाळांनी बनलेल्या मातीचे विश्लेषण केले. रेडिओकार्बनच्या (आयसोटोप) मापनातून त्याचा काळ, मातीत गाडल्या गेलेल्या वनस्पतीच्या मेणासारख्या मूलद्रव्यावरून त्यांचे वय मिळवण्यात आले. त्याचा तुलनात्मक अभ्यास केला. मातीत कार्बनची साठवण ही अत्यंत अलिकडची असल्याचे दिसून आले. पीटर डग्लस म्हणाले, की आपण जेव्हा या प्रदेशाला भेट देतो, तेव्हा वर्षावनातील जुन्या व घनदाट झाडीकडे लक्ष जाते. मात्र, जेव्हा मातीतील कार्बन साठ्याकडे पाहतो, त्यावेळी त्यात झालेले मूलभत बदल दिसून येतात. इतक्या प्रचंड वर्षानंतरही ते मुळ स्थितीत न आल्याचे स्पष्ट होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com